'तेरी केहॆके लुंगा' भाग 2

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
16 Jun 2019 - 6:32 pm

ऍडमिट झाल्यावर रेक्टरनी घरी कळवले. काळजी घ्यायला मित्र होते. आई रेक्टर ला फोन करून बोलली की मी 6-7 दिवसांनी येते. तो पर्यंत त्याच्या मावस भावांना पाठवते. दुसऱ्या दिवशी भाऊ हजर. जास्त कोणाला सांगू नका ही ताकीद मी दिलेलीच. पाहिले काम त्यांनी केले न्हावी आणि फेस मसाज वाल्याला बोलावले. जरा बरा दिसायला लागलो मी. डोक्यात राग बराच होता
इकडे हिचा भाऊ आणि त्याचे 4 मित्र लपून बसलेले .
काही खबर नव्हती. हेयर लाईन क्रॅक आणि जखमा भरून निघाल्यावर आठवड्या नंतर डिस्चार्ज मिळाला. इकडे वेगळेच नाटक रंगले होते.
ज्युनियर आणि सिनियर चे. या अनविता कुमारी भाग जा.अनविता कुमारी रंडी हे( भाषेबद्दल क्षमस्व) ह्या रोज घोषणा हॉस्टेल समोर होत होत्या .
पोलीस आलेले मला 3 वेळा शोधायला . रेक्टर शी बोलणे झाले म्हणाले येऊ नको 15 दिवस तरी. लॉज बुक केला. भावाला म्हटले तू जा आता पण मला लाखभर रुपये आता देऊन जा. आई आल्यावर भांडायचे नाहीये मला. माझा चिडचिडेपणा पाहून चेक देऊन गेला बिचारा. अभ्यास कर हा सांगून.
हमको दिवना कर गये नामक अक्षय कुमार चा चित्रपट आलेला. रोज 4 शो पहायचे . तिकडेच बॉटल मध्ये दारू मिक्स. झोपायचे आणि. हे सगळे पोलीस पकडू नये म्हणून. 1 ला रात्री लॉज ला जायचे आणि झोपायचे परत 9 ला मुव्ही...
त्रास होत होता पण काय करू सुचत नव्हते. 8 दिवसांनी रेक्टर चा फोन आला वरूण हॉस्टेल ऑफिस ला ये. गेलो मी .म्हणाले वरुण बाहेरून खूप चक्र फिरत आहेत. मला फोन आले वरुण मोहिते आया तो तुरंत बताना. जपून राहा.
परत लॉज ला मी.
त्यानंतर अचानक 2 दिवसांनी सोमाणी चा बॉयफ्रेंड आला वास्तविक तो काय माझा मित्र वैग्रे नव्हता ना आय आय टी ला शिकत होता. बोलला चल म्हटलं कुठे? आणि माझा पाय दुखतोय. गाडीने जाऊ गाडीने परत सोडतो तुला म्हणाला .
आगरपडा, मीदनापूर ला वैगरे घेऊन गेला. देशी कट्टे यायचे तिकडे. दाखवत नसलो तरी घाबरलेलो मी. गोरखपूर चे कट्टे , पश्चिम बंगाल ला घरचे कोण नाही . सेमिस्टर तोंडावर.
हा म्हणाला पैसा रख . सोच मत कुछ हुवा तो मेरा बाप देख लेगा. रूम वर आलो लॉज च्या तितक्यात नीरज म्हणून एक लोकल गुंड आला. मारते साले को . सोमाणी बोला मुझे . चूप क्यो बैठा तू असं काय काय बोलायला लागला.
आता ह्या नीरज आणि योगेश बाहुबली ह्या हत्तीच्या लढाईत मी पिचणार मला कळून चुकले होते.
मी काही बोललो नाही फक्त रात्रंदिवस अभ्यास चालू केला . कोणी विषय काढला तर जाणे दे रे इतकंच बोलायचो.
कॉलेज ला माफीपत्र पाठवले . मंजूर झाले. आई पण येणार होती पण ती गेल्यावर परत सेम नंतर बदला कसा घ्यायचा हा प्लॅन डोक्यात पूर्ण तयार होता. थंडगार वाटते कमरेला गन असली की !!!
आता जपून पावलं टाकायची होती. तितक्यात मी हॉस्टेल ला आलोय समजताच अनविता चा फोन आला . वरुण माँ को मिलने आऊ मै? सॉरी यार. आय लव्ह यु रे....
क्रमशः

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

16 Jun 2019 - 6:36 pm | आनन्दा

पुभाप्र

मुक्त विहारि's picture

16 Jun 2019 - 6:43 pm | मुक्त विहारि

पुढचा भाग लवकर टाका.....ही विनंती....

दुर्गविहारी's picture

16 Jun 2019 - 6:44 pm | दुर्गविहारी

उत्सुकता ताणली गेली आहे, आता जास्त वाट बघायला लाउ नका. पु.भा.प्र.

जेम्स वांड's picture

16 Jun 2019 - 7:00 pm | जेम्स वांड

आतुरता ताणून घ्यायची कला आहे तुमच्या हाती. आता लवकर टाका पुढचा भाग

टर्मीनेटर's picture

16 Jun 2019 - 7:05 pm | टर्मीनेटर

थंडगार वाटते कमरेला गन असली की !!!

+१००
पुढचा भाग लवकर येउद्या.

