बघा मुद्दे पटले तर
१) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती
२) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच
३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच
४) चिवसेना :- आमचे १७५ आमदार आहेत हे आक्रमक पणे कोणीही सांगणार नाही विनाकारण ,दिल्ली शी शिव सेनेचा संपर्क कमी ,मग कोणी पाठिंबा दिला ? राष्ट्रवादी असणारच ,
परत ५ वर्ष आधी जाहीर पाठिंबा दिला होता भाजपला राष्ट्रवादी ने विधानसभा २०१४ ला ,आत्ता मुद्दाम कोणालाच नाही ,भाजप ला नाही कारण १ ते ३ ,आणि शिव सेनेला सौम्यपणे कारण सांगून मनाई केले कारण ५
५) पुनर्निवडणूक :- झाली तर (पाऊस पडणार नाही तरी पण ) जागा वाढू शकतात कारण भाजप आणि शिवसेना ह्यांचे भांडण बघून लोक विटले आहेत
जेव्हा राज्यपालांनी काल बोलावले तेव्हा शरद पवार स्वतः गेले नाहीत ,व सकाळीच राष्ट्रवादीने वेळ वाया ना घालवता जास्त वेळ मागितली ,८:३० पर्यन्त थांबण्यास काहीच त्रास नव्हता कारण काँग्रेस तास पण पाठिंबा दिला असता व देवेंद्र किंवा शिवसेने कोणीतरी साहेबांचा शब्द मानलाच असता उगाच फेर निवडणूक करण्यापेक्षा ,किंवा जास्त वेळ संध्याकाळी पण मागता आली असती ,तसेच राज्यपाल यांनी काँग्रेस ला पण आमंत्रण दिले नाही जणू त्यानं पाठिंबा मिळणारच नाही व दुपारीच राष्ट्रपती राजवट जाहीर केली अर्थात ठरलेले असू शकते
आता पब्लिक च्या डोळ्यात फक्त फक्त राष्ट्रवादी आहे शिवसेनेचा चा गेम झालाय आणि भाजप खोटारडी आहे ,जनतेच्या मते ,काँग्रेस मूग गिळून गप्प आहे
तेव्हा फायदा कोणाला ? पवार ह्यांना
प्रतिक्रिया
12 Nov 2019 - 7:26 pm | कंजूस
अमलबजावणी वेळ संपल्यावरच. लेखी दिली आहे ना मुदत.
12 Nov 2019 - 7:28 pm | हस्तर
कोणाला ?
झालि पन राजवट सुरु
12 Nov 2019 - 7:34 pm | सुबोध खरे
Give a dog bad name before you hang him
या उक्तीप्रमाणे राज्यपाल आजच काय उद्या रात्री साडे आठ पर्यंत थांबले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसला काही आमदारांच्या सह्यांचे पत्र आणता आले नसते. कारण काँग्रेसला शिवसेनेबरोबर जायचेच नाही त्यामुळे त्यांनी हे गुऱ्हाळ अजून दोन दिवस चालवले असते
मग शांतपणे राष्ट्रपती राजवट लावली असती तर पक्षपाताचा आरोप झाला नसता.
आता त्यांना आरडा ओरडा करण्याची भरपूर संधी मिळाली आहे.
अर्थात श्री मोदी किंवा श्री फडणवीस याना अशा बोम्ब मारल्याने काहीही फरक पडत नाही हे गेल्या ५ वर्षात दिसले आहेच.
पाहू या पुढे काय होतंय ते.
12 Nov 2019 - 7:43 pm | हस्तर
दर रोज नविन गुग्ली
12 Nov 2019 - 8:23 pm | Rajesh188
फक्त आणि फक्त युद्ध काळात किंवा राज्य सरकार राज्य घटने प्रमाणे चालत असेल(राज्यातील लोकांचे हित जपणे हे घटने विरूद्ध नाही) तरच राष्ट्रपती राजवट शेवटचा उपाय म्हणून लागू करने
हे घटनाकरणा सुधा अपेक्षित होते .
राज्यावर वर राज्यातील लोकांना सत्तेबाहेर ठेवून केंद्राची राजवट लादणे चुकीचे आहे
कोर्टाने ताबोडतोप केंद्र चा निर्णय रद्द करावा .
356 कलम घटने मधून हटवण्यासाठी सर्वच प्रादेशिक पक्षांनी आग्रह धरला पाहिजे .
नाहीतर दुसरा पर्याय निर्माण करावा .
जे निवडून आले आहेत त्या सर्व पक्षातील 1 व्यक्ती निवडून त्यांनी राज्याचा कारभार चालवावा .
केंद्राची लुडबुड देश बंधुत्व ला धोकादायक ठरू शकते
12 Nov 2019 - 8:24 pm | Rajesh188
राज्य घटने प्रमाणे चालत नसेल असे वाचावे
12 Nov 2019 - 8:32 pm | सुबोध खरे
राष्ट्रपती राजवट आली असली तरी चार दिवसांनी शिवसेनेने किंवा काँग्रेस किंवा कोणत्याही पक्षाने आपल्याला १४५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे लेखी पत्र दिले तर त्यांना परत सरकारात सत्ता स्थापन करता येते.
कलम ३५६ काढून टाकले आणि "तामिळनाडूने उद्या आम्ही लिट्टे बरोबर एकत्र होऊन वेगळा तामिळ प्रदेश स्थापन करतो" असे म्हटले किंवा "नागा प्रदेशच्या किंवा काश्मीरच्या लोकनियुक्त सरकारने आम्ही भारतापासून फुटून स्वतंत्र होतो" असे म्हटले तर केंद्र सरकार काय करू शकेल?
Under Article 356 of the Constitution of India, in the event that a state government is unable to function according to constitutional provisions, the Central government can take direct control of the state machinery
महाराष्ट्रासारख्या देशातील सर्वात शांत प्रदेशात राहून असे लिहिणे सोपे आहे.
तेंव्हा एकांगी लिहू नका
12 Nov 2019 - 8:44 pm | Rajesh188
महाराष्ट्र सारख्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई ही विशिष्ट हेतूने केली आहे
राज्यपाल हा निःपक्ष असावा जो पर्यंत पदावर आहे.
स्व स्वार्थासाठी केंद्रात
सत्तेवर असणारे राज्यांच्या हिताला तिलांजली देतील
तर लोक असाच विचार करतील
13 Nov 2019 - 5:56 am | चौकस२१२
उगाच राज्यपालांना बळीचा बकरा करताय.. अजूनही बहुतेक तांत्रिक दृष्ट्या कोण्ही १४५ उभे करून सत्ता स्थापनेचा दावा करू शकते
13 Nov 2019 - 9:13 am | सुबोध खरे
356 कलम घटने मधून हटवण्यासाठी सर्वच प्रादेशिक पक्षांनी आग्रह धरला पाहिजे .
याचा आणि आता तुम्ही करत असलेल्या सारवा सारवीचा कुठे संबंध आहे ?
13 Nov 2019 - 6:01 am | चौकस२१२
केंद्राची लुडबुड देश बंधुत्व ला धोकादायक ठरू शकते!
काय?
देश महत्वाचा मग राज्य.. (अर्थात अन्याय होऊ नये हे खरे) पण भारत्तात तरी घटनात्मक द्रिष्टया देश आधी बनला आणि मग राज्य
अमेरिके किंवा ऑस्ट्रेलिया सारख्या आधी राज्यसदृश्य "कॉलनी " आणि त्यांचे फेडेरेशन झाले असे भारतात झाले नाही .
किंवा युनाइटेड किंग्डम मध्ये स्कॉटलंड / इंग्लंड. इत्यादी आहेत तसेही भारतात नाही
उगाच हा राज्य/ देश वाद कशाला ?
साहेब तुंहाला खरा राग कसला आलाय? राष्ट्रवादी किंवा काँग्रेस ला सत्ता स्थापित आली नाही याचा !
12 Nov 2019 - 8:34 pm | Rajesh188
राष्ट्रपती हेच भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री असतील असे एकदाचे जाहीर करा.
त्या पदाला सुद्धा वजन येईल आणि लोकशाही चे जे धिंडवडे निघत आहेत ते सुद्धा निघणार नाहीत
13 Nov 2019 - 9:18 am | सुबोध खरे
राष्ट्रपती हेच भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री असतील असे एकदाचे जाहीर करा.
