भाईकाकांना शुभेच्छा...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
9 Nov 2008 - 10:00 am

आदरणीय भाईकाका,

काल ८ नोव्हेंबर होता, आपला वाढदिवस! परंतु कालचा संपूर्ण दिस खरंच गडबडीत गेला त्यामुळे मिपावर निवांतपणे यायला जमलंच नाही. म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे दोन शब्द आज जरा सवडीने लिहीत आहे...

आपल्याला वाढदिवसाच्या बीलेटेड शुभेच्छा..! :)

आम्हा सर्व मिपाकरांकडून वाढदिवसानिमित्त आपल्याला ही छोटीशी, प्रेमाची भेट.. गोड मानून घ्यावी! आपण केवळ शरीररुपाने आमच्यात नाही इतकंच, एरवी आपली याद नेहमीच येते..!

आपला,
(व्यक्तिचित्रंणाच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात बसलेला आपला शिष्य) तात्या.

संस्कृतीशुभेच्छा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

9 Nov 2008 - 11:08 am | आनंदयात्री

आमच्याही शुभेच्छा !
काल आम्हालाही अंमळ आश्चर्य वाटले की असे कसे झाले बुवा ?

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Nov 2008 - 11:48 am | बिपिन कार्यकर्ते

मला माहित नव्हते. आता तात्याच्या लेखामुळे कळले.

माझ्या तर्फे पण शुभेच्छा.

बिपिन कार्यकर्ते