देशस्थ व कोकणस्थ

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Feb 2020 - 12:01 pm

परवा सावंत नावाचा मित्र भेटला...

प्रोपर सावंत वाडीचा ..

गप्पा मारताना त्याला म्हणलो माझे पण ३-४ सावंत आडनावाचे दोस्त आहेत..

काहि फेसबुकावर पण आहेत..

त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/...

म्ह्णजे??

ते देशस्थ मराठा आम्हि कोकणस्थ मराठा..आमचे मसाले खाद्य पदार्थ निराळे

त्यांचे निराळे..ामचा मालवणी मसाला त्यांचा कोल्हापुरी मसाला...

काका तुम्ही "काहे दिया परदेस "सिरियल बघता का?

बघतो ना....

त्यातली गौरीची आज्जी जी कोकणी मिश्रित मराठी बोलते तसे आम्हि घरी एकमेकाशी बोलतो...

देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार ब्राह्मणात असतो..तसाच तो मराठा समा््जात पण आहे हे ऐकुन मजा वाटली..

किति विविधता आहे..ना?

एकिकडे मालवणी मटन.वडे आंबोळी..तर इकडे पुरणपोळी..तांबडा पांढरा..झणझणीत..तर तिकडे सावजी मटण..

किति विविधता आहे महाराष्ट्रात

वावरविचार

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Feb 2020 - 1:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य बोललास रे अवि.
त्या विविधतेला आमचा सलाम.
आता 'कुलकर्णी' आडनावाचा उहापोह करायचा म्हण्टला तर धागा तासाभरात शतक ठोकेल. कुलकर्णी की कुळकर्णी पासूनच सुरुवात होईल.

रमेश आठवले's picture

14 Feb 2020 - 8:21 pm | रमेश आठवले

एकदा गोळवलकर गुरुजींना कोणीतरी विचारले कि तुमची जात कोणती. त्यांनी उत्तर दिले कि मी कायस्थ आहे. पृच्छकाने पुन्हा विचारले कि ते कसे. गुरुजींनी उत्तर दिले - मी या कायेत रहातो म्हणुन मी काय स्थ आहे.

अहो दोनच जाती आहेत 'स्वस्थ , सावकाश ' आणि दुसरी 'उरकणे'

त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/...

माझ्या सावंत आडनावाच्या अनेक मित्रांपैकी २ नवबौद्ध आहेत. किति विविधता आहे महाराष्ट्रात.
तुम्ही सन्यास घ्यावा अशी इच्छा नाही पण उगाच काहीतरी फालतू धागे काढू नका काका.