बरेच काही..!

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
7 Nov 2008 - 12:29 pm

आठवशिल तर आठवेलसे बरेच काही.
अजुनी आहे राहिले तसे बरेच काही.

मुठीत नाही आली स्वप्ने खंत कशाला,
ओंजळीतही मोहवेलसे बरेच काही..

क्षितिजापाशी सांज देऊनी गेली मजला.
निशा, चांदणे, गंध, कवडसे बरेच काही..

तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो.
घडले आहे जागवेलसे बरेच काही..

जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो.
श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही..

आज किनारी उरलेले वेचण्यास आलो,
वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..!

-- अभिजीत दाते

गझलविचार

प्रतिक्रिया

दात्यांचे नाव उज्वल केलेस मित्रवर्या...
सुंदर अभिजित सुंदर

खास करुन शेवटच्या ३ कडव्यांत प्राण ओतला आहे

तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो.
घडले आहे जागवेलसे बरेच काही..

जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो.
श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही..

आज किनारी उरलेले वेचण्यास आलो,
वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..!

एकदम सुंदर... अजुन येऊ देत....

माझ्या हृदयांत पण उमटतात तरंग काव्याचे
तिच्या - माझ्या, आठवणी.... आणि बरंच काही....

(कधी तरी कविता करणारा) सागर

नंदन's picture

7 Nov 2008 - 1:05 pm | नंदन

उत्तम गझल.

मुठीत नाही आली स्वप्ने खंत कशाला,
ओंजळीतही मोहवेलसे बरेच काही..

-- हा शेर विशेष आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाशीराम कोतवाल १.२'s picture

7 Nov 2008 - 3:28 pm | घाशीराम कोतवाल १.२

मस्त आहे
संगणकिय किडे तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत

प्राजु's picture

7 Nov 2008 - 11:14 pm | प्राजु

क्षितिजापाशी सांज देऊनी गेली मजला.
निशा, चांदणे, गंध, कवडसे बरेच काही..

सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/