निवेदन

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
4 Aug 2019 - 6:49 am

प्रिय मित्रो
गेल्या काही धाग्याना मिळेलेला अत्यल्प प्रतिसाद बघता
मी मी पा वर धागे गुंफणे थांबत आहे
आता पयंत आपण प्रतिसादाच्या रूपानं माझ्यावर प्रेम केले त्या बद्दल धन्यवाद
माझे लेखन वर गेलो असताना मी ३५०च्या वर धागे गुंफल्याचे मला आढळले -मला वाटते इतक्या संख्येने सातत्याने लिहिणारा मी एकमेव सदस्य असावा
वास्तविक कारखानदारी फ्याक्टरी सारख्या रुक्ष वातावरणात वावरत असताना हि मी पा मुळे मी लिहायला शिकलो
शृंगार काव्य लेख कथा असे अनेक प्रकार हाताळले
मी पा माझे आवडते संकेत स्थळ आहे
मी पा च्या वाटचालीस आमच्या शुभेछया
ज्याकालीन चित्रे एक अधोविश्वातली तरल प्रेमकथा
च अर्धवट लेखन झाले आहे ती मी पोस्ट करेन
तो माझा शेवटचा धागा असेल
धन्यवाद
जड अंतकरणाने आपला निरोप घेत आहे
गुड बाय

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

चामुंडराय's picture

4 Aug 2019 - 7:14 am | चामुंडराय

.

नेत्रेश's picture

4 Aug 2019 - 9:20 am | नेत्रेश

प्रतिसाद दीले नाही तरी तुमचे हल्केफुलके लेखन enjoy करणारा एक मोठा वर्ग मिपावर आहे.
तरी आपण निरोप न घेता पुर्वी सारखे लेखन करीत रहावे.
या पुढे येणार्‍या तुमच्या प्रत्येक धाग्यावर प्र्तिसाद नकी देणार.

ट्रम्प's picture

4 Aug 2019 - 12:08 pm | ट्रम्प

काय बोलणार ?
निरोप घेताना चांगले बोलावे म्हणतात !!

त्या मुळे ok good by .

प्रमोद देर्देकर's picture

4 Aug 2019 - 12:17 pm | प्रमोद देर्देकर

चला मिपाचे अकुग्रहण सुटले एकदाचे म्हणायला हरकत नाही .

तुमची ग्यानबा / तुकाराम की कथा वाचली
अक्कू तुमच्या सडक्या मेंदूतुन अजुन असल्या कथा येण्याअगोदर तुम्ही जाताय यात आंनद आहे . पुन्हा चुकुन ही इकडे फिरू नका !!
खुप उपकार होतील .

नाखु's picture

4 Aug 2019 - 4:00 pm | नाखु

मनोरंजन,गंमत आणि विकृती यात मूलभूत फरक समजून घ्या

कधीही आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणजेच आपलं काहीतरी चुकतंय हेच लक्षात घेऊन पहा.

वाचकांची पत्रेवाला नाखु

कथा कादंबरी या प्रकाराऐवजी दुसरा काही लिहा. एवढंच सुचवेन.
बाकी लिहू नका सांगणारे आम्ही कोण? आपण सर्व मिसळपावच्या मंडपातले पाहुणेच नाही का?

कोंबडा's picture

4 Aug 2019 - 10:17 pm | कोंबडा

Temp

जॉनविक्क's picture

4 Aug 2019 - 11:09 pm | जॉनविक्क

:)

आदरनिय माणसा, बाबा रे, संडास करायला नको येत जाऊ इकडे. सातत्याने लिखाण चांगली गोष्ट होती परंतु आपण काय लिहितोय, त्याच्यावरती थोडा विचार करावा, लिहिल्यावर स्वतः दोन चार वेळा वाचुन आधी मनाला विचारावं की मि कुठे प्रकाशित करण्याइतपत हे बरं आहे का? आणि नंतर प्रकाशित करावं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. रुसुन जाऊ नको, थोडा वेळ थांबून साडेतिनशेची विचारशक्ती एका लेखावरती लावुन बघ, तेवढा वेळ घे आणि मग पहा.

महासंग्राम's picture

5 Aug 2019 - 10:26 am | महासंग्राम

डबकं

विजुभाऊ's picture

6 Aug 2019 - 12:47 pm | विजुभाऊ

तुमचे लिखाण वाचले.
उदा: फेसबुक वरची भुताटकी https://www.misalpav.com/node/32939
एक प्रेम कहाणी , अस्थिकलश , गोदक्का , लाजणे, पोहे की शिरा, प्रतिशोध इत्यादी सपक कथा सातत्याने पाडू शकणे ही क्षमता अचाटच म्हणायला हवी.

तुमच्या इथे नसण्यामुळे मिपाला फारसा फरक पडेल असे वाटत नाही. तुम्हाला नक्कीच पडेल .

आणखी २० लेख लिहिले असते तर ३७० झाले असते.
--
असो,
पुढील वाटचालीस शुभेच्छा !

हस्तर's picture

6 Aug 2019 - 2:27 pm | हस्तर

अजुन ७
३७७