भाग ३ - जब वी मेट - समा, समा है ये प्यार का...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
12 Sep 2019 - 2:29 pm

भाग ३ - जब वी मेट - समा, समा है ये प्यार का...
 

1 भोळा शशी...

आमच्या आवडीचे गाणे आम्ही ऐकत होतो... कहीं दिल ना चुराले मौसम बहार का...

माझे मन मागे मागे गेले... सन १९७३... हवाईदलाचा रुबाबदार निळ्या रंगाचा युनिफॉर्म, पीक कॅप, चकचकीत ब्लॅक पॉलिश केलेले ऑक्सफर्ड पॅटर्न शूज.. जेम्स बाँड टाईप ब्लॅक ब्रीफकेस हातात...छाती ताठ करून लाखो रुपये बॉक्सेसमधे भरून घेऊन जाताना बरोबरचे गन धारी सेक्युरिटी गार्ड्स... 
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लाल चौक मेन ब्रांचमधील मोठ्या हॉलमधील स्टाफकडे नजर फिरवत मी आत जाऊन बँक ऑफिसरच्या केबिनमध्ये बसून चाय की प्याली हातात घेत आहे... पण भिरभिरत्या नजरेने शोध चाललाय तिचा... खाली मान घालून कामात गर्क असलेल्या सुंदरीचे लक्ष कसे वेधले जाईल याची धडपड... ती ही मला न कळत निहाळते असे वाटत राहणारी हुरहूर... 
'कश्मीर की कली है यार'! मित्रांचे सर्टिफिकेट ऐकून मला शम्मी कपूरी 'याऽऽहू' म्हणायची सुरसुरी येत असे...ती होती टीटा... मिस टीटा कौल... काश्मीरी लाल गुलाबी गालावर खळी, मोहक चेहरा, कानावर लटकलेली सोन्याची साखळी... पण ...मन की बात मन में रही... बोलून दाखवायचे साहस नव्हते... श्रीनगर सोडून पुढे सरकलो...
...

घटनांच्या ओघात सन १९७७ मधे पुन्हा श्रीनगरमध्ये पोस्टींगला आलो. फॅमिली घेऊन रावलपुरा कॉलनीत राहात होतो. हिला तिला पहायची उत्सुकता होती. एक दिवस आम्ही दोघे मुद्दाम स्टेट बँकेच्या ऑफिसमध्ये तिला भेटलो. जुजबी बोलत १० मिनिटात भेट संपली. बाहेर पडून  बाजारात शाली, केशर घेता घेता तिच्या सुंदरतेचे वर्णन हिच्या कडून ऐकताना मला माझ्या चॉईसचा अभिमान वाटला! ती आता पर्यंत मिसेस धर झाली होती. मांग सिंदूरी, कानांवरील आभूषण तिच्या सौंदर्याला खुलवत होती...  ती सीनियर अधिकारी झाली होती. आपल्या केबिनमधे मला चहा ऑफर करत म्हणाली होती, 'सॉरी टू हियर अबाऊट दॅट...' आपत्ती जनक घटनेची माहिती समजताच माझी सांत्वना करताना करुणा वाटून तिने शब्द जुळवले...
 ... 

साल १९९६ मधे पुन्हा श्रीनगरला पोस्टींगला आलो. आता स्टेट बँकेची शाखा एयरपोर्टवर सुरू झाली होती. बदलत्या राजकीय परिस्थितीत आता मेन ब्रांचला जाणे दुरापास्तच होते. ती आता तिथे असेल का? कशी असेल? वगैरे जाणून घेण्याची उत्सुकता ताणली होती!
कसे तरी करून बँकेत गेलो. अवकळा आलेली बिल्डिंग, सेक्युरिटीने गढीवजा चारी बाजूने घेरलेले... आतला स्टाफ आता नमाझी टोपीतला.
'सर, आपको पता होगा. सभी कश्मीरी पंडितों को वेली के बाहर भागना पड़ा. ९० के पहले मिसेस टीटा धर अपनी फॅमिली के साथ दिल्ली चली गई...गाझियाबाद के कॅम्प में रहते थे...इतने तक पता है.. बाद का मालूम नहीं'... 

... तिच्यावर आलेल्या दारुण आपत्तीतून ती सावरली असेल असे करुणेने मनापासून वाटत राहते... 

... दिल ढूंढता है फिर वही... 

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

12 Sep 2019 - 7:37 pm | जॉनविक्क

राष्ट्रीय आपत्तीच्या उल्लेखाने मन अजून उदास झाले.

लेखाचा सुरुवातीचा भाग वाचताना "शर्मिली" मधला आर्मी पोषाखातला रुबाबदार शशी कपूर " खिलते है गुल यहां " , "कैसे कहें हम प्यार ने हमको " ही गाणी गुणगुणताना दिसु लागला . पण लेखाचा शेवट वाचुन सुन्न वाटले .

शशिकांत ओक's picture

13 Sep 2019 - 10:52 am | शशिकांत ओक

पुन्हा केव्हातरी वापरता येतील असे लिखाण केले की सादर करेन.

गामा पैलवान's picture

13 Sep 2019 - 3:28 pm | गामा पैलवान

शशिकांत ओक,

प्रेमस्मृतीरंजन आवडलं. पुढील भाग वाचायला मिळायला हवा होता. कलम ३७० च्या बैलाचा ....!

आ.न.,
-गा.पै.

तमराज किल्विष's picture

13 Sep 2019 - 8:55 pm | तमराज किल्विष

मागे एकदा यावर तुम्ही लिहिलं आहे. मला चांगले आठवते आहे.

योगविवेक's picture

14 Sep 2019 - 2:23 am | योगविवेक

त्यांचं लेखन नेहमीच लक्षात राहील असं असतं हे तुमच्या आठवणीवरून पक्कं झालं

तमराज किल्विष's picture

13 Sep 2019 - 8:57 pm | तमराज किल्विष

ओक साहेब तुम्ही विमान उडवलंय कधी का हापिसातच कॅश मोजत होता?

त्यांनी काय केले ते आधीच सांगितले आहे...

दुर्गविहारी's picture

13 Sep 2019 - 9:51 pm | दुर्गविहारी

सुन्न झालो. :-(