आमची प्रेरणा.. माझी माऊ :)
माऊवरून प्रेरणा घेऊन आम्हीही एक काऊ पाळला आहे त्याची चित्रे इथे टाकत आहोत...
काय? एकदम स्मार्ट दिसतो की नाही आमचा काऊ? :)
तर सादर करत आहोत आमचा काऊ. आज आमचा काऊ तुमच्याशी थोडा संवादही साधणार आहे! :)
१) मी आहे तात्याचा काऊ! त्याच्यासारखाच अंमळ वेडझवा! :)
२) साला, हा मराठी माणूस आंतरजालावरही जास्त करून भांडतांनच दिसतो! :)
३) हा मी आणि ही माझी बायडी. सध्या आम्ही रोमान्सच्या मूडमध्ये आहोत. डिष्टर्ब करू नका! :)
४) संस्कृतबद्दल जरा कुणी काही वादग्रस्त बोललं की साले हे संस्कृतवाले लगेच इतके भांडायला का उठतात तेच कळत नाही! :)
५) हम्म! तसा मी शांत दिसतोय, पण माझ्या वाटेला जाऊ नका बर्र का! साला जाता येता तुमच्या टाळूवर टोचा मारून हैराण करीन..! :)
६) मराठी आंतरजाल! छ्या, साला तापच आहे डोक्याला. मी आपला मिपाप्रेमी आहे ते बरं आहे! :)
७) साला या तात्याने माझ्याशी जास्त हुशार्या केल्यान तर त्याच्या पिंडाच्या आसपासदेखील जाणार नाही. अस्साच बसून राहीन वर कुठल्यातरी तारेवर! :)
धन्यावाद..
आपला,
तात्याचा काऊ!
प्रतिक्रिया
13 Nov 2008 - 1:02 pm | जैनाचं कार्ट (not verified)
काय तात्या,
स्वतः स्वतः तयार केलेले नियम मोडताय तुम्ही ;)
हा विभाग वेगवेगळ्या कलाप्रकारासाठी आहे. येथे तुमची रेखाटने, चित्रे, फोटो आणि इतर कलेचा नमुना देता येईल. फक्त कलाकृती देण्यासाठी या विभागाचा वापर करावा. एखाद्या कलाविषयावर चर्चा काथ्याकूट मधे करता येईल.
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
13 Nov 2008 - 1:09 pm | विसोबा खेचर
हम्म! कलादालनाऐवजी जनातलं मनातलं मध्ये टकायला हवं होतं!
हरकत नाही, संपादकांना गैर वाटल्यास त्यांनी उडवून लावावं! आमची काहीच हरकत नाही! :)
तात्या.
13 Nov 2008 - 1:13 pm | राघव
वा तात्या... चौथा फोटू भलताच भारी... तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय असे वाटले!!! :D
बाकी त्याच फोटूवरचे ते कॉपीराईटचे लचांड समजले नाही बुवा!
(काकदृष्टी असलेला) मुमुक्षु
13 Nov 2008 - 1:53 pm | विनायक प्रभू
तो समुपदेशन करतो आहे तात्याना.
मला माझ्या जातीचे बरोबर ओळ्खू येतात.
13 Nov 2008 - 2:14 pm | सुनील
बाकी त्याच फोटूवरचे ते कॉपीराईटचे लचांड समजले नाही बुवा!
तात्या फोटो एडीट करायला विसरले!
फोटो आणि त्याहीपेक्षा त्यावरील टीपण्या आवडल्या.
बाकी कलादालन, जनातलं-मनातलं की काथ्याकूट यावर संपादकांनी काथ्याकूट करावा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Nov 2008 - 3:41 pm | विसोबा खेचर
बाकी त्याच फोटूवरचे ते कॉपीराईटचे लचांड समजले नाही बुवा!
तात्या फोटो एडीट करायला विसरले!
तो फोटू आता एडिट केला आहे.. :)
तात्या.
13 Nov 2008 - 5:18 pm | ध्रुव
घ्या... अजून थोडे काऊचे फोटो.. (अर्थातच मी काढलेले... :) )
~
ध्रुव