ये रे ये रे पावसा
तुला देते पैसा
अंतरीचा दाह सांग
विझवु मी कैसा
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
जीव आता थांबना
पेटले मी ऊरी
सर आली धाऊन
मडके गेले वाहुन
यौवनाच्या वर्षावात
आले मी न्हाउन
पाउस कस्सा बाई छान
माझ सगळ भिजल रान
घागर माझी आक्खी भरली
हरपून गेल बाई भान
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
»
प्रतिक्रिया
11 Nov 2008 - 12:01 pm | विसोबा खेचर
वा! सुंदर काव्य...
भावना का काय म्हणतात त्या उचंबळून आल्या..! :)
तात्या.
11 Nov 2008 - 12:17 pm | बिपिन कार्यकर्ते
वा!!!
=)) =)) =))
बाकी विप्र भेट झालेली दिसते आहे... फारच क्रिप्टिक काव्य झाले आहे.
बिपिन कार्यकर्ते
11 Nov 2008 - 12:41 pm | विनायक प्रभू
भेट अजून झाली नाही तर ही अवस्था झाल्यावर काय होईल.
11 Nov 2008 - 12:45 pm | ब्रिटिश
ईस्कोट व्हईल क?
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
11 Nov 2008 - 12:20 pm | अनिल हटेला
:)) :-))
येउ दे रे बाला अजुन पन काव्य !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
11 Nov 2008 - 12:48 pm | विनायक प्रभू
हा जल्ला सुखी सहजिवनाचा चा कोट
11 Nov 2008 - 12:57 pm | ब्रिटिश
कोट नाय, रेनकोट
तात्या भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
11 Nov 2008 - 12:58 pm | जैनाचं कार्ट (not verified)
=))
जल्ला ! सगला काय आजचं ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
11 Nov 2008 - 1:21 pm | विनायक प्रभू
पाउस पडला जोरदार
माती झाली ओली
नव्हती जवळ गोळी
अयकु लागल्या दळणावर
अंगाईच्या ओळी
11 Nov 2008 - 1:38 pm | जैनाचं कार्ट (not verified)
=))
जबरा प्रभुदेवा ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
11 Nov 2008 - 4:36 pm | ब्रिटिश
लई बेष्ट
बंदुक वापरनार्यान गोल्या बी जवल ठिवाव्यात
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
12 Nov 2008 - 12:00 am | विसोबा खेचर
साला हा प्रभूमास्तर एक नंबरचा चावट मनुष्य आहे! :)
(प्रभूमास्तरांचा लाडका विद्यार्थी) तात्या.
11 Nov 2008 - 9:15 pm | रामदास
दंड भरा आता.
प्रभू मास्तरपण बसले आता.(छंदशास्त्र नव्या अंगानी जातंय)
अवांतरः अंग हा शब्द एकेरी अर्थानीच लिहीला आहे.
11 Nov 2008 - 9:55 pm | टारझन
पण ते अंग दुसर्याच अर्थाने एकेरी वाटलं ना भो ...
अवांतर गाणं : काळ्या मातीतं मातीतं ... तिफन चालते .. तिफन चालते ...
हे एकेरी अथाने आहे हो ... सुंदर गीत...
(क्रिप्ट अफ्रिकाना)
टारझन जंगली
12 Nov 2008 - 5:22 pm | विनायक प्रभू
बसले?????????????????????????????????????????????????????
रिंगणात उतरले संयुक्तिक होईल.
12 Nov 2008 - 7:20 pm | ब्रिटिश
जल्ला तूमी कदिपासून बसाला लागलात ?
खी खी खी
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)