हजरत पीर मलिक रहान बाबा
लढा पावनखिंडीचा यातील भाग ७ मिपावर सादर करायला मुक्त विहारींनी सुचवल्यावर तो लवकरच सादर करत आहे. त्यात विशाळगड सध्या कसा दिसतो याची अंदाज यायला सोबतची फीत सादर आहे. गड चढताना आता जरी पूल बांधल्यामुळे येता यायला सोईचे झाले तरी समोरच्या बसेस पार्किंगच्या माथ्यावरून दरीत उतरून विशाळगडाच्या चढाला सुरवात होते.
ऐतिहासिक काळात सुर्वे- दळवी यांच्या सैन्याचा तळ त्या पार्किंग भागात होता. म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्याला भिडायला दरीत उतरून यावे लागले. भाग ७ मधे महाराजांनी ते कसे घडवले ते वाचा.
फितीत शेवटी एक नव्याने बांधलेला बुरुज दिसतो. प्रेमीजनांनी लिहिलेली नावे असलेला.... त्यांची एक दुजे के लिए टाईप प्रेम कहानी सफळ झाली की नाही... असे भाष्य तिथे केले आहे...
....
या संदर्भात आणखी एक वाचनात आले की ह्या पिराच्या महतीचे कारण...
सन १९५२ मधे एका घरगुती भांडणात चोरीचा आळ घरातील सासरेबुवांनी आपल्या दोन सुनांवर घेतला. त्यांनी आम्ही चोरी केली नाही म्हटल्यावर इरेला पडलेल्या सासऱ्यांनी विशाळगडावर जाऊन पिरासमोर खरे खोटे करायचे ठरले. त्याप्रमाणे ते विशाळगडाच्या माथ्यावर पोहोचले. तिथे त्या काळात असे होत असे की हातात बेड्या घालायच्या व जो निर्दोष असेल त्याच्या बेड्या आपोआप सुटतात. ज्याच्या बेड्या निघत नाहीत त्यावर असे काही जे बोलले असेल तो खोटा व दोषी ठरतो.
त्याप्रमाणे दोन्ही सुनांच्या बेड्या गळून पडल्या पण मग सासऱ्यांनी पण ही परीक्षा द्यावी असा आग्रह झाला. तेंव्हा त्या सासऱ्यांच्या हातातील बेड्या सुटल्या नाहीत...
पुढे त्या सासऱ्यांना वाईट दशा आली... वगैरे वगैरे....
आता ती चालरीत पुढे सुरु आहे किंवा नाही याचा शोध विशाळगडावर जाणाऱ्यांनी जरूर घेवून त्यांचा अनुभव सादर करावा ही विनंती...
प्रतिक्रिया
22 Dec 2019 - 4:59 pm | योगविवेक
मजार मधील गोल गोटे उचलून धरतात त्याची आठवण झाली.
22 Dec 2019 - 8:30 pm | जॉनविक्क
पावसाळ्यात जबरा ठिकाण आहे, मस्ट गो।
बाकी ही दन्तकथा असावी असे काही ना घडले होते ना घडत असावे पण असंख्य लोक सर्वधर्माचे इथे नेहमी जातात, मी गेलो तेंव्हा पवित्र महिना चालू होता आणी १०० मीटर पलीकडे काही गैर अल्पसंख्याक लोक दारूची पार्टी करत होते
22 Dec 2019 - 11:38 pm | शशिकांत ओक
काही काळापूर्वी तिथे जाणार्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. सुरवातीला व्हिडिओ चित्रीकरण म्हटल्यावर जरा काचकूच केली पण नंतर आम्ही मराठीत बोलताना पाहून काही स्त्रियांनी मराठीत संभाषण केले. त्या मिरज भागातील होत्या. त्यांच्याशी बोलताना पाहून इतरही बोलू लागले. साधारणपणे हे भाविक कर्नाटकातून बसेस भरून येतात. मन्नत पूरी झाल्यावर ऐपतीप्रमाणे बकरा, मुर्गी आम्ही कुर्बानी करतो. ते घरून आणलेले परवडते. इथे विक्रीसाठी फार महाग देतात. वगैरे बोलणे झाले. मला बेडीच्या बद्दल माहिती तेंव्हा नव्हती. पण तिथे विशिष्ठ दिवशी दरवाजा उघडला जातो वगैरे बोलताना चित्रफितीतून कळते.