राष्ट्रपती हे सर्व देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत तेंव्हा राज्याचे आपोआप होतातच.
पंतप्रधान, सरन्यायाधीश, लष्करप्रमुख या सर्वाना राष्ट्र्पतीच शपथ देतात
अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा राज्यपाल शपथ देतात ती सुद्धा राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणूनच.
ते अगोदरच घटनाकारांनी जाहीर केलेले आहे.
प्रतिसाद देण्याच्या अगोदर आपला पूर्वग्रह बाजूला ठेवा आणि नीट अभ्यास करून प्रतिसाद द्या
13 Nov 2019 - 8:34 pm | Rajesh188
राष्ट्रपती राजवट हा पर्याय अत्यंत कठीण प्रसंगी च वापरला जावा.
आणि घटनेत 356 कलमाचा उल्लेख आहे म्हणून ते कलम वापरणे योग्य नाही आणि मला वैयक्तिक रित्या ते बिलकुल पटत नाही.
राष्ट्रपती हा देशाच्या प्रमुख असतो हे मान्य आहे.
पण ती एक तांत्रिक बाब आहे.
लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधी चा सरकार चालवण्यात सहभाग असणे खूप गरजेचं आहे.कारण ते लोकांचे प्रतिनिधित्व करतात आणि जनतेला बांधील असतात.
राष्ट्रपती राजवटी मध्ये प्रशासन राज्य चालवते आणि ते जनतेला बांधील नसते.
लोकांच्या समस्या समजून घेवून सरकार दरबारी मांडणे,स्थानिक विकासाच्या योजना सरकार ल सादर करून ती काम करून घेणे.
आणि लोकांच्या समस्या ऐकणे हे सरकार स्थापन झाल्यावर घडते..
राष्ट्रपती राजवट ही यंत्र सारखी चालते .
महानगर पालिका पासून नगर पंचायत पर्यंत आणि जिल्हा परिषद पासून ग्राम पंचायती पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्या मागे लोकांच्या लहान समूहाचा सुद्धा निर्णय प्रक्रियेत सहभाग असावा हा हेतू आहे.
लोकांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग च नसेल तर तो देश ते राज्य आपले आहे ही भावना जोर धरत नाही.
म्हणूनच स्थानिक भाषेत राज्य कारभार चालविला जातो जेणेकरून राज्यकर्ते आपले आहेत राज्य आपले आहे असे लोकांना वाटेल .
राष्ट्रपती राजवट लोकशाही chya मुळावरच घाव घालते..
सरकार स्थापन करणे कठीण होत असेल तर फेर निवडणुका हाच योग्य पर्याय आहे .
राष्ट्रपती राजवट हा पर्याय असूच शकत नाही ..निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जास्तीतजास्त 2 ते महिने च राष्ट्रपती राजवट कठीण प्रसंगी असावी त्या पेक्षा जास्त काळ बिलकुल नसावी .
घटनेत तरतूद असली तरी.
आणि हेच dr बाबासाहेब आंबेडकर ना वाटत होते .
356 कलमाचा गैरवापर करू नका .
कारण लोकशाही ला ते हानिकारक आहे.
हे माझे मत मला नाही वाटत चुकीचे आहे
14 Nov 2019 - 9:58 am | सुबोध खरे
राष्ट्रपती राजवट हा पर्याय असूच शकत नाही
परत साफ चूक
राष्ट्रपती राजवट हा एक तात्पुरताच आणि एक पर्याय आहे हे लक्षात न घेताच आपलं म्हणणं पुढे रेटताय.
मागच्या विधानसभेची मुदत संपली आहे. नवी विधानसभेचे गठन झालेले नाही. जोवर सरकार स्थापन होत नाही तोवर नवीन आमदारांचा शपथविधी होऊ शकत नाही आणि जोवर शपथविधी होत नाही तोवर त्यांना कोणताही घटनात्मक/ कायदेशीर अधिकार नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही पक्षाला सरकार बनवण्यात अपयश आले आणि ६ महिन्यांनी फेर निवडणुका झाल्या तर आता निवडून आलेल्या आमदारांना एक छदाम सुद्धा पगार किंवा निवृत्तीवेतन मिळणार नाही.
घोडे बाजार चालू असे पर्यंत सरकार अस्तित्वातच नाही हि स्थिती येऊ नये म्हणून "घटनाकारांनी" राष्ट्रपती राजवटीचा तात्पुरता पर्याय ठेवलेला आहे त्यामागे फार मोठा विचार आहे.
आजमितीला अगदी उदयाला सुद्धा कोणताही पक्ष जर १४५ आमदारांच्या संमतीचे सह्यांचे पत्र घेऊन राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापन करू शकतात
लहान बाळ चालायला लागेपर्यंत त्याला आई आधार देते तसा हा प्रकार आहे.
परत एकदा सांगतो पूर्वग्रह बाजूला ठेवून विस्तृतपणे वाचून पहा.
14 Nov 2019 - 11:54 am | सुबोध खरे
राष्ट्रपती राजवटी मध्ये प्रशासन राज्य चालवते आणि ते जनतेला बांधील नसते.
हे एक अत्यंत चुकीचे विधान.
राष्ट्रपती राजवट येते तेंव्हा विधानसभेचे हक्क लोकसभेकडे जातात.
याच हक्कांचा वापर करून जम्मू आणि काश्मीर मध्ये कलम ३७० आणि ३५ अ हे रद्द केले गेले आहे.( अभ्यास वाढवा).
आणि "लोकसभा जनतेला बांधील नसते " हे तितकेच बेजबाबदार विधान आहे.( मग कुणाला बांधील असते?)
13 Nov 2019 - 9:40 am | इरसाल
एक सकाळ पेपर सोडला तर इतर सर्व ठिकाणी मा. शरद पवार यांचा अत्युच्च महिमा गाताना कोणीच दिसत नाही.
का. काका स्वतःच भ्रमाचा भोपळा बनवुन बसलेत.
13 Nov 2019 - 12:52 pm | हस्तर
तरि पण तेच
13 Nov 2019 - 5:13 pm | हस्तर
https://www.lokmat.com/mumbai/all-speechless-mla-sharad-pawar-looks-secu...
राज्यातील या नाट्यमय राजकीय घडामोडींचे सुत्रधार म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले
13 Nov 2019 - 11:04 am | विजुभाऊ
काका नी टाकलेला गुगली सेनेला अजूनही समजलेला नाहिय्ये.
एका फटक्यात सेनेला इतिहासजमा केले आहे.
उद्धव अजूनही रा काँ सोबत चर्चेचे गुर्हाळ खेळत बसले आहेत.
सोनिया नी स्पष्टपणे सेने सोबत प्रत्यक्ष सत्तेत बसणार नाही हे सांगूनही काका नी काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे बाहेरून पाठिंबा नको हे टुमणे चालुच ठेवले आहे
राज्यपालांचे काही चुकले असे वाटत नाही. कारण सेना काय किंवा रा कॉ क्या याना बहुमत सिद्ध करन्न्यासाठी अप्रत्यक्षपणे ७२ तासाम्पेक्षाही जास्त वेळ मिळाला होता.
काकांनी सेनेचा मस्त गेम केला हे मात्र नक्की.
सेनेच्या नेतृत्वाला हे लक्ष्यात येईल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल.
ती ऑलरेडी गेलेलीच आहे. आता उरलाय तो सेनेचा निव्वळ फुगा तो ही हवा गेलेला
13 Nov 2019 - 11:08 am | prahappy
महाराष्ट्र सारख्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई ह्या वरून एकंदरीत मंडळी वादविवाद करत आहेत त्या साठी हे २ मुद्दे
१. अजित पवार ह्यांनी काल दुपारी आम्हाला ८.३० पर्यंत वेळ कमी पडेल म्हणून जास्त वेळेची मागणी केली , शिवसेनेनी पण तशीच केली पण ती वेळ गेलयावर आणि ह्यांनी खूप आधी
२. भाजप ला बोलवलं , सेनेला बोलावलं , राष्ट्रवादी ला बोलवलं मग काँग्रेस ला का नाही हा अजून एक मुद्दा - उत्तर असं कि काँग्रेस नि अजून गटनेता निवड केलेली नाही , राज्यपाल बोलावणार तरी कोणाला ?
