दिवाळीत लक्ष्मी पूजनाची खरेदी आटपल्यावर आम्ही डेक्कन वरच्या रुपाली हॉटेल मध्ये खादाडी करायला गेलो होतो
बिल दिल्यावर काउंटर वर गप्पा मारताना क्याशीयर म्हणाला उद्या लक्षणी पूजना निमित्त हॉटेल तर्फे सर्व ग्राहकांना मोफत शिरा वाटप आहे नक्की या
मी गेलो होतो साजूक तुपातला काजू बेदाणे मिश्रित शिरा चापला हि सकाळी रांगोळी आदी सजावटीत गर्क असल्याने आली नव्हती
मालकांनी २ प्लेट शिरा पार्सल करून दिला
घरी आल्यावर तो पण चापला
प्रतिक्रिया
10 Nov 2019 - 10:01 am | जॉनविक्क
मी सुद्धा तिथे होतो... फक्त बेदाणे हुडकून खायचो आणी शिरा भिकाऱ्यांना वाटून टाकायचो, असे करत करत 35 प्लेट शिरा माझ्यामुळेच संपला.
10 Nov 2019 - 11:39 am | धर्मराजमुटके
अरे बापरे ! मला वाटले की तुमच्या अजून कोणत्यातरी कथेत नायकाची पत्नी मेली आणि त्याने कामवालीबरोबर लग्न केले की काय ?
कथांमधून अगदी बायका मारण्यापेक्षा त्यांना घसटफोट देत जा हो तुम्ही. तेव्हढाच त्यांच्या जीवनात बदल !
:)
14 Nov 2019 - 2:03 pm | हस्तर
तुम्ही खूपच सभ्य हो,रुपाली हॉटेल बघून मला वेगळाच वाटलं
14 Nov 2019 - 10:11 pm | धर्मराजमुटके
हो तर ! आम्ही रंग बदलणारा सरडा नव्हे ! सरड्याची धाव कुंपणापर्यंतच मधला सरडा :)
10 Nov 2019 - 9:04 pm | सुचिता१
मध्यंतरी लेखन संन्यास घेतला होता बहुतेक़... काय झालं पुन्हा??
11 Nov 2019 - 10:54 am | श्वेता२४
संन्यास झेपला नसेल
10 Nov 2019 - 9:25 pm | सतिश गावडे
अप्रतिम लेख. "फुकट ते पौष्टिक" आणि "ज्याचा खावा शिरा त्याची जाहिरात करा" या दोन म्हणी आठवल्या.
लक्षणी देवतेचे काही व्रत वगैरे केले होते का हाटेल वाल्यानी?
11 Nov 2019 - 8:39 am | गड्डा झब्बू
तुम्ही संन्यस्ताश्रमातून पुन्हा साहित्यीकाश्रमात परतल्याचा आनंद झाला गुरुदेव __/\__
11 Nov 2019 - 11:08 am | विजुभाऊ
अरेच्चा .
क्रमशः लिहायचे राहून गेलेय का?
कारण अजून घट्ट मिठी , चुंबनांचा वर्षाव वगैरे काहीच आले नाही लेखनात.
11 Nov 2019 - 3:44 pm | खिलजि
गुरुदेव हे फोटूमध्ये निळ्या रंगात आपण आहेत का ? मना तुम्हाला डोळे भ्रुण पाहायचंय है .. गुरुदेव सांगा ना , या भक्ताला कुठं भेटशीला ..
11 Nov 2019 - 4:16 pm | सोत्रि
तुमच्या गुर्देवांचे फटू आणि फेसबुक भिंत बघा त्यांचा अनुग्रह घेण्यासाठी तुम्ही त्रिखंडात कुठेही जाल. तुमची श्रद्धा त्रिगुणित होइल.
- (अकुंची FB भिंत बधून सद्गदीत झालेला) सोकाजी
14 Nov 2019 - 2:02 pm | हस्तर
तुम्ही फक्त भिंत बघातलियी ,आम्ही ऑर्कुट पासून ओळखतो ,भेटलो पण आहे
14 Nov 2019 - 2:56 pm | जॉनविक्क
हे आपणास माहीत असावे असे गृहीत धरता येउ शकते काय ?
14 Nov 2019 - 3:10 pm | हस्तर
खरच नाहि
11 Nov 2019 - 6:56 pm | दुर्गविहारी
LOL ! प्रतिसाद वाचून हसून मेलो. :-)))
13 Nov 2019 - 10:36 pm | नाखु
ताणून चाललेल्या रणधुमाळीत हा शिरा बरा.
बाकी स्त्री पात्र विरहित अकु कथा असू शकते यावर अखिल मिपा वाचक महासंघाचा विश्वास बसणे कठीण आहे.
कुठे आहेत अच्छे दिन या नियतकालिकातील सन्यास ते उपन्यास या सदरातून साभार
14 Nov 2019 - 2:04 pm | हस्तर
कंमेंट डिलिट करा नाहीतर किन्नर कथा येईल
14 Nov 2019 - 9:29 pm | नाखु
लेखनक्षमतेवर जगनियंत्ता काबू ठेवू शकत नाही तर मी कोण पामर
वाचकांचीही पत्रेवाला नाखु
17 Nov 2019 - 1:59 am | श्रिपाद पणशिकर
निसो जोमात वाचक कोमात ह्या कळपाचा सदस्य असलेला
नाखुन वाचकांची पत्रेवाला.
अबि जम्या :)
15 Nov 2019 - 5:47 pm | हस्तर
हिथे खरंच खूप हुशार लोक आहेत
फोटोवर २०११ लिहिलेय मला वाटले कोणाच्या तरी लक्षात येईल
15 Nov 2019 - 8:38 pm | धर्मराजमुटके
ते लक्षात आल्यावर परिस्थिती बदलणार आहे काय ?
फडणविसांनी त्यांना पक्षांतर्गत अडचण होईल म्हणून २०११ च्या ऐवजी २०१९ ला जाहिर करुया अशी उद्धवजींना विनंती केली असेल तर ??
17 Nov 2019 - 10:21 am | जॉनविक्क
आपल्या लक्षात आलेले दिसतं नाही ?
15 Nov 2019 - 9:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला शी-याचे सर्व प्रकार आवडतात. आता रूपालीला शोधणे आले.
-दिलीप बिरुटे
16 Nov 2019 - 2:13 pm | सुमो
पण सकाळी सकाळी हनुमान टेकडी वर फिरायला जाणं
परतताना रुपालीचा उपमा नि खोबर्याची चट्णी खाणं
ऑफिसला जाताना वैशालीत उत्तप्पा विथ ग्रीन चटणी चापणं
लंच ब्रेक मधे आम्रपालीत मलाई कोफ्ता बटर पराठा खाणं
अन इतकं सगळं झाल्यावर लाइट खायला हवं असं म्हणून
संध्याकाळी वैशालीत शेव बटाटा दही पुरी उर्फ एस्पीडिपी खाणं
पुण्यातल्या खूप आठवणी या निमीत्ताने जाग्या झाल्या!
16 Nov 2019 - 9:57 pm | श्रीरंग_जोशी
तुमचा हा प्रतिसाद वाचून मला मन्या परांजपेची आठवण झाली :-) .