दर्ग्याच्या संपन्नतेची ओळख पाहून समजते.
या पुढे जे भेटायला वर जातील त्यांनी काही माहिती सादर करायची विनंती करतो.
22 Dec 2019 - 11:54 pm | मनो
दर्ग्याशेजारी एक मशीद आहे आणि त्या मशिदीत एक फारसी शिलालेख. त्यात मलिक रेहान म्हणतो.
"भोज नावाच्या हिंदू राजाच्या अधीन असलेला हा किल्ला मला सहा वेळा प्रयत्न करूनही मिळाला नाही. शेवटी सातव्यांदा वेढा घातल्यावर किल्ला मजकडे आला"
इ.स. १४५३ चा सुमारास अलाउद्दीन बहामनीचा सेनापती मलिक उत्तुजार विशाळगडावर प्रचंड सेनेनिशी चालून येत असताना इथल्या गहन अरण्यात शंकर मोरे नावाच्या मराठा सेनापतीने त्याचं सारं सैन्य कापून काढलं.
१४६९ मध्ये महम्मद गवाननें नऊ महिने किल्ल्याला वेढा घातला तेंव्हा त्याला किल्ला घेता आला.
असल्या पीरांना नवस करणं, त्यांना विशाळगडाचा राजा म्हणणं हे व्यक्तिशः मलातरी पटत नाही. बाकी ज्याची त्याची मर्जी आणि श्रद्धा.
23 Dec 2019 - 10:29 am | अनिरुद्ध.वैद्य
हल्ली बऱ्याच किल्यांवर पीर पब्लिकचा प्रस्थ वाढत चाललंय. लोहगडवरदेखील असाच एक दर्गा आहे.
संत अफझल खानाचा दर्गा आता फेमस झालाच आहे.
23 Dec 2019 - 1:08 pm | जॉनविक्क
अबसोल्युट नॉनसेन्स आहे सगळं प्रकरण.
23 Dec 2019 - 1:12 pm | जॉनविक्क
जी चूक महाराजांकडून झाली ती आताच्या काळात ओबामांनी केली नाही, अबोटाबाद मधे घुसून मारला समुद्रात बुडवून टाकला समाधी वगैरे झंझट नाही.
23 Dec 2019 - 2:31 pm | शशिकांत ओक
मला यातील वेढा या शब्दाने विचार करायला लावले.
या किल्ल्याची नैसर्गिक ठेवण अन्य किल्ल्यांपेक्षा वेगळी आहे. एका बाजूला खर्निंकोची दरी आहे. गजापुरच्या बाजूने येताना समोर गडावर चढायची वाट दिसत असताना तिथ जायला मात्र सध्याच्या पुलाऐवजी ७०-८० फूट खाली उतरून पुन्हा तितकेच वर आल्यावर मग उजवीकडील वळणदार वाटेने आले की मग मुंढा (मुख्य) दरवाजा लागतो.
गडाच्या मागील बाजूला मुचकुंदी नदीच्या उगमाने तयार दरीचाभाग आहे. या मागच्या बाजूला बालेकिल्ला असावा. त्या बाजूला माचाळ गावाचा कोकण दरवाजा येतो त्याला पार करायला अवघड चिंचोळ्या वाटेने जावे लागते.
मनो यांनी ऐतिहासिक संदर्भातील शीलालेखनाला सादर करून हे प्रस्थ महाराजांच्या आधीच्याकाळापासून ठाण मांडून होते. यावर प्रकाश पडला. धन्यवाद मनो जी.
या पिराच्या दर्ग्यापाशी जाऊन तिथे मन्नत मागितली जाते हा भाग सध्या वगळता, शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरून सुटून परतताना ही मशिद किवा मजार अस्तित्वात तेंव्हाही होती.
23 Dec 2019 - 4:33 pm | आनन्दा
सहजच या मलिक रेहान चा इतिहास शोधावा म्हणून गुगगले, तर पहिल्यन्दा तुनळी वरची ४ गाणीच समोर दिसतायत.
