गुरुजी २०-२५ मुलाना घेऊन वन सहलिला निघाले असतात..
.
वाटेत अचानक विजा कडकडु लागतात..सोसाट्याचा वारा सुटतो.पाऊस सुरु होतो .व मुले घाबरतात.८-९ वर्षाची असतात
गुरुजीना बाजुलाच एक गुहा दिसते व ते मुलाना म्हणतात "मुलानो चला त्या गुहेत आपण पाऊस संपेपर्यंत निवारा घेऊ.
मुले व गुरुजी दाटिवाटीने गुहेत आंग चोरुन उभे असतात..पण एक घटना घडते..
एक विजेचा लोळ गुहेच्या तोंडाजवळ येऊन आदळत असतो..मुले घाबरतात..
हा प्रकार सारखा चालु असतो..
गुरुजी विचार करतात अन मुलाना म्हणतात..मुलानो..आपल्यामधे असा एकजण आहे ज्याला मारण्या साठी विज सारखी गुहेच्या मुखाजवळ आदळत आहे....आपण असे करु समोर झाड आहे...आपल्या पैकि एक एक जण घावत जाऊन झाडाला शिवुन गुहेत परत येईल ..ज्यावर विज कोसळणार त्यावर मधेच कोसळेल..व त्या मुळे बाकिचे तरी सुरक्षित रहातिल.
असे म्हणत.गुरुजी पळत पळत जातात झाडाला शिवतात व गुहेत येतात..विज त्यांच्यावर पडत नाहि..
असे करत सर्व मुले झाडाला शिवुन गुहेत येतात,,
शेवटचा मुलगा राहिला असतो...
सारे जण विचार करतात हाच तो असावा..मुलगा घाबरलेला असतो..पण तो धिराने पळत पळत झाडाला शिवतो...अन विज गुहेत घुसते अन मास्तर व सर्व मुलावर कोसळते.
मुलगा मात्र ते द्रुष्य आश्चर्य चकित होऊन बघत असतो...
प्रतिक्रिया
10 Dec 2019 - 7:23 pm | जॉनविक्क
कहर कलाटणी
10 Dec 2019 - 9:46 pm | mrcoolguynice
सुशिंच्या एक लहानपणी वाचलेली कथा आठवली.
असो, चांदोबा चंपक ठक ठक बोरोबरच आता
सुहास शिरवळकर साहित्याचा आनंद मिळतोय ...
कदाचित
थोड्याच दिवसात लिओ टॉल्स्टॉय, हेमिंगवे, शॉ
प्रभूतींच्या साहित्याची वाट पाहणे आले..
11 Dec 2019 - 10:03 am | mrcoolguynice
काही दुष्ट दुष्ट मिपाकर, अकुंच्या प्रतिभेचे पंख हेटाळणी करून छाटण्याच्या प्रयत्नात असतात.
आणि त्यांना हा महाराष्ट्र कधी माफ करणार नाही.
11 Dec 2019 - 5:12 pm | जॉनविक्क
ऍकच्युअली लोकांचे धाग्यावरील प्रतिसाद वाचणं आकुंच्या जीवावर येतं, म्हणजे त्यांना ते आवडतच नाही, तो त्यांच्या मनस्वी आनंदाचा भाग म्हणून बरे का आणी दुसरे काहीही कारण नाही, पण त्यामुळे अकुंच्या प्रतिभेचे पंख हेटाळणी करून छाटण्याचे प्रयत्न वगैरे परस्पर फोल ठरतात :)
महाराष्ट्रापर्यंत गोष्टी लांबतच नाहीत :)
18 Dec 2019 - 8:13 pm | मुक्त विहारि
आवडली. .