आई बाबा आणि स्मार्ट फोन

Primary tabs

मृणमय's picture
मृणमय in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 6:19 am

लोकं स्मार्ट फोन का घेतात त्याला वेगवेगळी करणे आहेत. तरुण पिढीला स्मार्ट फोन हातात असला कि जास्त स्मार्ट झाल्यासारखे वाटते तर जुन्या पिढीला परवडतो हेच एकमेव कारण. तो कसा वापरायचा ...त्यांच्याच भाषेत सांगायचं तर चालवायचा हे माहित नसते. माझ्या आई बाबांना व्हाट्स अँप छान चालवता येते, यु ट्यूब, व्हिडिओ कॉल छान जमतो. हि आयुधे काही तलवारबाजी आणि नेमबाजी पेक्षा कमी नाही आहेत बरंका. एरव्ही नेम बारोबर बसला कि समोरचा माणूस घायाळ होतो आता त्याच्या अगदी उलट होते. त्या छोट्याश्या की पॅड वर किती ध चे मा होत असतील म्हणून सांगू?

आई आणि अश्वत्थामा ( तोच तो महाभारतात ला) ह्यांच्यात खूप साम्य आहे बरका. तिला हि सगळ्या गोष्टींची अर्धवट माहिती असते. व्हिडिओ लावायचा पण आवाज कसा कमी जास्त करायचा माहित नसते ( तो नेहमी फुल्ल सुटलेला असतो ) किंवा बघून झाले कि विंडो बंद करायची असते हे माहित च नाही. माहित नाही म्हणण्या पेक्षा गरजच नाही. एका वेळी हजार विंडोज ओपन असतात आणि मग फोन हँग होतो. मग काय, तो फोन आणि आई दोघे धारातीर्थी पडलेले असतात. मग मला हि काळात नाही कि आधी कुणाकडे बघावे ...

बाबांचे यु ट्यूब नॉलेज आई पेक्षा चांगले आहे (असा त्यांच स्वतःचं मत आहे) कारण ते २४/७ तिथेच पडीक असतात ( हे सर्वमान्य आहे ). पडीक म्हणजे दोन माजली घरात वरच्या मजल्यावर कुठल्याश्या खोलीत एका कोपऱ्यात गुपचूप हेडफोन लावून बसतात. आम्ही ऑफिस ला आणि मुलं शाळेत गेल्यावर घरात ह्या दोघांशिवाय चिटपाखरू नसते मग हे हेडफोन कशाला लागतात काही कळत नाही. मला कळण्यासारखा सोपा हा विषय पण नाही असो. बाबांना व्हिडिओ कॉल पण करता येतो आणि मग तो कॉल आई ओव्हर टेक करते. तिचं ओव्हर टेक हे हायजॅक सारखेच असते. एकाच वेळी इतके प्रश्न बुलेट च्या वेगाने धडकत असतात कि पलीकडचा माणूस कधीच धारातीर्थी पडलेला असतो किंवा ह्यातून वाचलाच तर दुसरा बॉम्ब तयार असतो. मग तो फोन गरागरा फिरवून काहीतरी दाखवायचा प्रयत्न म्हणजे मेरिगो राऊंड मध्ये बसल्याचा भास होतो. ते बघताना खरंच डोकं जाड होते हे मी स्वानुभवावरून सांगू शकते.

धोरणअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Sep 2019 - 1:47 am | कंजूस

हीहीही।

सोन्या बागलाणकर's picture

20 Sep 2019 - 4:17 am | सोन्या बागलाणकर

तुमचे आई बाबा बरेच स्मार्ट म्हणायचे. आमच्यांना आटुकमाटुक मार्केटिंग समस आले तरी वाटतं की पलीकडून कोणी तरी ते टाकले आहेत. मग मला फोन करून सांगतात त्यांना फोन करून सांग दुपारी झोपलेले असताना मेसेज करू नका, जळलं मेल्याचं लक्षण, दुसरा टाइम मिळत नाही मेल्याना!

मृणमय's picture

20 Sep 2019 - 5:11 am | मृणमय

नाही नाही, आई चे चालू असते सारखे टुमणे, "अहो, फोन वाजतोय , कुणाचा आहे? तिच्या हातात फोन असून तिला तो कुणी तरी वाचून दाखवावा लागतो.
किंवा तिच्या मैत्रिणींशी बोलून झाले कि फोन बाबांच्या हातात फोन देऊन म्हणते, माझे बोलून झाले बंद करा.... म्हणजे कमाल आहे आमची कि आम्ही हे सगळे हसत हसत करतो!! कालचाच किस्सा सांगते, तिने तिच्या खास मैत्रिणीला फोन केला सोलापूर ला, बाबा माझ्या कानात म्हणालो आता दोन बहिऱ्या कशा बोलतात बघ :)

सोन्या बागलाणकर's picture

8 Oct 2019 - 6:03 am | सोन्या बागलाणकर

हाहाहा...खरंय!

चौथा कोनाडा's picture

20 Sep 2019 - 3:01 pm | चौथा कोनाडा

वाह, मस्त ! .... निरागसही आणि खुसखुशीत ही !

स्मार्ट फोन वापरण्याच्या विविध तर्‍हा बघुन भारी वाटते, कधी कधी हसू ही येते ! या
चतुर जेषठ मात्र नीट शिकुन घेतात, नविन पिढी सोवत राहायचे प्रयत्न करतात याचे कौतुक वाटते !