भलतेच मोठे प्रस्थ आहे हे म्हणायचे.
https://www.youtube.com/results?search_query=%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF...
23 Dec 2019 - 9:47 pm | मनो
कोल्हापूर जिल्ह्याच्या गॅझेटीअरमध्ये ही माहिती आहे.
https://books.google.com/books?id=krYBAAAAYAAJ&pg=PA323&lpg=PA323&dq=vis...
इथे बहुतेक बादशाही माळ म्हणून जी उल्लेख आहे तो औरंगझेबाच्या संदर्भात असावा, विजापूरचा नव्हे, असे वाटते.
27 Dec 2019 - 6:32 pm | दुर्गविहारी
अगदी बरोबर! औरन्गजेबाच्या स्वारीच्या वेळी आलमगीराचा मुक्काम या गजापुरच्या माळावर होता. जेव्हा मोघली सैन्याने विशाळगड ताब्यात घेतल्याची बातमी आली, तेव्हा औरंगजेब कुराण वाचत होता, तेव्हा तो जी ओळ वाचत होता, त्यात "हाजी सक्करलाना" हा शब्द होता, त्यावरुन विशाळगडाचे नाव "सक्करलाना" ठेवले गेले, अशी कथा सांगितली जाते.
24 Dec 2019 - 12:15 am | शशिकांत ओक
शेख भाई, व्हिडिओ ठीक था पर आप जब उपर पहुंचे तब खत्म हो गया. जानना चाहता हूं कि ऐसा क्या है कि इतने सारे लोग, मुस्लिम, हिंदू वहां जाते हैं? रेहान बाबा थे कौन? इतिहास में उनका नाम कैसे आता है? वे वहां कैसे पहुंचे? ये मजार कितने साल पहले से है? कहीं पढ़ा था कि वहां कुछ बेडीयां हाथ में डाली जाती है. मजार के चक्कर काटते हुए वे अपने आप निकल आती हैं? जिनकी बेड़ियां नहीं निकल आती उन्हें दोषी ठहराया जाता है? क्या यह रीत आज भी इस तरह से चलती आ रहा हैं? नहीं तो कोई नया तरीका अपनाया जा रहा है?
पाहू ते काय उत्तर देतात ते....
इथे कोणी तिथे जाऊन आले असतील तर यांनी त्यांचा अनुभव कथन करावा.
मी असल्या गोष्टी मानत नाही, वगैरे वैयक्तिक मत झाले. ज्यांनी अनुभवले त्यांचे म्हणणे समजून घ्यायला आवडेल.
25 Dec 2019 - 1:19 pm | शशिकांत ओक
या वरून विशाळगडाला फक्त दोन चिंचोळ्या वाटांमधून प्रवेश शक्य होतो, यावर प्रकाश पडेल. शिवाजी महाराजांनी गजापूरच्या बाजूच्या दरीत आधीच प्रवेश करून ती पार केली आणि एकदम ते गडाच्या बाजूच्या भागात अनपेक्षितपणे उपस्थित झाले. त्यामुळे सुर्वे - दळवीच्या सैनिकांना बाण मारून थांबवण्याच्या पर्यायाशिवाय गत्यंतर नव्हते... या कथनाला भाग ७ मधील संदर्भातील ध्याग्यातील कथनाशी जोडून पहावे ही विनंती.
