भाग २ - भोपाळचा सापळा - 'या सम हा' ग्रंथातील समराचे प्रस्तूतीकरण
मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्या लेखनातून निर्माण होणारे समर पॉवर पॉईटने आजच्या काळातील नकाशांच्या मदतीने साकारता येईल का? असेल तर कसे करता येईल? यावर आधारित आहे. लेखकाचे कथन काही ठिकाणी स्लाईड्सच्या आकाराला पुरक व्हावे इतपत संकलित सादर केले आहे.
कोणतेही नवे संशोघन केल्याचा दावा खुद्द लेखक करत नाहीत. मस्तानी व अन्य कौटुंबिक व्यक्तींचा, घटनांचा समावेश ग्रंथात नाही. उपलब्ध माहितीच्या आधारे प्रत्येक लढाईचे लष्करी मोजमापातून विश्लेषण हा प्रमुख उद्देश आहे. हे प्रस्तूतीकरण याच मताने मी केले आहे.
स्लाईड्स पाहताना पुन्हा पुन्हा दाबत राहून पुढील मजकुराकडे जाता यावे असा प्रयत्न केला आहे. तर पुर्ण पहायला डावी उजवीकडे करावे लागेल. नकाशा बनवताना हजारो सैन्याची, अवजड सामान, तोफांची हालचाल करताना एका स्थळाकडून दुसरीकडे जाण्याचा मार्ग शोधताना नद्यांची पात्रे, डोंगरांची चढउतर शक्यतो टाळून कसे जाता येईल या विचाराने बनवले आहेत. वाटेत विविध भागातील राजे, सरदारांनी आपापली दळे घेऊन निजामाच्या बरोबर सेनेत सामिल व्हावे असा बादशहाचा लेखी आदेश प्रत्यक्ष दाखवून कधी आपणहून तर कधी धाक दाखवून सामिल करून घेतले असावेत. चारापाणी, धान्य, भाजीपाला, याची बेजमी करता येणारे बाजार, वरिष्ठ सरदारांना आरामशीर राहायला किल्ले-महालाची सोय, करत करत पुढे जायला लागेल याची जाण ठेऊन मार्गांची निवड माझ्या मनाने करण्याचे स्वातंत्र्य मी घेतले आहे. उदा. बाजीराव ज्या मार्गाने सातपुड्याला पार करताना सांगवी नंतर खरगोनला जातात असे इतिहासात म्हटले आहे. खरगोन नावाची दोन गावे त्याच भागात सध्याही उपलब्ध आहेत पैकी छोटे खरगोन वाटेतच आहे. मोठे खरगोन वाटेपासून जरा दूर आहे. पण मुद्दाम वाट वाकडी करून विश्रांतीला, धान्य, चारा आदी मोठ्या बाजारात जाऊन मिळवायला, व्यवस्थेला सोय म्हणून मोठ्या खरगोनकडे जाणे शक्य आहे.
काही त्रुटी लक्षात आणून दिल्यातर आभारी राहीन.
प्रतिक्रिया
11 Feb 2020 - 6:53 pm | दुर्गविहारी
अप्रतिम पण दुर्लक्शित राहिलेला धागा. बाजीरावने चाळीस लढाया केल्या आणि एकही लढाई ते हरले नाहीत , हा ईतिहास सर्वाना माहिती आहे. पण फार माहिती नसलेल्या एका लढाईचे अप्रतिम प्रेझेंटेशन पहायला मिळाले. वास्तविक शाळेत अश्याच स्वरुपात ईतिहास शिकविला गेलयास तो फक्त सनावळ्या आणि कलमांमुळे कंटाळवाणा न होता नक्कीच रंजक होइल याची खात्री वाटते.
आणखी असेच धागे यावेत हि इच्छा.
12 Feb 2020 - 8:31 am | प्रचेतस
हेच म्हणतो. उत्तम धागा.
11 Feb 2020 - 10:36 pm | शशिकांत ओक
दुर्गविहारींच्या कथनातून वैषम्य परावर्तित झाले आहे. ते दूर व्हावे हीच इच्छा.
13 Feb 2020 - 9:42 pm | शशिकांत ओक
निजामाच्या फुसलावेपणाचा वापरकरून इराणातून आलेल्या नादीर शाहच्या आक्रमणात दिल्लीच्या बादशाहची विधुळवाट लागली, कोहिनूर हिरा, मयूर सिंहासन, करोडे रुपये तर त्याने गमावले. त्यात हजारो निरपराध लोकांच्या खोपड्यांचे मनोरे रचले गेले. मुगलाईची शान व दरारा संपुष्टात आला. त्यामुळे बाजीराव पेशवेंच्या समोर काय नवे लष्करी पर्याय उपलब्ध झाले?
ग्रंथ वाचताना रंगून जायला होते.
27 Feb 2020 - 11:11 pm | शशिकांत ओक
तेव्हा लक्षात आले की धाग्यातील स्लाईड्स मोबाईल आडवा धरून पाहिला की जास्त प्रभावी दिसतात. प्रत्येक स्लाईड्सवर टिचकी मारून एका खाली एक ओळींचा मजकूर साकार होतो. काही नकाशे मोठे होऊन दिसू लागतात. कॉम्प्युटरवर पहायची सवय झाल्याने मोबाईलवरून कसे दिसते ते पहायला दुर्लक्ष झाले.