आपण यांना पाहिलंय का?

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
18 Dec 2007 - 1:57 am

मलाही तात्यांचा लेख वाचून तीच भावना पद्यात मांडणारी माझीच एक कविता आठवली. तात्या, हि सुद्धा तशी शिळीच कविता! पण आठवली म्हणून इथे देतोय..

आपण यांना पाहिलंय का?
*********

अजुनही आठवतय,आईचं बोट धरून रोज शाळेत जाणं..
तिचं लक्ष नसतानाही हजार शंका विचारणं...
जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे कुतुहलाने पहाण...
माझ्या ह्या अहर्निश बडबडीला आता ग्रहण लागलय का?
रोजच्या धावपळीत माझी निरागसता हरवली आहे... आपण यांना पाहिलंय का??

चिंब पावसात भिजुन.. मग भुट्टा खाणं...
चौपाटीवरचा गोळा भुर्ऱर्ऱर्ऱ करुन चोखण...
केवळ पैजेखातर पेप्सि बॉटल एका दमात रिचवणं...
नंतर न थांबणार्‍या ढेकरा आता कायमच्या थांबल्यात का?
क्षणिक सुखाच्या मागे धावताना खरा आनंद हरवला आहे.. आपण यांना पाहिलंय का??

WWF च्या कार्डांची संपत्ती आनंदानं साठवण...
खिसाभर चिंचांसाठी अख्खि टेकडी चढुन जाणं...
एका सायकल साठी भरपुर अभ्यास करणं....
ती आणल्याच्या आनंदात बाबांना मारलेली मिठी आता सैल झाली आहे का?
मोटारी मागे धावताना याच सायकलने दीलेलं समाधान विसरलो आहे... आपण यांना पाहीलंय का??

केसांतुन लाडाने फ़िरणार्‍या आईच्या हातांनी मिळणारी शांतता हरवली आहे...आपण यांना पाहीलंय का??

डिस्कोच्या गोंगाटात मंदीराच्या घंटेचा नाद हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का??

कॅक्टस ब्युटीच्या जमान्यात मोगर्‍याचा सुग़ंध हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का??

हास्यक्लबच्या कल्लोळात निर्व्याज हसु हरवलं आहे... आपण यांना पाहीलंय का?

आता काय काय सांगु...
ह्या जनसागरातही एकटा असणारा मी...
माझा मलाच शोधतो आहे.. माझा मीच हरवलो आहे... आपण खर्‍या मला पहिलंय का??

-ऋषिकेश
(०५-जून-२००७)

***

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

सर्किट's picture

18 Dec 2007 - 2:07 am | सर्किट (not verified)

ऋषिकेश,

(शिळी असली तरी) कविता आवडली.

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

18 Dec 2007 - 2:09 am | मुक्तसुनीत

मिपावर आज सुरेख कवितांचा मेटीऑर-शॉवर आहे ! :-)

मित्रा ऋषिकेशा , तुझी ही कविता छान आहे !

खरे सांगायचे तर "गेले ते दिन गेले " आणि "जुने जाऊ द्या मरणालागुनि" या दोन्ही परस्परविरोधी भावना आपल्यात एकत्र नांदतात ! गतकाळाच्या आठवणी, काहीतरी मागे सरल्याची हुरहूर आणि "उद्या" ची प्रतीक्षा , त्याबद्दलच्या आशा-आकांक्षा यांच्या हिंदोळ्यावर आपला वर्तमान झोके घेत असतो, नव्हे का ?

आणि या दुहेरी अशा भावना असण्यामागे विसंगती नाहीच. उलट, विसंगती तेव्हा जाणवते जेव्हा या दोहोपैकी एकच भावना असेल. ज्याला भूतकाळातील सगळे विसरावेसे वाटते , ज्याला त्याच्याशी कसलेच नाते ठेवण्याची पर्वा नसेल तो माणूस किती कोरडा असेल. याउलट, ज्याला उद्याबद्दल कसलीच उत्सुकता नाही तो माणूस किती डीप्रेस्ड् असला पाहिजे !

विसोबा खेचर's picture

18 Dec 2007 - 8:44 am | विसोबा खेचर

केसांतुन लाडाने फ़िरणार्‍या आईच्या हातांनी मिळणारी शांतता हरवली आहे...आपण यांना पाहीलंय का??
डिस्कोच्या गोंगाटात मंदीराच्या घंटेचा नाद हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का??
कॅक्टस ब्युटीच्या जमान्यात मोगर्‍याचा सुग़ंध हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का??
हास्यक्लबच्या कल्लोळात निर्व्याज हसु हरवलं आहे... आपण यांना पाहीलंय का?

क्या बात है... ऋषिकेशा, सुंदरच लिहिलं आहेस रे!

विजय पाटील's picture

18 Dec 2007 - 12:37 pm | विजय पाटील

WWF च्या कार्डांची संपत्ती आनंदानं साठवण...
खिसाभर चिंचांसाठी अख्खि टेकडी चढुन जाणं...
एका सायकल साठी भरपुर अभ्यास करणं....
ती आणल्याच्या आनंदात बाबांना मारलेली मिठी आता सैल झाली आहे का?
मोटारी मागे धावताना याच सायकलने दीलेलं समाधान विसरलो आहे... आपण यांना पाहीलंय का??

मीही असच करत होतो. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.