27 Dec 2019 - 6:29 pm | दुर्गविहारी
प्रतिसाद थोडा उशीरा देत आहे. या दर्गावाल्या मलिक रेहानचे मुळ शोधायला गेलात तर वेगळीच माहिती हाती येते. महाराष्ट्रावर बहामनी कालखंडानंतर मुख्यत: निजामशाही, आदिलशाही आणि मोघलांचा अंमल बसला असला तरी काही छोटी संस्थाने सह्याद्रीच्या आश्रयाने तग धरुन होती. शृंगारपुर त्यापैकी एक. ह्या उरल्यासुरल्या मराठी सत्ता बुडवाव्यात म्हणून मलिक उत्तेजार नावाचा सरदार सैन्य घेउन या भागात आला. सुरवातीला त्याने शॄंगारपुरच्या सुर्वेवर स्वारी केली. प्रतिकार करता येणार नाही म्हणल्यावर सुर्वेनी त्याला युक्तीने विशाळगडाच्या जंगलात आणले. त्यानी व विशाळगडाचे शंकरराव मोरे यानी विशाळगडाच्या गहन जंगलात गाठून मलिक उत्तेजारचा पुर्ण खातमा केला. या युध्दाविषयी फेरिस्ता या ईतिहासकाराने "गुलशने इब्राहिमी" या ग्रंथात सविस्तर लिहीले आहे. हा ग्रंथ डाउनलोड करायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.
गुलशने इब्राहिमी
या सैन्यात हा मलिक रेहान होता, ज्याचे थडगे विशाळगडावर बांधले गेले. काही जणांच्या मते हा मलिक रेहान खिद्रापुरजवळच्या जुगूळच्या माँसाबी आणि मिरजच्या मिरासाहेब यांचा मुलगा, तर काही जणांच्या मते कोण्या अवलियाचा हा दर्गा.
हाजी मलंगवरचा बाबा मलंग दर्गा असु दे किंवा शनिवारवाड्याजवळचा शेख सल्ल्याची कबर या लोकानी केलेले एकमेव धर्मकार्य म्हणजे हिंदुना बाटवून मुसलमान करणे. मलिक रेहानच्या दर्ग्याच्या आडोश्याने काही वेगळे झाले नाही. अश्या या दर्ग्याला नवस बोलायला हिन्दु भाविक जातात हे आपले दुर्दैव कि अज्ञान ? या दर्ग्याचा जीर्णोध्दार १६३९ मधे राजापुरच्या कोंडुशेठ बल्लाळ यानी केला.
हा झाला मलिक रेहान दर्ग्याचा ईतिहास. बाकी साखळदंड बांधणे वैगरे जे चालते, तो सगळा शुध्द अंधश्रध्देचा भाग झाला. वास्तविक विशाळगडावर त्यापेक्षा कितीतरी महत्वाची ठिकाणे आहेत. स्वराज्यासाठी ज्यानी प्राण ओवाळून टाकले त्या बाजी आणि फुलाजी प्रभु यांच्या समाध्या , सरकारवाडा आणि राजाराम महाराज यांच्या द्वितीय पत्नी अंबिकाबाई उर्फ अहिल्याबाई या राजाराम महाराजांच्या पागोट्यावर सती गेल्या, त्यांची समाधी. पण हे सगळे सोडून विशाळगड प्रसिध्द झाला तो मलिक रेहानच्या दर्ग्यामुळे.
अर्थात आता चित्र बदलते आहे. झालेल्या जागॄतीमुळे असंख्य गडप्रेमी आणि शिवप्रेमी गडावरच्या शिवकालीन खुणा बघायला जात आहेत. गडावरच्या मुंडा दरवाज्याची डागडूजी झाली आहे, मुळ पायरी मार्ग मोकळा झाला आहे. शिवप्रेमीची वर्दळ आणि जागृती वाढली तर गडाला मुळ वैभव प्राप्त होइल अशी आशा करुया.
27 Dec 2019 - 9:19 pm | शशिकांत ओक
दुर्गविहारींच्या मताला माझी पूर्ण सहमती आहे.
27 Dec 2019 - 9:48 pm | शशिकांत ओक
शिवाजी महाराजांच्या विशाळगडाच्या मोहिमेची सांगता जुलै महिन्यात भर पावसात पावनखिडीतील कासारी नदीच्या खळाळत्या प्रवाहात उतरून हजारोंच्या संख्येने साजरी होते. हे चांगले झाले आहे. तसेच त्या पैकी काहींनी पुढे जाऊन विशाळगडावर जाऊन मोहिमेची सांगता करावी.असे सुचवावेसे वाटते.
मिपाकरांपैकी जर कोणी मनावर घेऊन जायचे ठरवले तर मला कळवा. काही नाविन्यपूर्णपणे काम करायला शक्य आहे.