युगांतर आरंभ अंताचा भाग ६ व ७

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
22 Jul 2019 - 11:44 am

ब्रह्मदेवांचा क्रोध ! ज्यामुळे त्यांनी स्वपुत्री मृत्यूलोकात धाडली ! देव - देवतांना भोगाव्या लागलेल्या या शापप्राप्त यातनांच्या अग्निकुंडात बळी पडला अजून एका अप्सरेचा! अद्रिका! मृत्युलोकी मस्य रुप धारण करण्याचा ब्राह्मदेवांचा शाप भोगण्यासाठी ती धरेवर अवतरली. धरेवरून पहटेच्या काषायवर्ण सुर्यदेवांचे रुप पाहून तिला मनोमन आनंद झाला. सुर्यदेवांचे प्रतिबिंब यमुनेच्या जलप्रतलावर पडलेले होते. नदी प्रवाहावर येणाऱ्या अलगद लाटांनी त्या प्रतिबिंबाला अस्थिर करत सर्व जलास केशरी छटा दिली होती. सुर्यदेवाच्या त्या लोभस रुपाकडे पाहत अद्रिकेने नमन केले आणि यमुनेच्या जलप्रवाहात प्रवेश केला. पापणी लवते न लवते तोच तिचे एका विशाल मत्स्यात रुपांतरण झाले. मिळालेल्या नविन शरिराचे अवयव ती हलवून पाहू लागली. नाजूक कल्ले, दोन मोठ्ठे डोळे, काळभोर शेपटी. सगळ आत्मसात करायला तिला काहीसा वेळ लागला. काही काळातच प्रवाहाचे जलतुषार शेपटीने दुरवर उडवत तिने जलातून बाहेर यायचा प्रयत्न केला. परंतु हवेतील प्राणवायु आता तिच्या योनीला स्विकारता येणे अशक्य होते. जलाच्या आतच विहार करावा लागणार म्हणून खिन्न होत तिने जलातच विहार करायला सुरवात केली. अद्रिकेला वाटले तितक्या सहजणे तिची शापातून सुटका होणार नव्हती बहुदा!
अंबराल्या सुर्यदेवांचे स्थान आता भुप्रतलावरून अगदी मधोमध दिसत होते. वाढू लागले तसे धरेचे आणि जलाचे तापमान हळूहळू अधिक होत गेले. छेदी नरेश सुधन्वा उष्णतेच्या दाहाची तमा न करता वनात शस्त्र घेउन वाट चालत होता. पितरांच्या आज्ञेनुसार प्राण्याची शिकार केल्या शिवाय त्याला परतणे शक्य नव्हते. निर्मनुष्य वनात एकेक ध्वनी कान देउन तो ऐकत होता. कोण जाणो, शिकार करायला जावे आणि कोणी आपणास भक्ष्य बनवावे. वाऱ्याने सळसळणाऱ्या पर्णाचा आवाज येत होता. अचानक त्याला शिकारी पक्षाची चाहूल लागली. डोक्यावर घिरटी घालून त्या पक्षाने पायाच्या पंजातल्या चिट्टी वरचा दाब काढून घेतला आणि जवळच्या वृक्षाच्या फांदीवर बसला. चिट्टी उचलून सुधन्वाने वाचली. त्यांच्या रजस्वला धर्मपत्नीने गर्भधारणेची व्यक्त केलेली इच्छा त्या पत्रात वाचून सुधन्वा राजा धर्मसंकटात सापडला. पितरांची आज्ञा पाळणे हा धर्म आहे तर धर्मपत्नीची इच्छा पूर्ण करणे हे आद्यकर्तव्य! आज्ञा पूर्ण झाल्या शिवाय महाली परतणे अनुचित! आज्ञा दिलेले कार्य पूर्ण करावयास किती घटिका, दिन, सप्ताह लागतील हे तोही सांगू शकत नव्हता.
त्याला सुवर्णमध्य उमगला. शस्त्र जमिनीवर टेकत त्याने जवळच्या घनडाट वृक्षाची काही पर्णे काढली. धर्मपत्नीचे स्मरण करत त्याने वीर्य पर्णात मंत्रबंधित करून पक्षाकडे सुपूर्त केले. शिकारी पक्ष्यांने छेदी महालाचा मार्ग धरला. वाटेतल्या डोंगर, दर्यांवरून अधिक अंतर ठेवत पक्षांने अर्धा मार्ग पुर्ण केला होता. पंखाना अजून जोरात फडफडवत पक्षाने वेग वाढवला. तितक्यात एक दुसरा शिकारी पक्षी तिथे घिरट्या घालू लागला. त्या शिकारी पक्षाने अचानक झालेल्या आक्रमिक धक्क्याने संदेशवहन करणाऱ्या पक्षाच्या चोचीतून पर्णकोष यमुना नदीच्या प्रवाहात पडला.
सुर्यदेव पश्चिमेस झुकले आणि नदीचे जल शितल बनत गेले. मत्स्य अद्रिका सांज वेळी अस्वस्थपणे नदीप्रवाहात येर झारा घालत होती. तिच्या अस्वस्थपणाचे कारण ग्रहण केलेला पर्णकोष होता, याची तिला कल्पनाही नव्हती.

