आमची बायको कुत्रा पाळते
तुम्ही पाळून देऊ नका
आमच्या पायाखाली जळते
तुम्ही पोळून घेऊ नका.
कुत्रे पाहून मैत्रीणीकडे
वेडे खूळ मनात भरले
आपण पपी घेऊ गडे
लाडे लाडे फर्मान सुटले
भलतीच पपी वाटली मला
घेऊ ग लवकर, म्हटले
पपी नव्हे, घात झाला
कुत्रे शोधणे सुरू झाले.
अल्सेशियन, बव्हेरियन
डोबरमॅन, चिव्हावा
सारे कनाईन धुंडून
पामेरोरियन ठरला घ्यावा
नकद चार हजार मोजून
शुभ्र कुत्रा हिने खरिदला
सतत लाड त्याचे पाहून
माझा भाव खाली उतरला
पपीची खेळणी आणि खाऊ
रोज हिची धावपळ बघून
वाटे पपीला गिळू की खाऊ
सारखा राही खार खाऊन
सोफ्यावर ऐटीत बसून
मी जवळ येताच मात्र
रागाने दात विचकून
भुंकून गोंधळ करी कुत्र
आमची बायको कुत्रा पाळते
तुमचीला पाहिजे आहे का?
पाळल्यावरच खरे कळते
माझ्या कवितेवर जाऊ नका.
प्रतिक्रिया
8 Nov 2008 - 12:26 pm | जैनाचं कार्ट (not verified)
कुत्रे पाहून मैत्रीणीकडे
वेडे खूळ मनात भरले
आपण पपी घेऊ गडे
लाडे लाडे फर्मान सुटले
=))
(अश्या लफड्यात न अडकलेला )
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
8 Nov 2008 - 7:38 pm | मीनल
ही ही ही हीही ही
मस्त.
एका नव-याला विचारल की पुढल्या जन्मी हीच बायको कशी काय वाटेल?
तो म्हणतो -- ``नको रे देवा. माणसापेक्षा मी कुत्र्याचाच जन्म पत्करेन.तोही माझ्या बायकोच कुत्रा.
सध्या मी नंदी बैल आहे.``
मीनल.
9 Nov 2008 - 9:59 am | पावसाची परी
खुप छान!
नकद चार हजार मोजून
शुभ्र कुत्रा हिने खरिदला
सतत लाड त्याचे पाहून
माझा भाव खाली उतरला
मस्तच! खरच तुमच्याकडे कुत्रा आहे का?
भावना खुप मनातुन उतरल्यासारख्या वाटल्या म्हणुन विचारले :)
9 Nov 2008 - 11:33 am | अरुण मनोहर
धन्यवाद.
पावसाची परी
जितकी तू खरी
तितकी कुतरी
आहे घरी!
अवांतर- धोंडोपंतांच्या देवद्वार छंदाची खुमारी अजून कायम आहे.