फेसबुका वर पट्टीचे पोस्ट पोस्टणारे हलवाया सारखे असतात
जातीचा हलवाई एक घाणा बाहेर काढल्यावर गिऱ्हाइकांकड़े दुर्लक्ष करून पुन्हा तन्मयतेने पुढचा घाणा तळायला घेतोच. तस असते यांचे
फेसबुक /मिसळपाव हा एखाद्या नदीच्या पाण्या सारखा प्रवाह आहे--आपल्या पोस्ट त्या पाण्या सोडल्या जाणा-या कागदी होड्या असतात. --पाण्यात सोडे पर्यंत आपण त्या होडी साठी कष्ट घेतलेले असतात.--कागदी होडी एकदा पाण्यात सोडली की आपले त्या होडीशी असणारे नाते संपते.--होडी सुंदर असेल तर दूसरा कोणीही त्या होडीची चोरी करेल.एखादा द्वेष करेल.प्रवाहात सोडलेल्या होडीत आपल्या भावना गुंतवून उपयोग नसतो.
पाऊस बरसत जातो.असे वाटते आपण ही त्याप्रमाणे विचार करावा बरसत रहावे वाहत्या प्रवाहात विचारांच्या कागदी होड्या सोडत रहावे.---व्यक्ती तितक्या प्रकृती --काही लोकांना आपले विचार आवडतात काहींना नाही.. फेसबुक/ मिपा हे स्वानंद मिळवण्याचे साधन आहे. मनस्थिती बिघडवण्याचे नाही.
प्रतिक्रिया
9 Dec 2019 - 3:52 pm | जॉनविक्क
वाचकांच्या मनस्थितीचा विचार करायचा नाही ठरवले तर तुमचे म्हणणे 200 टक्के सत्य
12 Dec 2019 - 10:25 am | mrcoolguynice
अहो त्यांनी , रूपक रुपी डिस्क्लेमर दिलाय ना ...
:)
12 Dec 2019 - 9:34 am | पाषाणभेद
बॉल कुणीच कसा टोलवला नाही?
बाकी अकुजी आपण म्हणता ते सत्य आहे. भावनिक गुंतागूंत करून उपयोग नाही.
तुम्ही लिहून जो धागा बनवलेला आहे तेवढी आमची सही होती.
12 Dec 2019 - 7:08 pm | तेजस आठवले
सगळे बॉल मारायचे नसतात. काही सोडून द्यायचे असतात.
12 Dec 2019 - 9:40 am | सोत्रि
नेकी कर और दरिया मे डाल अशा अर्थाची म्हण आहे पण त्यासाठी मुळात आधि नेकी करावी लागते!
- (दिल दरिया असलेला) सोकाजी
12 Dec 2019 - 2:44 pm | विजुभाऊ
अरेच्चा या लेखात चुंबनांचा वर्षाव विसरलेला दिसतोय
14 Dec 2019 - 10:30 pm | जॉनविक्क
अकुजींनी वर्षाव केला नाही ही एक मोठी शोकांतिकाच आहे. काहीच कळत नाहीए घोडं कुठे अडलंय!
14 Dec 2019 - 3:35 pm | मुक्त विहारि
मस्तच. ..