सगळ्याच चॅनेल चा TRP हा स्काय हाय असल्याने त्यांना पुढील वाटचाली साठी हे महाशिवाघडीचं सरकारच हवंय , मी त्यात अजिबात " BIAS" वेगैरे शब्द वापरणार नाही , हे सरकार आलं तरच लोकं tv बघत बसणारेत म्हणून अश्या महत्वाच्या बातम्या ते सोयीस्कर पणे टाळणार , अजून एक उदाहरण म्हणजे शिवसेनेनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावलं वेगैरे , आज सपशेल माघार घेतलीये ह्या बातम्या ते कितीवेळ चालवणार हे मला माहितीये
बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहातच
13 Nov 2019 - 11:10 am | prahappy
अजित पवार ह्यांनी काल दुपारी आम्हाला ८.३० पर्यंत वेळ कमी पडेल म्हणून जास्त वेळेची मागणी केली , शिवसेनेनी पण तशीच केली पण ती वेळ गेलयावर आणि ह्यांनी खूप आधी - त्यामुळेच राज्यपालांनी निर्णय घेतला
13 Nov 2019 - 11:11 am | जॉनविक्क
शिवसेना सोडून आणखी कोणत्याही पक्षाचे सत्तेत यायचे स्वप्न भंगले नसल्याने, सब चंगासी!
13 Nov 2019 - 11:19 am | सुबोध खरे
शिवसेनेने शेपूट घातलंय-- राज्यपालांनी आम्हाला वेळ दिला नाही याबद्दलची कलम १४ आणि २१ खाली मूलभूत अधिकारांचे उल्लंघन म्हणून दाखल करायची "रिट याचिका" त्यांनी मागे घेतली आहे.
आता तोंड लपवण्यापुरती राष्ट्रपती राजवटीविरोधी याचिका दाखल करणार म्हणत आहेत. हि याचिका "रिट अर्ज" नसल्याने ती रांगेत लागून दोन चार वर्षांनी सुनावणीस येईल.
येथे मला स्ट्रेपसील्स ची जाहिरात आठवते आहे. त्यात एक सिंह "मोठी गर्जना" करण्याचा प्रयत्न करतो परंतु आवाज नुसता "म्यांव" असा येतो
https://www.youtube.com/watch?v=wLu4RMICW1o
13 Nov 2019 - 11:32 am | विजुभाऊ
सेनेची म्यावम्याव बरीच वर्षे चालू आहे.
या निमित्ताने ते उघडकीस आले इतकेच.
13 Nov 2019 - 12:58 pm | राघव
येवढे होऊनही, लीलावतीला अजूनही आशा आहेत.
अवांतरः
जर पुढे कधी "आपलं काही चुकलं काय" असा प्रश्न सेनेला स्वतःला विचारावासा वाटलाच तर आणि ते उत्तर होकारार्थी आलं तर, सेना कोणाला जबाबदार धरेल?
13 Nov 2019 - 5:49 pm | मूकवाचक
खोटारडेपणा आणि अहंकाराला :)
14 Nov 2019 - 11:11 am | राघव
हा हा हा... भारी! =))
13 Nov 2019 - 6:26 pm | सुबोध खरे
काही मूलभूत कार्यक्रम ज्यात शिवसेना आणि काँग्रेस यांच्या विचारसरणीतच विरोध आहे तेथे हे सरकार नक्की कसे चालेल?
सामना मध्ये श्री राऊत सनसनाटी वक्तव्ये करतात ती श्री फडणवीसांनी हसून साजरी केली होती.
पण महाशिवआघाडीचे घटक सहन करतील का?
उदा. त्यांनी असे वक्तव्य केले मुस्लिम व्होट बँक राजकारणाला आळा घालण्यासाठी मुसलमानांचा मताधिकारच रद्द करा.
https://timesofindia.indiatimes.com/india/Bar-Muslims-from-voting-writes...
उद्या मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आल्यावर नक्की काय होणार?
13 Nov 2019 - 6:37 pm | जॉनविक्क
असो, फक्त सेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले असल्याने तसेही सब चँगासी, किती सांगू मी सांगु कोणाला, आज आंनदी आनंद झाला. असो... खरे बिंडोक ते ही आहेत ज्यांनी सेना - भाजप मधे काय ठरलंय याची शहानिशा न करता मतदान केलंय आणी महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीत ढकलले. एक सुज्ञ मतदार म्हणून शरम वाटते या आळशीपणाची
बाकी उद्धवजींच्या बेरकीपणाची तगडी कसोटी लागली आहे, आत्तापर्यंतफक्त पवार आणी उद्धव ठाकरे यांच्या भोवती समीकरणे फिरली आहेत, बेरकी उद्धड आणी अनुभवी व अनपेक्षित पवार जोडगोळी काय चमत्कार करते हे बघणे खरेच उत्सुकतेचा विषय आहे.
14 Nov 2019 - 11:27 am | सुबोध खरे
सेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले असल्याने
असं झालंय असं अजून तरी म्हणता येत नाही.
आणि माझ्या सारखे लोक जे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे समर्थक आहेत त्यांना शिवसेना महा आघाडी बरोबर जाते आहे हे अजिबात रुचणारे नाही.
हे म्हणजे "सूर्याचा किरण अंधाराला सामील झाला" असे म्हणावे लागते
14 Nov 2019 - 12:42 pm | हस्तर
शिव सेने ने खूप नंतर हिंदुत्वाचा मुद्दा पकडला होता,काँग्रेस बरोबर ह्या आधी पण आघडी केली होती
14 Nov 2019 - 12:46 pm | सुबोध खरे
होय
बाळासाहेबांच्या कारकिर्दीत अगदी सुरुवातीलाच त्यांनी काँग्रेसबरोबर युती केली होती.
"बाळासाहेबांच्या काळात असं होतं, तसं होतं " याबद्दल गहिवर काढणाऱ्यांनी आणि बाळासाहेब ठाकरे धुतल्या तांदुळासारखे होते असे म्हणणार्यांनी पण विचार करावा
14 Nov 2019 - 3:59 pm | गणेशा
जनता पक्षा च्या पाठींब्यावर शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते ..he हि नमूद करावेसे वाटते ..
त्यामुळे कोणी कधी काय केले he पाहिले तर कोणीच कुठली विचारसरणी पुर्ण आचरणात आणत नाही ..
मला वाटते नाशिक महानगर पालिके वर , भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहेच .
असो
14 Nov 2019 - 4:17 pm | शाम भागवत
बरोबर.
पण मग नंतर जनता पक्षाचे नामोनिशाण उरले नाही.
शेकाप पण काँग्रेस बरोबर गेला होता.
पण मग नंतर शेकापचे नामोनिशाण उरले नाही.
डावे, समाजवादी पण भाजपा विरोधात काँग्रेस बरोबर गेले होते.
आज तेही उरले नाहीत.
जॉर्ज फर्नांडिस यांना मानणारे बरेच जण होते. ग प्र प्रधान, ना ग गोरे, मधु दंडवते, कॉ. डांगे वगैरे बरीच चांगली तत्वनिष्ठ माणसे होती.
आता तर त्यांची नावेही आठवत नाहीत. अनुयायी कुठून मिळणार?
आता काँग्रेस विरोधातला आपला अवकाश संपवून, शिवसेना गेलीय काँग्रेस व राकाँला जिवदान द्यायला.
कोणाची इच्छा असो वा नसो.
यात भाजपाच मोठा होत जाणार आहे. फक्त त्यासाठी भाजपाने पेशन्स दाखवला की झाले. ते तो दाखवत आले आहेत. आपल्या दृष्टीने ५ वर्ष खूप मोठी असतात. पण महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने ५ -१० वर्ष हा काळ फारच छोटा आहे.
मी विचारसरणीवर बोलत नाहीये. ध्रुवीकरण कसे होत चाललेय ते सांगतोय. भाजपाच्या २ खासदारांवरून भाजप मोठा कसा झाला ते सांगतोय.
असो.
14 Nov 2019 - 2:40 pm | जॉनविक्क
असेल असेल असेही असेल. पण आपला संपूर्ण प्रतिसाद म्हणजे कर्ण चाक अडकल्यावर अर्जुनाला धर्माची आठवण करून देतो तसा वाटतो म्हणून आपल्यासारख्यासाठी श्रीकृष्णाचा तेंव्हा कुठे गेला होता तुझा (युती) धर्म असे म्हणावे लागते, नाही ?
