झेलल्या जरी कितीही
शत्रूने दिलेल्या जखमा
भारतमातेचे रक्षण करण्या
मी पुन्हा येईल..
बळीराजा आज ठरला
अन्यायाचा जरी बळी
शेते हिरवीगार करण्या
मी पुन्हा येईल..
सत्य लिहावे लेखणीतून
लेखणी पडली मोडून
सत्याचा आग्रह धरण्यास
मी पुन्हा येईल..
केली जरी लक्तरे
माझ्या शरीराची त्यांनी
चंडीचं रूप घेऊनी
मी पुन्हा येईल..
जातीधर्माच्या आंधळ्या लढाईत
मोडून पडलो मी
एकसंध समाज बनविण्या
मी पुन्हा येईल..
कमी आहे आयुष्य
माहित आहे जरी
मृत्यूला कवटाळून जगण्यासाठी
मी पुन्हा येईल..