साहिब बिवी और गुलाम

Primary tabs

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
1 Aug 2019 - 12:06 pm

लहानपणी दूरदर्शन वर दुपारी 12 वाजता जुने चित्रपट लागायचे, तेव्हा एका रविवारी गुरुदत्त फिल्म फेस्टिवल सुरु असतांना, एका नितांत सुंदर ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट लागला होता, 'साहीब बिवी और गुलाम'. गुरुदत्तची निर्मिती आणि त्याचा जवळचा मित्र अब्रार अल्वी यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट मनात अजून घर करून आहे, तो मिनाकुमारीच्या सौंदर्यामुळे. मुळची सुंदर असलेल्या मिनाकुमारीला गुरुदत्त ने यात 'छोटी बहू' भूमिका दिली होती, ती हि भूमिका जगली आणि बॉलिवूडला ट्रॅजेडी क्वीन मिळाली.

चित्रपटाची कथा सुरु होते ती फ्लॅशबॅक ने गुरुदत्त एका ठिकाणी उत्खनन करत असतांना त्याला तिथले अवशेष पाहून भूतकाळ आठवतो.
कामाच्या शोधात कोलकात्याला आलेला 'अतुल्य चक्रवर्ती' उर्फ 'भूतनाथ', हवेली मध्ये पतीच्या विरहाने एकटीच राहत असलेली 'छोटी बहू' आणि भूतनाथ च्या मालक सुविनय बाबूंची मुलगी 'जबा' यांच्या तिघांच्या प्रेमत्रिकोणाची ट्रॅजेडी म्हणजे 'साहीब बिवी और गुलाम'. बिमल मित्रांच्या कादंबरीवर बनवलेला हा चित्रपट, त्या काळातील जमीनदारी त्यातून येणारी पैशाची नशा आणि होणारे अधपतन यांचं यथार्थ चित्रण घडवतो. दारू आणि तवायफ यांच्या रमलेला आपला 'साहिब' आपल्याजवळ रहावा यासाठी लाख विनवण्या केल्यानंतर शेवटी त्याला रोखण्यासाठी छोटी बहू त्याला गाणं म्हणवून रिझवण्याचा अयशस्वी प्रयत्न करते, त्यासाठी ती स्वतःला बर्बाद करून घेते पण याचा तिला थोडंही दुःख वाटत नाही कारण यामुळे तिचा 'साहिब' तिला मिळत असतो. पण मुळात बदफैली असलेला नवरा जेव्हा पुन्हा तवायफ च्या कोठ्यावर जायला लागतो, तेव्हा ते सहन न होऊन ती दारूच्या नशेत बुडवून घेते. खऱ्या आयुष्यात 'मीनाकुमारी' चा शेवट पण असाच काहीसा दुःखद आहे. तिने धर्मेंद्रवर मनापासून प्रेम केलं होतं, पण त्याने प्रेमात दगा दिल्यावर तिने स्वतःला दारूच्या नशेत पार बुडवून घेतलं होतं. पण कोणाला माहीत होतं साहिब मधली छोटी बहू ची व्यक्तिरेखा जगणार्या तिच्या आयुष्यात प्रत्यक्ष सुद्धा अशी दुर्दैवी वेळ येईल.

साहिबची सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजे सिनेमॅटोग्राफी. गुरुदत्त चे आवडते सिनेमॅटोग्राफर असलेले वि.के. मूर्ती यांनी साहिब च्या छायाचित्रणाची बाजू उत्तम रित्या सांभाळली होती. त्यांनी प्रत्येक शूट मध्ये जीव ओतून तो सिन जिवंत केला आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर, छोटी बहू जेव्हा भूतनाथ ला पहिल्यांदा भेटते तो सिन आठवा. या शॉट मध्ये मीनाकुमारीच्या पायापासून चेहर्या पर्यंत जो काही कॅमेरा फिरवला आहे तो म्हणजे अगदी लाजवाब आहे. मूर्तिमंत सौंदर्याचं प्रतिक असलेल्या मीनाकुमारीचं सौंदर्य तेव्हा अधिकच खुलून दिसतं. दुसरं म्हणजे ' साकिया आज मुझे निंद नाही आएगी' हे गाणं एका यात मुख्य नर्तिका सोडली तर दुसऱ्या कोणाचाही चेहरा दिसत नाही.

तसं पाहायला गेलं तर 'साहीब बिवी और गुलाम ची कथा आजच्या काळातही लागू होते. आजही कित्येक घरात स्त्रीच्या स्वप्नांचा चुराडा होतो, त्यात दाखवलेली छोटी बहू सगळीकडे आढळून येते, भलेही तिचं रंग-रूप बदललं असेल पण तिचं दुःख, तिला पडणारे प्रश्न आजची सुटलेले नाही. अगदी त्याच प्रमाणे त्यातला वासनेने बरबटलेला 'साहिब' सुद्धा अगदी असाच आजही समाजात पुरुषी वर्चस्व गाजवणाऱ्यांच्यात दिसुन येतो.

मंदार

१२३

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

1 Aug 2019 - 12:11 pm | जॉनविक्क

मी चुकुन साहेब, बीबी और गैंगस्टर वाचलं ना :)

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 12:37 pm | मुक्त विहारि

आवडलं....

जॉनविक्क's picture

1 Aug 2019 - 12:38 pm | जॉनविक्क

आपल्याकड़ून तुम्हाला एक बियर लॉगु

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 1:26 pm | मुक्त विहारि

आम्ही बियरला नाही म्हणत नाही.

अप्रतिम लिखाण, थोड अजून चाललं असत

अमर विश्वास's picture

1 Aug 2019 - 3:43 pm | अमर विश्वास

मस्त लिहलंय ..

एका गोष्टीचा उल्लेख राहिला ... ते म्हणजे संगीत ... शकील बदायुनीच्या शब्दांना हेमंतकुमार यांनी चढवलेला स्वरसाज ...
सर्व गाणी नायिकांच्या तोंडी ...
मीनाकुमारीच (छोटी बहू) दु:ख समोर येत ते गीता दत्तच्या जीवघेण्या आवाजात ...
न जाओ सैंया छुड़ा के बैंया
क़सम तुम्हारि मैं रो पड़ूँगी, रो पड़ूँगी
मचल रहा है सुहाग मेरा
जो तुम न हो तो, मैं क्या करूँगी, क्या करूँगी

याउलट बाकीच्या गाण्यांसाठी आशाजींचा आवाज .. मग तो मुजरा असो किंवा वहिदा रेहमानच्या तोंडी भँवरा बड़ा नादान सारखं प्रेमगीत ...

चित्रपटाच्या विषयाला अधिक गहिरं करणार हे संगीत हे सुद्धा या चित्रपटाचं बलस्थानच

शेखरमोघे's picture

1 Aug 2019 - 6:41 pm | शेखरमोघे

सुंदर पण आणखी बरेच लिहिण्यासारखे असतानाही लिहिणे आटपते घेतल्यासारखे वाटले.

आजही कित्येक घरातलया बायकांना या चित्रपटातील "गहने बनवाओ, गहने तुडवाओ" या पद्धतीने जीवन जगावे लागते. रस्ता तोच पण pace वेगळा.

जॉनविक्क's picture

1 Aug 2019 - 7:03 pm | जॉनविक्क

सुंदर पण आणखी बरेच लिहिण्यासारखे असतानाही लिहिणे आटपते घेतल्यासारखे वाटले.

आटोपते वगैरे अजिबात वाटत नाहीये, शक्य ते सर्व त्यांनी लिहलेले आहे