14 Nov 2019 - 4:09 pm | गणेशा
सूर्याचा किरण अंधाराला सामील झाला"
Hi लाईन खूपच मस्त आहे ..
सूर्याचा किरण अंधाराला सामील झाल्यावर पहाटेचा उदय होतो हे मात्र नक्की ..
14 Nov 2019 - 4:32 pm | हस्तर
सूर्याचा किरण अंधाराला सामील झाला"
सुर्य कोण ? भाजपा ?
15 Nov 2019 - 9:48 am | सुबोध खरे
सूर्याचा किरण अंधाराला सामील झाला"
हि ओळ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती श्री संभाजीराजे मोंगलाना जाऊन मिळाले होते त्याबद्दल लिहिली आहे.
बाकी ज्याने त्याने आपल्या "आकलनशक्तीप्रमाणे अर्थ काढावा".
13 Nov 2019 - 8:21 pm | ट्रम्प
मी तर म्हणतो काही दिवसांनी होवू द्या पुन्हा निवडणूक आणि पडूद्या गाड़ी वर फर्नांडिस आणि आठा , उठा ला त्या शिवाय यांचा माज मोडणार नाही . एकदा यांची जिरली की पुन्हा राकॉ आणि कॉ कडे ढूंकून ही बघणार नाहीत .
भापा आणि शेना दोघे ही हिंदुत्वा ला तिलांजली देवून सत्ते साठी एकमेंकाची आरत सुटले आहेत त्यांना मतदान करणारे निव्वळ मूर्ख बावळट ठरले आहेत .
13 Nov 2019 - 9:53 pm | ट्रम्प
काही गरज नाही फर्नांडिस आणि आठा उठा ला ओवाळत बसण्याची !!!!
यांच्या राक्षशी महत्वकांशे मुळेच महाराष्ट्रात ही दयनीय अवस्था झाली आहे . कोण बरोबर आणि कोण चुकीचे वागत आहे याचा विचार न करता पुढील निवडणुकीत मतदार या दोन्ही पक्षांना विरोधात निश्चित बसवीणार !!!!
जरा चकोरीबद्ध जीवन सोडून इतर लोकांचे विचार ऐकले तर भापा आणि सेनेला जनक्षोभ समजून येईल .
गोरगरीब , कामगार ,शेतकरी आणि मध्यमवर्गीय लोकांनी आघाडीपेक्षा जास्त बहुमत युतीला दिले होते , त्या लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी यांनी लवकरात लवकर सरकार स्थापण करावयास हवे होते . आता तेच मतदार भापा सेने च्या नेत्यांचे जीवन असह्य करुन टाकतील कारण हेच लोक मतदान ची टक्केवारी वाढवत असतात .
13 Nov 2019 - 10:11 pm | Rajesh188
फक्त सेना चुकीची वागली आणि bjp ची काहीच चूक नसेल असा विचार करणे एकतर्फी झाले .
काही तरी आगावू पना bjp नी केला असणार त्या शिवाय शिवसेना टोकाची भूमिका घेणार नाही.
Bjp हा पक्ष मी म्हणेल तोच कायदा असा विचार करणारा आहे .गुजरात मध्ये आतापर्यंत तोच प्रकार चालू आहे..
काळी बाजू मीडिया ला हाताशी धरून लपवून ठेवण्यात bjp तरबेज आहे.
फक्त हिंदू वादी आहे म्हणून bjp ला मत देणे योग्य नाही
14 Nov 2019 - 3:12 am | चौकस२१२
"कॉन्स्पिरसी थेरी " प्रमाणे काह्ही असू शकतं पण साधा प्रश्न आहे
- ज्याचे ५६ आहेत त्याने मुख्य पदाचा आग्रह धरावा का? आणि का?
- जनतेने युती ला जास्त जागा दिल्या हे दिसते आहे आणि त्यामुळे सेनेनं ने जरूर भाजपशी अंतर्गत घासाघीस करावी पण एक तर चव्हाटयावर जे केले ते करू नये आणि दुसरे त्यापेक्षा हि वाईट म्हणजे सरळ जनादेश सोडून राष्ट्रीय बरोबर पाट लावण्याचा प्रयत्न करणे आणि त्याचे विचित्र समर्थन !
14 Nov 2019 - 10:16 am | जॉनविक्क
तुम्हला ना अगदी काही म्हणजे काहीच कळतंच नाही बघा, अहो फक्त आणी फक्त शिवसेनेचेच सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले असताना, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आंनदी आंनद झाला म्हणून हत्तीवरून वाटायची सोडून हे काय भलतेच विधान ?
(अंजावर स्वतःची राजकीय लाल करायची हौस नसलेला निष्पक्ष)- जॉनविक्क
13 Nov 2019 - 10:17 pm | Rajesh188
मुंबई मध्ये शिवसेनेची bjp शी युती मराठी लोकांच्या हिताची आहे हा एक प्लस पॉइंट आहे
.
गुजराती,मारवाडी,मराठी हे सूत्र मुंबई मध्ये 100 टक्के यशस्वी होते.
हिंदी भाषिक लोकांना त्या मुळे मुंबई chya राजकारणात ढवळा ठवळ करता येत नाही त्यांना लांब ठेवता येते.
ज्यांना स्वतःची राज्य नीट चालवता येत नाहीत ती लोक मुंबई महानगर पालिकेत न जाणेच मुंबई chya फायद्याचं आहे
Bjp,शिवसेना ह्यांची युती चा हाच सर्वात मोठा फायदा मुंबई ,महाराष्ट्र la आहे
14 Nov 2019 - 11:24 am | सुबोध खरे
हिंदी भाषिक लोकांना त्या मुळे मुंबई chya राजकारणात ढवळा ठवळ करता येत नाही त्यांना लांब ठेवता येते.
काय सांगताय?
कृपा शंकर सिंह, गोविंदा, संजय निरुपम, मुरली देवरा, प्रिया दत्त, चरणसिंह सप्रा हे सर्व हिंदी( अमराठी) भाषिक नाहीत?
14 Nov 2019 - 1:39 pm | Rajesh188
सेना आणि bjp युती करून लढली तेव्हा तेव्हा हिंदी भाषिक जास्त नगरसेवक किंवा आमदार मुंबई मधून निवडून आले नाहीत.
हिंदी भाषिक(म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार) एवढंच अर्थ मर्यादित आहे.
सप्रा पंजाबी आहेत.आणि प्रिया दत्त पासून संजय निरुपम पर्यंत सर्व राजकारण मधून बाद झाले आहेत
14 Nov 2019 - 9:55 am | शा वि कु
अश्याप्रकारे चव्हाट्यावर आरडाओरड करून भाजप सेनेने परतीची दारं (निदान काही वर्षांपुरती) बंद केली आहेत. आणि पब्लिक समोर आक्रस्ताळेपणा सेनेनच केला. त्यामुळे सेनाच जबाबदार ह्या स्थितीसाठी.
14 Nov 2019 - 10:02 am | श्रीरंग_जोशी
नेमके कोणते सरकार पडले?
कधी नव्हे ते (जवळ जवळ पाच दशकांनी) एखाद्या राज्य सरकारने मुख्यमंत्री न बदलता महाराष्ट्रात आपला कार्यकाळ पूर्ण केला. योगायोगाने यापूर्वी अन आता तसे करणारे दोन्ही मुख्यमंत्री वैदर्भियच आहेत. तेव्हा स्व. वसंतराव नाईक अन आता देवेंद्र फडणवीस.
14 Nov 2019 - 11:45 am | मराठी_माणूस
राष्ट्रपति राजवट आल्यामुळे काय समस्या आहे ?
तसेही सत्तेसाठी झुंजणार्या लोकांच्या मनात "सामान्य लोकांच्या समस्या सोडवणे" हा मुद्दा अस्तीत्वातच नाहीय्ये.
14 Nov 2019 - 11:50 am | सुबोध खरे
आजमितीला अगदी उद्याला सुद्धा कोणताही पक्ष जर १४५ आमदारांच्या संमतीचे सह्यांचे पत्र घेऊन राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापन करू शकतात.
