✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कृष्णछबी

म — मायमराठी, Sat, 08/03/2019 - 22:43
कृष्णास एकदा कृष्ण सापडेना, दर्पणी पाहता छबी दिसेना, प्रकाशी चालता सावली दिसेना, उरला फक्त शरीराचा भास, मनाचाही थांग लागेना, "पाहिले का मज कोणी?" पुसे असा तो भक्तांना, "देवा, नित नवी लीला आपली, आम्हांस काही कळेना." बसला मग ध्यानास तो, वृत्तींचा लय काही होईना, तिन्ही लोकी निरोप धाडियेलें, देव गण गंधर्वांसही काही समजेना, एके पहाटे दिसे स्वप्नात तो स्वतःला, " तुझा तुझ्यावर हक्क नसे, हे तुला कसे उमजेना? तुझे अस्तित्व भक्तांच्या कणांकणांत, तिकडे मीरा न उरली तिच्यात, इकडे तुला तूच गमेना, मीरा होई कृष्णमय, इथे तुझ्यातला तू मावेना, भक्तांमध्ये देव हरतो,जिरतो, उरतो एक संपूर्ण भक्त, तिथेच पूर्तता तुझ्या जीवना ।।" - अभिजीत

प्रतिक्रिया द्या
3758 वाचन

💬 प्रतिसाद (8)

क्या बात है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/04/2019 - 11:29 नवीन
सुरेख. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मायमराठी
Sun, 08/04/2019 - 13:47 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

छान.

प्राची अश्विनी
Sun, 08/04/2019 - 22:05 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

सुरेख कल्पना आहे! कविता आवडली

यशोधरा
Sun, 08/04/2019 - 22:27 नवीन
सुरेख कल्पना आहे! कविता आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, लहानसा प्रयत्न केला

मायमराठी
Mon, 08/05/2019 - 15:19 नवीन
धन्यवाद, लहानसा प्रयत्न केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आवडली कविता. सुंदर आहे.

पद्मावति
Mon, 08/05/2019 - 18:38 नवीन
आवडली कविता. सुंदर आहे.
  • Log in or register to post comments

पद्मावतिजी, धन्यवाद.

मायमराठी
Mon, 08/05/2019 - 23:16 नवीन
पद्मावतिजी, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

पद्मावतिजी, धन्यवाद.

मायमराठी
Mon, 08/05/2019 - 23:16 नवीन
पद्मावतिजी, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा