आठवण (देवद्वार छंद)

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
10 Nov 2008 - 1:23 pm

माझ्याकडुन एक प्रयत्न

मन हे कातरं
होई संधिकाली
प्रेमाची सावली
हरवली ||

भुक ना तहान
होइ जीव वेडा
विरहाची पिडा
ह्रुदयात ||

तुझी आठवण
भान हरपते
मन ना लागते
कशातच ||

नित्याचि चाहुल
कानात साठते
गळा दाटवते
नित्यनेमे ||

लागे हुरहुर
आता नाही भेट
दाखव तु वाट
अंधारात ||

थांबले स्पंदन
उर हा फुटला
विरह दाटला
सर्वदुर ||

तेवतो प्रकाश
मंद गाभार्‍यात
पेटवुन ज्योत
समईची ||

सुंदर ते ध्यान
डोळे साठवती
मिळे मनःशांती
काही वेळ ||

पुन्हा दिनक्रम
पुन्हा संध्याकाळ
मिळे पाठबळ
नामासंगे ||

अवांतर : धोडोंपंताकडुन बरचं काही शिकायला मिळणार तरं :)

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Nov 2008 - 4:29 pm | विसोबा खेचर

सुंदर कविता..!

चेतन's picture

10 Nov 2008 - 5:27 pm | चेतन

धन्यवाद तात्या
तात्या कविता छंदशास्त्र प्रकारात कशी टाकतात ? हे सांगा ना

चेतन