तेंव्हा राष्ट्रपती राजवट आली म्हणजे काही भयंकर घडलंय असे समजणाऱ्या लोकांनी अभ्यास वाढवणे गरजेचे आहे.
14 Nov 2019 - 12:28 pm | Rajesh188
आमदारांचे सही असलेले पत्र आणा हीच अडवणूक वाटते.
सरकारी ऑफिस मध्ये गेल्यावर जशी कागदपत्रांची लिस्ट वाढते आणि एका टेबल वरून दुसऱ्या टेबल वर पाठवतात तो प्रकार .
सरकार स्थापन करण्याचा दावा केल्या नंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगणे योग्य आहे.
आणि असेच केंद्रात आणि राज्यात बहुमत सिद्ध झालेलं आहे.
राज्यपाल न समोर बहुमत सिद्ध करायची गरजच काय .
कशाला पाहिजेत सह्यांची पत्र
14 Nov 2019 - 6:25 pm | चौकस२१२
कसली अडवणूक? सगळ्या पक्षांना तेच सांगितले ना? उगाच सेना कशी चुकली नाही याची कारण शोधताय तुम्ही आणि भाजपचं कसे जबाबदार असणार याची री ओढताय.. बार भाजप च नक्की काय चुकलं? त्याचा पण काही तर्क सांगत नाही .
14 Nov 2019 - 12:36 pm | सुबोध खरे
काहींच्या काही
राज्यपाल हे विधानसभेत जात नाहीत. तेंव्हा त्यांच्या समोर बहुमत सिद्ध करणे हे शक्य नाही
बाकी एम आय एम च्या दोन आमदारांनी किंवा म न से च्या एका आमदाराने सांगितले कि माझ्याकडे १४५ आमदार आहेत आणि ते मी विधानसभेत सिद्ध करतो तर त्यांना सरकार स्थापन करू द्यायचे का?
14 Nov 2019 - 12:43 pm | हस्तर
५ वर्ष आधी तसे झाले होते म्हणून बहुतेक लोकांचा अपेक्षा वाढल्या
14 Nov 2019 - 12:49 pm | सुबोध खरे
राज्यपालांनी काय करावे याचा विकल्प घटनाकारांनी त्यांच्या तारतम्यावर सोडलेला आहे (DISCRETION).
तेंव्हा त्यांनी असं करावं तसं करावं म्हणून मुक्ताफळे उधळणाऱ्यानी विचार करावा आणि अभ्यास वाढवावा हि विनंती
14 Nov 2019 - 1:01 pm | Rajesh188
सर्वात मोठा पक्ष असेल त्यांना सरकार स्थापन करण्यास सांगणे ही रीत आहे.तो करू शकला नाही तर 2 नंबर chya पक्षाला संधी दिली जाते.
ह्यात मनसे आणि mim नाही बसत.
आता पर्यंत राज्यात आणि केंद्रात ज्या ज्या पक्षांची जेवढी सरकारे स्थापन झाली त्या सर्व पक्षांनी बहुमत एवढ्या आमदार किंवा खासदार chya सहीचे पत्र राज्यपाल/ राष्ट्रपतींना दिले होते हे तुम्ही छाती ठोक पने सांगू शकता का?
मग कोर्टात जे खटले ह्या विषयावर दाखल झाले आणि माननीय न्यायालयाने काय मत व्यक्त केले हे नेट शोधून कॉपी पेस्ट करून टाकायला नको
14 Nov 2019 - 1:11 pm | Rajesh188
राज्यपाल हे केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या हिताचेच निर्णय घेतात असा इतिहास आहे.
म्हणून च सर्वोच्य न्यायालयाने ह्या विषयावर मत व्यक्त केले होते.
बहुमत हे विधानसभा मध्येच सिद्ध करायला सांगावे .
राज्यपाल ना सहीचे पत्र देवून नाही
14 Nov 2019 - 2:09 pm | Rajesh188
राष्ट्र वादी आणि काँग्रेस ची युती किती तरी वर्ष टिकली .
दोन्ही पक्षांनी एकमेकावर कठोर टीका सुद्धा केली नाही .
ह्याला काय कारण असेल .
पाठच्या सरकार मध्ये मुख्य मंत्री पद आणि महत्वाची खाती bjp कडेच होती.
ज्यांच्या जीवावर सरकार चालत आहे त्यांना किंमत n देणे .
त्यांच्या मंत्र्यांची ,आमदारांची कामे अड वून ठेवणे असले प्रकार bjp नी केले त्यात लोकांचे नुकसान झाले.
म्हणूनच ह्या वेळी सेने नी अडवणूक केली.
तशी अडवणूक केली नसती तर आता पण कमी महत्वाची खाती दिली असती .
सेनेच्या मंत्र्यांच्या निर्णयांना कचऱ्याची टोपली दाखवली असती .
ह्याच्या वर चर्चा न होता फक्त सेना कशी चुकीची आहे ह्या वरच focus केला जात आहे.
उदयन राजे चे स्टेटमेंट आठवा
राष्ट्रवादी विरोधी वागल्या मुळे उदयन राजा नी सुचविलेली कामे राष्ट्र वादी नी केली नाहीत त्या मुळे त्यांचे लोकांमधील स्थान डळमळीत झाले म्हणून ते bjp मध्ये गेले .
Same असेच bjp नी सेने विषयी केले.
14 Nov 2019 - 5:35 pm | ट्रम्प
1 ) रा/ कॉ च्या कुठल्याच नेत्यांनी आज पर्यंत मी पुन्हा येईन !! मी पुन्हा येईन !!!!!! असे फाजिल आत्मविश्वास ने म्हणले नव्हते .
2) त्यांच्या कुठल्याही नेत्यांनी पुत्रप्रेमा पोटी आघाडी तोड़ली नव्हती .
3) त्या दोन्ही पक्षांनीं होलसेल मध्ये रस्त्यावरचा माल उचलून एवढ्या प्रमाणात खोगीरभरती केली नव्हती .
खर म्हणजे हरियाणा मधील लोजपा फॅक्टर महाराष्ट्रात अवलंब केले असते तर भापा ची एवढी इज्जत गेली नसती . तिथे लोजपा च्या पायांचे तीर्थप्राशन कारायचे आणि इथे शेने ला लाथा घालायच्या हा दुट्टप्पीपणा सोवळ ओवळ संभाळणाऱ्या पक्षाने केल्या मुळे सामान्य लोकांना जास्त खुपत आहे .
महाराष्ट्रातील भापा चे हक्काचे मतदार पूर्वी पासून कमी आहेत आणि आता पर्यंत चे मिळवलेले यश हे फ्लोटिंग मतदारानीं मिळवून दिले आहे .
त्याच फ्लोटिंग मतदारांनीं महाराष्ट्रात मोदीनां लोकसभेला घवघवीत यश मिळवून दिले आणि फर्नांडिस , आठा व उठा ला आस्मान दाखविले , तरी सुद्धा महाराष्ट्रातील भापा आणि शेने ला अक्कल आली नाही आणि एकत्र यायचे सोडून रोज एकमेकांच्या नावाने शिमगा करत आहेत .
त्यामुळे येत्या निवडणूक मध्ये फ्लोटिंग मतदारानीं रा / कॉ चे अजून जास्त उमेदवार निवडून आणले तर आश्चर्य वाटणार नाही .
14 Nov 2019 - 6:01 pm | शाम भागवत
निवडणुकांतील टक्केवारी पाहिली तर भाजपाचा जनाधार वाढत चाललेला दिसतो. प्लोटिंग मते ही फक्त ३% असतात असे समजले जाते. जर भाजप १८% वरून २५% च्या पुढे गेला आहे. लढवलेल्या जागांचा विचार करता ही टक्केवारी ३१.५% च्या पुढे जाते.
तुम्ही मांडलेली माहिती मला नवीन आहे. जर मला त्याचा सोर्सची लिंक दिलीत तर आभारी असेन. विवडणूक आयोगाची लिंक असेल तर जास्त उत्तम.
