सांगू कशी मी खुळी प्रीत
मोडू कशी उभ्या जगाची रीत
तुझ्या वाटेवर धावते ही नजर
येशील का शोधीत माझे घर
अनोळखी सुरांचे उमलून आले गीत
लागली तुझीच रे काळीजओढ
ह्रदयाला झाला वेदनेचा स्पर्श गोड
चंद्रसावल्यांनी मोहरली काळोख्या मिठीत रात
हळूच आली तुझी चांदण चाहूल
स्वप्नातल्या पाखराची पडली वेडी भूल
दडवू कसे हसऱ्या ओठांतले गुपित