मित्रांनो तसा मी या संकेतस्थळावर नवीनच! म्हणजे येउन बरेच आठवडे झाले...पण नुसतंच वाचन झालं...ते ही कधी कधी...सबबी भरपूर आहेत. पण त्यात वेळ न घालवता मुद्याचं सांगतो. आज ब-याच दिवसांनी पंडित कुमार गंधर्वांचे मनाला अल्लद भिडणारे आणि सुरांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घ्यायला लावणारं अत्यंत तरल असं गाणं ऐकलं आणि जमेल तेवढयांना सांगावसं वाटलं. म्हणून हा खटाटोप. गाण्याचे बोलः "आज आनंद मना, मोरा जो पिया घर आया" मालकंसातली ही रचना. इथे गाण्याची फाइल जोडण्याची व्यवस्था असती तर जरुर पाठवली असती.