नगरातील कोळ्यांच्या वस्तीत आनंदोत्सव चालला होता. जाळ्यात अडकलेल्या विशाल माश्यामुळे सर्वजण खुश होते. आपल्या राजाला हा मासा भेट देउन त्यांची खुशामत करावी म्हणून माश्यासह मासेमार राजमहालात आले. महाराज सुधन्वा च्या समोर माश्याला कापण्याचा कार्यक्रम सुरु झाला. कापताना मासेमाराला काहीतरी विचित्र जाणवले..... त्याने कडेच्या बाजूने छेदत मासा कापला. सगळे अचंबित. आत दोन मानवी बालके होती. माश्याच्या पोटी! एक पुत्र आणि एक पुत्री. पण कोणाची? माश्याची? ऱाजा आणि प्रजा स्तब्ध.
भानावर येत राजाला प्रश्न पडला. आता काय करायचे ? या चमत्कारिक जन्मलेल्या बालकांना पहायला सारी नगरी जमली.
राज्याला वारस हवाच होता. 'मत्स्यराज' म्हणून राजाने मुलाचा युवराज म्हणून स्विकार केला. मुलीच्या अंगाला मात्र माश्यांचा तिव्र दुर्गंध येत होता. असे दुर्गंधी फुल राजवंश वेलीचे ? नाही. 'मत्स्यगंधा' नाव घोषित करून राजाने मासेमाऱ्यांपैकी एकाला, निषादला मुलगी हातात दिली, "आज पासून ही तुझी कन्या!"

