अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 6 Jul 2019 - 10:32 pm स्थलकालाचे ताणेबाणे जटिल, चिवट पण तटतट तुटले घालित अवघड नवे उखाणे जडातुनी चैतन्य उमलले सप्तरंग लवथवले, मिटले सप्तसूर झंकारुन शमले भवतालाला भारून काही पुन्हा निवांत झाले तर्काच्या सीमेवर तेव्हा अतर्क्य भेटुनी गेले माझी कवितामुक्तक प्रतिक्रिया सुंदर आणि अफाट आहे हे! 10 Nov 2019 - 11:03 am | सोत्रि सुंदर आणि अफाट आहे हे! - (अनन्त्_यात्री नावाची दखल घेतलेला) सोकाजी विस्कटून सांगताल का भाऊ ? 11 Nov 2019 - 11:05 pm | जॉनविक्क (तर्काच्या सीमेवरील अतर्क्य)- जॉनविक्क छान! 13 Nov 2019 - 11:59 am | राघव छान! तर्कबुद्धीच्या पलिकडे असलेला, एक नवाच रोमांचकारी अनुभव, अवचित येण्याच्या क्षणाचे वर्णन खूप आवडले. :-) दुसरी कविताही त्याचेच वर्णन सांगतेय, होय ना? राघव, 13 Nov 2019 - 3:03 pm | अनन्त्_यात्री मला अभिप्रेत असलेले नेमक्या शब्दात मांडल्याबद्दल आभार!
प्रतिक्रिया
10 Nov 2019 - 11:03 am | सोत्रि
सुंदर आणि अफाट आहे हे!
- (अनन्त्_यात्री नावाची दखल घेतलेला) सोकाजी
11 Nov 2019 - 11:05 pm | जॉनविक्क
(तर्काच्या सीमेवरील अतर्क्य)- जॉनविक्क
13 Nov 2019 - 11:59 am | राघव
छान!
तर्कबुद्धीच्या पलिकडे असलेला, एक नवाच रोमांचकारी अनुभव, अवचित येण्याच्या क्षणाचे वर्णन खूप आवडले. :-)
दुसरी कविताही त्याचेच वर्णन सांगतेय, होय ना?
13 Nov 2019 - 3:03 pm | अनन्त्_यात्री
मला अभिप्रेत असलेले नेमक्या शब्दात मांडल्याबद्दल आभार!