14 Nov 2019 - 7:04 pm | ट्रम्प
स्टेटिकल डाटा माझ्याकड़े नाही , पण मतदान मध्ये 25 % पर्यंत भाजपचा शेअर वाढत गेला आहे तर " कहाँ से आते हैं ये लोग ? "
ज्या प्रमाणे सपा , रीपा चे परंपरागत मतदार आहेत व ते फक्त त्यांच्याच पक्षाला मत देतात त्याच प्रमाणे भाजप चा निवडणुकीत हमखास परिणाम करु शकणारा असा मतदार वर्ग नसताना 25 % पर्यंत मजल मारली तर त्या 25 % वाल्यांना फ्लोटिंग का म्हणू नये .
आता स्टेटिकली मी सिद्ध करू शकत नाही !!!!!
14 Nov 2019 - 7:33 pm | ट्रम्प
स्टेटिकल डाटा माझ्याकड़े नाही , पण मतदान मध्ये 25 % पर्यंत भाजपचा शेअर वाढत गेला आहे तर " कहाँ से आते हैं ये लोग ? "
ज्या प्रमाणे सपा , रीपा चे परंपरागत मतदार आहेत व ते फक्त त्यांच्याच पक्षाला मत देतात त्याच प्रमाणे भाजप चा निवडणुकीत हमखास परिणाम करु शकणारा असा मतदार वर्ग नसताना 25 % पर्यंत मजल मारली तर त्या 25 % वाल्यांना फ्लोटिंग का म्हणू नये .
आता स्टेटिकली मी सिद्ध करू शकत नाही !!!!!
14 Nov 2019 - 10:20 pm | शाम भागवत
तुम्ही तर अगदी मूलभूत प्रश्न विचारलाय. जरा संगतवार उत्तर द्यायला लागेल. उद्यापर्यंत देतो.
:)
14 Nov 2019 - 5:43 pm | जॉनविक्क
आश्चर्य त्यांचेच वाटते की जे सेनेवर टीका करत आहेत. इतकी मोठी अखिळाडू वृत्ती आणी त्याचे सोयरसुतक नसलेले निर्लज्ज व थिल्लर प्रदर्शन एक संवेदनशील मतदार म्हणून अत्यन्त क्लेशदायक होऊ लागले म्हणून इच्छा नसतानाही काही गोष्टी इथे लिहाव्या लागल्या हा अप्रत्यक्ष लोकशाहीतील समजूतदारपणाचा फार मोठा पराभव वाटतो आहे.
15 Nov 2019 - 10:10 am | सुबोध खरे
शिवसेना काय आहे हे सर्वजण बघत आहेत
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापलेली आणि वाढवलेली पण वंशपरंपरागत चालू असलेली जहागिरी आहे.
मा. रा. रा. आदित्य ठाकरे जी ना मुख्यमंत्री झालेलं पाहायचा होतं पण काही दुद्धाचार्यानी काडी घातली आहे.
जगदंब जगदंब
आई भवानी काय करेल ते खरे.
15 Nov 2019 - 4:21 pm | जॉनविक्क
तुम्ही तुमचे बघणेही यात घुसडल्याबद्दल समाविष्ट केल्या बद्दल अनंत आभार.
14 Nov 2019 - 6:20 pm | चौकस२१२
त्यांच्या मंत्र्यांची ,आमदारांची कामे अड वून ठेवणे असले प्रकार bjp नी केले
हे जर खरे असेल तर सेनेने मुळात युती चालू कशाला ठेवली...लढ्याचा होता ना स्वतंत्र?
दुसरे असे राजेश कि तुम्ही याचे उत्तर टाळता आहात कि ५६/१०५ पैकी ५६ वाल्याने मुख्यमंत्री पद आपल्यालाच हा हट्ट धरणे कसे योग्य ठरते? सर्वसामान्य तर्कट बसता का
निदान निम्मे निम्मे तरी आले असते तर हा हट्ट समजू शकतो
बरं सत्तेत साथीदार असताना सेनेचे लोक असं बोलायचे कि वाटायचे कि हे युतीतील साथीदार आहेत कि विरोधक
आणि तुमची अपॆक्षा ती काय मग? १०५ वॉल्य्यानी सेनेला दादा पूता करून डोकवयवर चढवून ठेवायचे?
गेल्या काही दिवसात सेनेनं मारलेल्या कोलांटउड्या इतक्या हास्यास्पद आहेत कि हसण्याच्या पलीकडे आहे ते
14 Nov 2019 - 8:16 pm | आदेश007
असं आहे की १९९९ साली शिवसेना भाजप सरकारची पहिली टर्म पूर्ण झाली. १९९९ च्या निवडणुकीत शिवसेना ६९ आणि भाजप ५६ अशा सीट मिळाल्या. काँग्रेसला ७५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ सीट मिळाल्या. ३० अपक्ष होते त्यातील बरेच शिवसेना भाजप सरकारला पाठिंबा द्यायला तयार होते.
पण प्रमोद महाजन गोपीनाथ मुंढेनाच मुख्यमंत्री करा म्हणून अडून बसले. एक महिना चर्चा चालू होती पण महाजन यांच्या हट्टामुळे शेवटी फिस्कटली. तो पर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने इतर अपक्ष जमा केले आणि शिवसेना भाजपची सत्ता गेली.
तेंव्हा कमी सीट मिळाल्या तरी मुख्यमंत्री पदाचा हट्ट करायची पद्धत कुणी सुरू केली हे तुम्हीच पाहा.
15 Nov 2019 - 9:57 am | सुबोध खरे
पूर्वग्रह दूषित प्रतिसाद
पहिली ५ वर्षे पूर्ण शिवसेनेचा मुखमंत्री होता
दुसऱ्या पूर्ण पाच वर्षात पण आमचाच मुख्यमंत्री हवा या शिवसेनेच्या हट्टामुळे भाजप शिवसेनेस विरोधी पक्षात बसावे लागले.
18 Nov 2019 - 6:50 am | चिर्कुट
मग आता -
पहिली ५ वर्षे पूर्ण भाजपा चा मुखमंत्री होता.
दुसऱ्या पूर्ण पाच वर्षात पण आमचाच मुख्यमंत्री हवा या भाजपाच्या हट्टामुळे भाजपास विरोधी पक्षात बसावे लागले. जशास तसे. :)
15 Nov 2019 - 9:55 am | सुबोध खरे
राष्ट्र वादी आणि काँग्रेस ची युती किती तरी वर्ष टिकली .
दोन्ही पक्षांनी एकमेकावर कठोर टीका सुद्धा केली नाही .
ह्याला काय कारण असेल .
साधं आहे.
"खा आणि खाऊ द्या" संस्कृती
14 Nov 2019 - 9:24 pm | Rajesh188
राजकारणी लोक डावपेच करण्यात सामान्य लोकांपेक्षा एक पावूल पुढे असतात.
कधी कधी त्यांचे डावपेच
राजकारणाच्या विश्लेषण करणाऱ्या जाणकार लोकांना सुधा खोटे ठरवतात.
आपण आपल्याला जेवढे समजले तसाच अंदाज व्यक्त करणार.
Bjp नी शिवसेना संपवण्याची पद्धतशीर तयारी केली होती सत्तेत असून सुद्धा सत्तेत सेनेचा प्रभाव कमी केला जात होता ह्याची जाणीव सेनेला होवू लागली असेल.
म्हणून च सेना विरोधी पक्षा सारखी वागत होती असा एक माझा अंदाज .
बरोबर असेल असं मी म्हणतं नाही.
लोकसभेच्या निवडणुकीत bjp ला भरघोस यश मिळाले होते.
एका पाठोपाठ घटनाऱ्या घटने मुळे मोदी जी लोक प्रियतेच्या शिखरं वर होते .
प्रसिद्ध माध्यमांना मोदी शिवाय काहीच दिसत नव्हत .
अशा परिस्थतीमध्ये सेनेला bjp विषयी आढी असून सुद्धा युती तुटणे बिलकुल फायद्याचे नव्हते.
तो आत्मघात झाला असता..
युती tutavich अशी bjp ची मनीषा होती.
त्यामुळे तयारी म्हणून काँग्रेस ,राष्ट्रवादी मधील प्रभावी नेत्यांना(ज्यांची त्यांच्या मतदार संघात वैयक्तिक छाप आहे) bjp नी भरती केली होती.
युती तुटलीच तर त्यांना bjp नी वापरले असतं.
ह्यांची पूर्ण जाणीव असलेल्या शिवसेनेची
न कुरकुर करता आणि जास्त विरोध न करता युती केली आणि bjp ला बेसावध ठेवले.