हस्तिनापूर ! नदीवर बांधलेला बाणांचा बांध! शंतनूने त्या अद्वितीय कौशल्याकडे पाहत ते तोडण्याकरिता बाण धनुष्यावर लावत प्रत्यंचा ताणली. तितक्यात समोरून एक बाण आला आणि बांध तुटून नदीचे पाणी पुन्हा वाहू लागले. शंतनूने पाहिले. हातात धनुष्य घेऊन एक तरुण उभा होता. आणि.... सोबत गंगाही! शंतनूला स्वप्नवत भासत होते. त्याने गंगेकडे धाव घेतली. "गंगा.... किती वर्षांनी पाहतो आहे तुला! चला माझ्या सोबत. हस्तिनापुरही महाराणीच्या प्रतीक्षेत आहे गेली १५ वर्षे!" तरुणाने संवाद ऐकून भांबावल्यागत दोघांकडे पाहिले.
"महाराज...."
" काही बोलू नका महाराणी. शिघ्रता करा. महालातला एकटेपणा.... खुप सहन केलाय मी!"
" त्याचेच निराकरण घेउन आले आहे मी. " तरुणाकडे बघत गंगा म्हणाली.
श्वेत वस्त्रातल्या गौरवर्णी तरुणाकडे शंतनू ने बघितले.
" हा आपला पुत्र, गंगे? "
जन्मल्यावर एकदाच हातात घेतलेला, हस्तिनापुरचा युवराज, शंतनूचा आठवा पुत्र! डोळ्यांत त्याचे रुप साठवत शंतनूने तरुणाला आलिंगन दिले.
" देवव्रत, हे तुझे पिताश्री! " गंगेने परिचय करून दिला. देवव्रतने शंतनूला चरणस्पर्श केला. 'देवव्रत' युवराजाचे नाव शंतनूने उच्चारत त्याच्या मस्तकावर आशिर्वादाचा हात ठेवला.
" तुम्ही तो बाणांचा बांध पाहिलात राजन्? देवव्रतच्याच कौशल्याचा एक नमूना! हर एक शस्त्रास्त्र तो तरबेज रित्या चलवतो. वशिष्ठ ऋषी, परशुराम यांच्या कडून त्यानी विविध विद्या ग्रहण केल्या आहेत. मी तुम्हाला देलेला शब्द पूर्ण केला राजन्!" शंतनू देवव्रत कडे अभिमानाने पाहू लागला.
गंगा देवव्रत कडे बघत उद्गारली, " तु ज्या सिद्धी, ज्ञान हस्तगत केले आहेस, ते आता तुला तुझ्या पिताश्रींसोबत हस्तिनापुरचे राज्य सांभाळण्याकरिता मदत करतील. तु वारस आहेस त्या राजगादीचा. आता तु इथेच रहायचे आहेस. तुझ्या पित्यांसोबत!"
गंगा जायला नदीच्या दिशेने वळली.
" गंगे.... वचन मोडण्याची शिक्षा अजून नाही संपली का?"
" मी तुम्हाला दिलेल्या वचन पूर्ती साठी आले होते राजन्! मी मृत्यूलोकीच्या शापातून मुक्त झाले आहे. तुम्हीच वचन मोडून मला मुक्ती दिलीत. आता भावनांच्या पाशात जखडू नये. "
गंगा नदीच्या प्रवाहात चालत अदृश्य झाली.

क्रमशः

©मधुरा

धर्मलेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

22 Jul 2019 - 2:29 pm | पद्मावति

सुंदर लेखमाला. लिहित रहा. पु.भा.प्र.

मृणालिनी's picture

22 Jul 2019 - 2:32 pm | मृणालिनी

:) _/\_

यशोधरा's picture

22 Jul 2019 - 4:47 pm | यशोधरा

वाचते आहे. जरा शुद्धलेखन सांभाळले तर अजून चांगलं वाटेल वाचायला.

मृणालिनी's picture

22 Jul 2019 - 5:13 pm | मृणालिनी

:) हो.

मुक्त विहारि's picture

22 Jul 2019 - 6:04 pm | मुक्त विहारि

आवडलं... दोन सुचना...योग्य वाटल्यास अंमलबजावणी करावी...

1. शुद्धलेखन....

2. थोडे परिच्छेद टाकलेत तर वाचायला सोपे पडेल.

सुचना केल्या बद्दल क्षमस्व....

आणि फाट्यावर मारल्या गेल्यास कमीपणा वाटून घ्यायचा नाही असेच मी करतो

मृणालिनी's picture

22 Jul 2019 - 7:32 pm | मृणालिनी

फाट्यावर

मारण्याची गरज लेखक आणि वाचकात येतच नाही. लेखक लिहितो. आवडले नाही तर वाचकाला धागा स्वतःपुरता बंद करता येतो. सुचनांचे स्वागतच असते. पण त्या कोणत्या उद्देशाने दिल्या जातात हे महत्वाचे वाटते.
एखादी व्यक्ती लेखन करते तेव्हा तिला सुचना मिळण्याची भिती नसतेच. फक्त विचार न करता प्रतिक्रिया देणाऱ्यांची असते. :) माझं कोणाशीही व्यक्तीगत भांडण नाही, ना मला वाईट इगो आहे. लिखाण सुधारावे या साठी देलेल्या सर्व सुचना आदरणीयच!

