कृष्णछबी

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
3 Aug 2019 - 10:43 pm

कृष्णास एकदा कृष्ण सापडेना,
दर्पणी पाहता छबी दिसेना,
प्रकाशी चालता सावली दिसेना,
उरला फक्त शरीराचा भास,
मनाचाही थांग लागेना,
"पाहिले का मज कोणी?"
पुसे असा तो भक्तांना,
"देवा, नित नवी लीला आपली,
आम्हांस काही कळेना."
बसला मग ध्यानास तो,
वृत्तींचा लय काही होईना,
तिन्ही लोकी निरोप धाडियेलें,
देव गण गंधर्वांसही काही समजेना,
एके पहाटे दिसे स्वप्नात तो स्वतःला,
" तुझा तुझ्यावर हक्क नसे,
हे तुला कसे उमजेना?
तुझे अस्तित्व भक्तांच्या कणांकणांत,
तिकडे मीरा न उरली तिच्यात,
इकडे तुला तूच गमेना,
मीरा होई कृष्णमय,
इथे तुझ्यातला तू मावेना,
भक्तांमध्ये देव हरतो,जिरतो,
उरतो एक संपूर्ण भक्त,
तिथेच पूर्तता तुझ्या जीवना ।।"
- अभिजीत

कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2019 - 11:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख.

-दिलीप बिरुटे

मायमराठी's picture

4 Aug 2019 - 1:47 pm | मायमराठी

धन्यवाद

प्राची अश्विनी's picture

4 Aug 2019 - 10:05 pm | प्राची अश्विनी

छान.

सुरेख कल्पना आहे! कविता आवडली.

धन्यवाद, लहानसा प्रयत्न केला होता.

पद्मावति's picture

5 Aug 2019 - 6:38 pm | पद्मावति

आवडली कविता. सुंदर आहे.

मायमराठी's picture

5 Aug 2019 - 11:16 pm | मायमराठी

पद्मावतिजी, धन्यवाद.

मायमराठी's picture

5 Aug 2019 - 11:16 pm | मायमराठी

पद्मावतिजी, धन्यवाद.