युतीचं फायदा होवून सेनेला बऱ्या पैकी जागा मिळाल्या.
काँग्रेस,राष्ट्रवादी शी आघाडी करून bjp ला आपण धडा शिकवू शकतो आणि bjp चे पितळ उघडे पाडू शकतो अशी स्थितीत पोचल्या वर उघड बंड केले.
हे माज विश्लेषण आहे.
चुकीचं असू शकत.
तुम्हाला काय वाटतं ह्या
मता वर
15 Nov 2019 - 3:57 am | कंजूस
फक्त (आपल्याच) पन्नासेक आमदारांचे पत्र घेऊन सरकार बनवतो म्हणत राऊत,बाळराजे,अजितदादा कतारमध्ये उभे आहेत.
सोनूतै तयार नाहीत. त्याच किंगमेकर ठरल्या.
15 Nov 2019 - 5:38 am | कंजूस
बातमी बदलली.
उद्धव, पवार, अहमद पटेल यांच्यात समझौता झाला.
फक्त मुख्यमंत्री ठरायचाय.
- भाजपला दणका.
15 Nov 2019 - 9:27 am | आनन्दा
सामान्यपणे त्या तिघन्चे सरकार येइल असाच अन्दाज आहे. पण तसे सरकार येणे हे शिवसेनेसाठी फारच वाईट ठरेल. कारण
१. कोंग्रेसचा मतदार प्रामुख्याने वंचित भागातून येतो.
२. राकॉ चा मतदार हा मुख्यत्वेकरुन मराठा आणि अन्य प्रस्थापित जातीमधून येतो.
३. शिवसेनेचा मतदार हा मुख्यत्वेकरुन मराठी, कुणबी आणि हिन्दुत्ववादी मराठा - ज्याला पवार आवडत नाहीत असा आहे.
अश्या परिस्थितीत जर पवार आणि ठाकरे एक झाले, तर शिवसेनेचा हा हिन्दुत्ववादी मतदार मोठ्या संख्येने भाजपाकडे जाऊ शकतो. हिंदुत्ववादी मतदार हा प्रामुख्याने काँग्रेसचा विरोधी मतदार असतो. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांपेक्षा देखील कोंग्रेसविरोधी मते या विषयात महत्वाची ठरतात.
नेते लोकांना जरी या आधाडीने आनंद झाला तरी शिवसेना व्हिक्टिम कार्ड किती चांगल्याप्रकारे खेळते यावर शिवसेनेचे भविष्य अवलंबून आहे.
याउलट भाजपाकडे आयते व्हिक्टिमकार्ड आलेले आहे, ज्यचा वापर करुन तो आपली पहिले मते तर राखेलच, पण त्याचसोबत शिवसेनेच्या वाट्यातली नाराज मते देखील घ्यायचा प्रयत्न करु शकतो.
आता अन्य काही गोष्टी
१. शेतकरी मुद्दा - भाजपाची मुख्य ताकद शहरी भागात आहे (जिथे शिवसेनेची देखील ताकद आहे), जिथे कर्जमाफी हा मुद्दाच नाहीहाउलट कर्जमाफी म्हणले की वसकन अंगावर येणारेच लोक जास्त आहेत.
२. अश्या परिस्थेतीत सत्ता घेऊन कर्जमाफी दिली, तरी त्यातून नेमके पदरात काय पडेल हे सांगणे कठीन आहे. त्याची अंमलबजावणी तर कठीणच, कारण न्यायलये आणि कॅग यात मोडता घालू शकतील (कायदेतज्ज्ञानी याबाबात शहानिशा करावी कृपया).
३. बदलत्या परिस्थितीत कोंग्रेसशी जुळवुन घेणे, आणि हिंदुत्ववादी मतदार राखणे या दोन दगडांवर पाय ठेवायला शिवसेनेला ज्या कोलांट्या मारायला लागतील त्याची कल्पना करता शिवसेना अधिकाधिक हास्यास्पद होत जाऊन कालांतराने राज ठाकरे च्या पंक्तीत जाऊन बसेल
४. खरेच जर युती तुटली, आणि भाजपा ने मनसे शी आघाडी केली, तर मुंबै महानगरपालिका देखील शिवसेनेच्या हातातुन जाईल. राज ने भाजपाशी युती केली, तर ठाकरेना मानणारा हिंदुत्ववादी मतदार त्यांच्यामागे जाउ शकतो.
त्यामुळे एकंदरीत हे सरकार हा मानसिक समाधानासाठी शिवसेनेसाठी ज्वालामुखीवर बसुन पोळी भाजण्याचा प्रकार आहे असे माझे मत आहे. खरेच जर तसे झाले तर पुढच्या पाच वर्षात राज ठाकरेनी पुन्हा उभारी घेतली तर आश्चर्य वाटायला नको.
किंबहुना, मला तर कायमच असे वाटतेय की हा सगळा चाललेला प्रकार म्हणजे राज ठाकरेंच्या सभांचे आघाडीने चुकते केलेले बिल आहे.
15 Nov 2019 - 1:29 pm | Rajesh188
काँग्रेस ची खूप वर्ष सत्ता देशात होती bjp आता आली आहे.
काँग्रेस ,राष्ट्रवादी नाव वेगळी असली तर त्यांचा मतदार एकच आहे
व्यक्ती बघून मतदान होते .
कोणत्याही विभागात 100 लोक राहत असतील तर त्या मधील 7 ते 8 लोकच सक्रिय राजकारणात असतात बाकी त्यांच्या पाठी चालतात .
खूप वर्ष सत्ता असल्या मुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ल पारंपरिक राजकीय कार्यकर्ते आहेत ते बाकी पक्षा कडे नाहीत
ग्रामीण भागात समस्या एकच प्रकारच्या असतात पण त्या मुळे त्या लोकांना स्वतः कडे वळवण्यासाठी उपाय पण एकच असतो.
शहरात ( मोठ्या ,) तसे नाही दहिमिसल झाली असल्या मुळे समस्या असंख्य असतात आणि उत्तर पण अनेक
हिंदुत्व हे सर्व शहरी लोकांना एक करू शकत नाही कारण जगात सर्व ठिकाणी असलेला ज्वलनत प्रश्न स्थानिक लोक आणि परप्रांतीय लोक ह्यांना धर्म एक करू शकत नाही .
महाराष्ट्र मध्ये अशी अवस्था मुंबई पुण्या मध्ये आहे
हिंदू पण दहीमिसल
वाला स्थानिक हिंदू स्वीकारत नाही.
कर्ज माफी हा ग्रामीण प्रश्न आहे पण शहरात राहणारे पण ग्रामीण नाळ असणारी लोक शहरात सुधा बहु संख्येने आहेत ह्याचा विसर नसावा
15 Nov 2019 - 5:39 pm | गामा पैलवान
आनन्दा,
काँग्रेस आणि शिवसेना यांच्या घरोब्याची उदाहरणं देतांना तत्कालीन परिस्थितीकडे दुर्लक्ष होतंय का? जुनी काँग्रेस इंदिरेची होती. तिच्यात नाही म्हंटलं तरी इंदिरेला पक्ष वाढायला हवा होता. आजची काँग्रेस पप्पूची आहे. पप्पूस पक्ष वाढवायची काडीइतकीही अक्कल नाही. मग काँग्रेसच्या नेत्यांनी सोनियासाठी कशाला काम करायचं? उद्धव काय वाईट आहे? निदान पवारांसारखा वापरून फेकून देणारा तरी नाहीये. उद्धवसोबत जाऊन स्वत:चा सवतासुभा राखता येतो. पवारांच्या सोबत गेलं तर तोही राखणं मुष्कील! मग काँग्रेसही फुटू शकते ना?
आज पवार व काँग्रेस मिळून शिवसेनेला पाठींबा कशासाठी देताहेत? नाही दिला तर नवनिर्वाचित विधानसभा एकदाही न भरता बरखास्त होईल या भीतीने. आज या क्षणी निवडणुकांना परत सामोरं जायची हिंमत फक्त उद्धवकडे आणि केवळ उद्धवकडेच आहे.
मला वाटतं आजच्या घडीला हे धाडस मुख्यमंत्रीपदाचा दावा सांगायला पुरेसं आहे.
आ.न.,
-गा.पै.
15 Nov 2019 - 9:34 pm | ट्रम्प
हि निवडणूक मराठी मतदारानींच चारशंकू करुन ठेवली यात शंका नाही !!!
जो मराठा मतदार लोकसभेला मोदीसाहेबांच्या पाठीमागे भक्कम उभा राहिला त्याच मतदारानीं चार ही पक्षांची शर्यत लावून दिली . पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघातील भाजप चा उमेदवार फक्त 4560 मतानीं पडला ( राष्ट्रवादी च्या माजी आमदार ला भाजप मध्ये जाहिर प्रवेश दिला , त्या राकॉ च्या आमदराच्या पाठोपाठ त्याचे कार्यकर्ते सुद्धा भाजप मध्ये गेले , रात्रीत व्हाट्सएप चे डीपी घड्याळ ऐवजी कमळ झाले तरी भाजपचा उमेदवार पडला )
गेल्या वेळेस च्या आठ जागा पैकी सहा जागा भाजप नी जिंकल्या त्यातले चार जण काठावर पास आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे भाजपचा जनाधार या वेळी कमी झाला .
विधानसभा निवडणूक मध्ये अस क़ाय घड़ल की भाजपा सेने ला अब की बार 225 (लोकप्रिय घोषणा) पार न करता दोघांची सीटे कमी करुन रा / कॉ च्या पदरात टाकली .
काँग्रेस तर दिल्लीच्या राजाच्या पाठिंब्या शिवाय लढली तरी गेल्या वेळेपेक्षा जास्त उमेदवार निवडून आले .
त्याच प्रमाणे राष्ट्रवादी चे जवळ जवळ निम्म्मे सेनापती भाजप च्या आश्रयला पाळाले होते , भ्रष्टचारा मुळे बदनाम होती तरी गेल्या वेळेपेक्षा जास्त सीटे निवडून आली !!!
याच्या अगदी उलट भाजप , दिल्ली तून सगळे मंत्रिमंडळ दिमतीला होते तरी गेल्यावेळे पेक्षा कमी सीटे !!!
कुठे तरी वाचले होते की भाजप शेने चे बरेच से आमदार चारपाच हजारांच्या फरकाने निवडून आले आहेत , म्हणजे याचा अर्थ पेपर खूपच अवघड गेला होता .
16 Nov 2019 - 8:04 am | बबन ताम्बे
विद्यमान भाजप आमदारांबद्दल नाराजी होती. फार काय कामे केली नाहीत पाच वर्षांत.मी त्याच मतदारसंघात रहातो.
16 Nov 2019 - 11:53 am | ट्रम्प
विद्यमान आमदार नी वार्ड मध्ये काय ! काय !! कामे केली ? जनमानस आता पुन्हा अनुकूल आहे का ?याचा तापास आय टी सेल चा ढिंढोरा पिटणाऱ्या भाजप ने करायला नको ?
किती दिवस अजून मोदींच्या नावाने जोगवा घेवून फिरत बसणार ? विद्यमान आमदार , मुख्यमंत्री यांनी मतदार घड़वायला नको ?
वडगाव शेरि माधिल भाजप च्या त्या आमदार कड़े कोणी सार्वजनिक हिताची कामे घेवून गेले की " तुमच्या एरियात मला मतदान झालेले नाही !! मग मी तुमची कामे का करू ? " असे गर्मी ने ऊत्तर द्यायचा.
परिणामी राष्ट्रवादी च्या नेत्यांनी भाजप साठी आवाहन करुन देखील मतदारानी भाजप च्या मुळीक ला घरी बसविले आणि राकॉ च्या टिंगरे ला निवडून आणले . त्यामुळे सत्तेतून आलेली गुर्मी तुमचा नाश करु शकते हे भाजप च्या वरिष्ठ नेत्यांना कधी समजणार ?
16 Nov 2019 - 3:26 pm | बबन ताम्बे
काम न करणाऱ्या आमदाराला, नगरसेवकाला पुढच्या निवडणूकीत घरीच बसवावे. काही नाही केले तरी पक्षाच्या,नेत्यांच्या नावावर निवडून यायचे दिवस गेले.
15 Nov 2019 - 2:16 pm | Rajesh188
राज्यपाल हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर च निर्णय घेतात हा देशाचा इतिहास आहे
निवृत्ती सोय म्हणून च ह्या पदाचा वापर केला आहे.
सक्रिय राजकारण करू शकत नाहीत अशा पक्षीय नेत्यांना राज्यपाल पद दिले जाते..
शिव आघाडी सरकार बनवण्यात यशस्वी होतेय असे दिसले की राज्यपाल मार्फत bjp अडथळा आणयचा प्रयत्न करेल हे भाकीत
आत्ताच करतो
15 Nov 2019 - 3:10 pm | हस्तर
कसा राज्यपाल मार्फत bjp अडथळा ?
15 Nov 2019 - 7:45 pm | सुबोध खरे
भाजप अडथळा आणण्याचा प्रयत्न करणारच. कारण तो तर विरोधी पक्ष असेल.त्यांचं कामच आहे ते.
श्री फडणवीसांना सुद्धा श्री शरद पवारानी भरपूर अडचण करण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षण, कर्जमाफी सारखे अनेक प्रश्न उभे करून.
फडणवीस त्याला पुरे पडले हि गोष्ट वेगळी.
आता येणाऱ्या आघाडीत असा परिपकव ( mature ) मुख्यमंत्री मला तर फक्त श्री "उद्धव ठाकरे"च दिसतात. कदाचित एकनाथ शिंदे हे उमेदवार असू शकतील परंतु त्यांची भाजपशी असलेली जवळीक काँग्रेस/ राष्ट्रवादीला पचणार नाही.
बाकी संजय राऊत, अजित पवार, आदित्य ठाकरे इ सर्व प्यादीच आहेत.
आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण दिग्गज आहेत परंतु त्यांच्या पदाला कोणी पाठिंबा देणार नाहीत.
किन्वा अशोक चव्हाण. पण ते आदर्शच्या कलंकातून अजून तरी सुटलेले नाहीत आणि न्यायालयाने ठपका ठेवला असल्याने त्यात कोणीही राजकारणी हात घालण्याची शक्यता कमीच आहे
पाहू या काय होतंय ते.
15 Nov 2019 - 8:40 pm | धर्मराजमुटके
सगळ्या राजकीय गोष्टींमागे पवार साहेबांचा हात आहे हे महाराष्ट्रात अनेकानेक वर्ष चालत आलेले आवडते वाक्य आहे.
15 Nov 2019 - 10:42 pm | Rajesh188
एका सेना ,bjp च का फाटलं ह्याची सर्व कारण शोधण्यात सर्व राजकीय विश्लेषक लोकांनी उलट सुलट विचार मांडून डोकं बधीर केले जनतेच्या .
त्यात सेना आणि bjp ची उलट सुलट आरोप प्रत्यारोप कशाचा कशाला मेळ नाही.
नंतर पवार साहेबांनी काडी घातली आणि आम्ही पाठिंबा देतो असे सांगून शिवसेनेला वेडे केले.
अजुन राष्ट्र वादी ,काँग्रेस,सेनेची चर्चा च चालू आहे .
काही निर्णय नाही ..
अक्षर शां फालतुगिरी चालू आहे .
आता संबंधित यंत्रणेने आपल्या अधिकाराचा वापर करून हे नाट्य थांबवावे.
Vaitak आलंय आता
16 Nov 2019 - 9:43 am | सुबोध खरे
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हेतूंबद्दल काँग्रेसला अजूनही खात्री वाटत नाही त्यामुळे ते शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यास काँग्रेस चालढकल करत आहे
-- आजची लोकसत्तेची ठळक बातमी.
18 Nov 2019 - 10:32 am | जॉनविक्क
ग्रेसची अस्तित्वाची लढाई चालू आहे त्यामुळे, ते ताकही फुंकून प्यायच्या मूड मधे आहेत. सेनेशी त्यांची युती होणे आणी स्थिर सरकार 5 वर्षे मिळणे ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाची बाब ठरेल.
16 Nov 2019 - 3:16 pm | मराठी_माणूस
एक परखड विश्लेषण
https://mumbaimirror.indiatimes.com/opinion/columnists/shobhaa-de/the-ba...