मृणालिनी's picture

22 Jul 2019 - 7:21 pm | मृणालिनी

मुक्त विहारीजी,
सुचना करण्यास काहीच हरकत नाहीये. क्षमा मागू नये कृपया!
:)

म्हून घाबराले हो ते. सावरायला वेळ लागेल. मिपाकर आहेत ते काळजी नको ;)

मृणालिनी's picture

22 Jul 2019 - 7:43 pm | मृणालिनी

मी काही कोणाला वेठीला धरत नाही.
मी लिहिलेल काही वगळले तर बाकी मिपावाचकांनी सत्य असल्याचे दाखवून दिलेच की.

मी असे कैक धागे मिपावर पाहिले जिथे लिखाणात चुका असुनही नुसत्या ' मस्त छान जबरदस्त ' वगैरे वाचायला मिळाले. खरतर ते लिखाणही सुमारच होते.

तर काही धाग्यांवर याच्या उलटी गत!

मी फक्त म्हणाले कि वाचक

या धाटणीचे नाहीत.

त्यातही सगळे चिडले. :( कमाल आहे.

जॉनविक्क's picture

22 Jul 2019 - 7:52 pm | जॉनविक्क

धमाल आहे धमाल.

फक्त समजून घेता येणे आवश्यक. मग राग, तक्रार, दया, क्षमा शांती सारख्या कृत्रिमतेच्या बेगडी बेड्या आपोआप ढळतिल आणि शापितहि झाल्याचे फील येणार नाही. :)

मृणालिनी's picture

22 Jul 2019 - 8:33 pm | मृणालिनी

दया क्षमा शांती राग या तर नैसर्गिक रित्या मिळालेल्या भावना आहेत. कृत्रिमता नाही. बाकी मी खरे ते निरीक्षण सांगितले.

जॉनविक्क's picture

22 Jul 2019 - 8:56 pm | जॉनविक्क

दया, क्षमा आणि शांती या भावना कृत्रिम आहेत. राग हा कधी नैसर्गिक तर कधी कृत्रिम असतो. म्हणून त्यालाही बेगडी म्हटले आहे.

जॉनविक्क's picture

22 Jul 2019 - 9:01 pm | जॉनविक्क

दया, क्षमा आणि शांती या भावनांचे मूळ पश्चाताप हे आहे आणि पश्चाताप हा विनाकारण (नसर्गिकपणे) होत नसतो. बहुतेक व्यक्तीच्या दया, क्षमा, शांतीच्या चेहऱ्यामागे पाश्चातापाच्या स्मृतीचा फार मोठा पदर दडलेला असतो

जॉनविक्क's picture

22 Jul 2019 - 9:06 pm | जॉनविक्क

अजूनही समजत नसेल तर मुवींबरोबरची आपली चर्चा पुन्हा पुन्हा वाचा, तरीही समजले नाही तर इतकेच लक्षात घ्या की सुचना केल्या बद्दल क्षमस्व.... हे वाक्य मुवीं अथवा कोणीही प्रतिसाद टँकून पश्चातबुद्धी दृढ झाल्या शिवाय लिहावेसे वाटणे मानवी कुवतीस अशक्य आणि अतर्क्य आहे

मृणालिनी's picture

22 Jul 2019 - 9:51 pm | मृणालिनी

तुम्ही का मध्ये त्याच स्पष्टीकरण देताय?
मला काय समजायचय ते सोडा आता. मी बघून घेइन.

आपणास काय समजते ते आपले प्रारब्ध. माझा कर्मयोग भंग करण्याचे आपले प्रयोजन स्पष्ट कराल का ?