हिपोक्रसी 1 - हुंडा

Primary tabs

पुनप्पा's picture
पुनप्पा in जनातलं, मनातलं
10 Dec 2019 - 6:57 am

स्थळ - कॅफेटेरिया
ती - काय रे लग्नासाठी मुली बघतोयस ना. काही प्रगती होतेय का?
तो - नाही ना. अजून काही नाही.
ती (हसून) - हुंडा वगैरे मागत नाहींयस ना?
तो - नाही. का विचारले असे?
ती - मी हुंड्याच्या अगदी विरूद्ध आहे. मुलांकडचे लोकांना पैसा सोडून काही दिसत नाही का. माझे एथिक्स आहेत, त्यामुळे मी खूप स्थळे नाकारली.
तो- बरोबर आहे. तुझे याच वर्षी लग्न झाले, तू नवरा कसा निवडलास?
ती- माझे निकष आधीच स्पष्ट होते. मुलाचा पगार माझ्या दुप्पट असला पाहिजे आणि स्वतःचा फ्लॅट हवा 2 bhk.
तो - हाच फक्त criteria होता?
ती - हो.
तो( shocked आणि मनातल्या मनात) - तू मोरल एथिक्स च्या गोष्टी करते आणि नवरा फक्त पगार च्या criteria वर निवडते?
मी हुंड्या च्या विरोधात आहे पण आयुष्यभराचा जोडीदार केवळ पैश्याच्या बेसिस वर निवडणे हे देखील चूकच आहे या मताचा आहे !!!

समाजविचार

प्रतिक्रिया

पैसा हा मुख्य मद्दा असतोच. हुंडा नव्हे दुसऱ्या रुपांत.

जॉनविक्क's picture

10 Dec 2019 - 8:03 pm | जॉनविक्क

बाबा, असे वर्मा वर बोट ठेऊ नये नाहीतर शर्माला राग येईल

त्यात काही जुने, काही नवे काही डॉ, प्रा, मी , अनेक शहाणे आणि बरेच मूर्ख ही आनंदाने बागडत असतात पुढील भाग त्यावर येणे काळास धरून होईल कारण लिखाणात विषयांचे नावीन्य लिखाण अजून रोचक बनवते

हुंडा मागणे हि एक सामाजिक प्रथा म्हणून तयार झाली की त्याशिवाय दुसरा काही alternative नव्हता, त्यामुळे कुठेतरी तुलना चुकीची वाटली

विनोदपुनेकर's picture

11 Dec 2019 - 7:15 pm | विनोदपुनेकर

हुन्डा हा नालायकपणा आहे आनि ज्यासोबत आयुश्य घालवायचे त्याचा पगार पाहणे हा भविश्याचा विचार

जॉनविक्क's picture

11 Dec 2019 - 10:00 pm | जॉनविक्क

हुन्डा हा नालायकपणा आहे आनि ज्यासोबत आयुश्य घालवायचे त्याचा पगार पाहणे हा भविश्याचा विचार

हुंड्या साठीची क्रूरता नालायकपना आहेच. पण आपण शिकले सवरलेले व कमावते असताना समोरच्या व्यक्तीचा पगार हा प्राधान्याचा मुद्दा असणे तितकेच नालायक असल्याची कबुली आहे