जेम्स वांड's picture

16 Jun 2019 - 8:14 pm | जेम्स वांड

तुमच्याकडे पण दंबुक आहे का काय!?

टर्मीनेटर's picture

16 Jun 2019 - 9:04 pm | टर्मीनेटर

नाही हो...पण पोलीस खात्यातील एका एनकाउंटर स्पेशालीस्ट मित्राच्या आणि ग्रुप मधल्या दोघा परवानाधारक मित्रांच्या कृपेने काहीवेळा दंबुक कमरेला लाऊन फिरण्यातले थ्रील अनुभवले आहे म्हणून...

वरुण मोहिते's picture

16 Jun 2019 - 8:43 pm | वरुण मोहिते

चायनीज खाताना काट्याला पण घाबरतो:)))

मुन्नाभाय, वो अनविता डबल एजंट लगती है. रिश्ता मत बनाओ उससे भाय.

वरुण मोहिते's picture

16 Jun 2019 - 9:45 pm | वरुण मोहिते

कसला रिशता बरीच वर्षे झाली ह्या गोष्टीला.
जेम्स भाऊ व.32 पिस्तूल ( एन पी बी) अशनी mkll one. State license आहे लायसन्स सोबत. आणि कट्टा पण आहे. सेपरेट.

जेम्स वांड's picture

17 Jun 2019 - 8:18 am | जेम्स वांड

.३३, .३२ कसे ठरते? एन पी बी म्हणजे मेकर/ब्रँड नेम असते का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jun 2019 - 11:42 am | डॉ सुहास म्हात्रे

.३२ हा आकडा शस्त्रात वापरल्या जाणार्‍या गोळीचा इंचामध्ये व्यास/बोअर (०.३२ किंवा ८.१ मिमी) दर्शवितो. "हा आकडा + शस्त्राचे नाव आणि/किंवा शस्त्र बनवणार्‍या कंपनीचे नाव" यांच्या संयुक्त वापराने बहुतेक शस्त्रे ओळखली जातात.

उदा :
.32 ACP (Automatic Colt Pistol), a pistol cartridge
.32-40 Ballard, an American rifle cartridge
.32 H&R Magnum, a rimmed cartridge designed for use in revolvers
.32 Long Colt, an American centerfire fire revolver cartridge
.32 NAA, a cartridge/firearm system from North American Arms and Corbon Ammunition using a .380 ACP case
.32 Remington, an American rifle cartridge
.32 rimfire cartridge, chambered in revolvers and rifles in the late 19th and early 20th centuries
.32 S&W, cartridge was introduced in 1878 for the Smith & Wesson model 1½ revolver
.32 S&W Long, a straight-walled, centerfire, rimmed handgun cartridge, based on the earlier .32 S&W cartridge
.32-20 Winchester, the first small-game lever-action cartridge that Winchester produced
.32 Winchester Self-Loading, an American rifle cartridge
.32 Winchester Special, a rimmed cartridge created in October 1901 for use in the Winchester Model 94 lever-action rifle

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jun 2019 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतात शस्त्रांचा वापर करण्यासंबंधीच्या कायद्याप्रमाणे शस्त्रांचे खालील प्रकार होतात :

१. PB - PROHIBITED BORE : या शस्त्रांचा व्यापारी किंवा खाजगी तत्वावर, खरेदी, विक्री अथवा वापर करायला बंदी आहे. ही शस्त्रे केवळ सैन्य अथवा इतर सशस्त्र बलेच वापरू शकतात. पंतप्रधान, राज्यपाल किंवा गृहखाते अपवादात्मकरित्या काही विशिष्ट व्यक्तींना ही शस्त्रे वापरायला परवानगी देऊ शकते.

२. NPB - NON-PROHIBITED BORE : ही शस्त्रे विकत घेण्यास आणि वापरण्यास सर्वसामान्य भारतिय नाकरिकाला परवाना मिळू शकतो. बहुतेक वेळेस, स्वसंरक्षण व क्रिडाप्रकार या कारणांसाठी असा परवाना दिला जातो.

सुबोध खरे's picture

21 Jun 2019 - 12:03 pm | सुबोध खरे

लष्करी बंदुका पिस्तूल किंवा रिव्हॉल्वर यांच्या गोळ्यांचे व्यास नागरी जीवनात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांपेक्षा मुद्दाम वेगळे असतात कारण ऑर्डेनन्स फॅक्टरी मधून गोळ्या चोरीला गेल्या तरी त्या बाहेर सहजासहजी विकल्या जाऊ नयेत / वापरता येऊ नयेत किंवा बंदूका चोरल्या तरी गोळ्या सहजासहजी मिळू नयेत.

भारतीय लष्करात ९ मिमी हे कार्बाईन मशिनगन किंवा रिव्हॉल्वर च्या गोळ्यांचा व्यास असतो, ७.६२ मिमी हा सेल्फ लोडींग रायफल चा व्यास असे. आणि ५.६५ मिमी हा इन्सास या रायफलच्या गोळ्यांचा व्यास आहे.

बंदूक हातात असताना आपल्याला "शक्तिमान" झाल्याचा भास होतो. मी अंदमान ला असताना मला रिव्हॉल्व्हर चा परवाना मिळत होता परंतु शस्त्र बाळगणे हि नागरी जीवनात सोपी गोष्ट नाही.

आपले राजकीय लागेबांधे असले पाहिजेत अन्यथा पोलिसांकडून कटकट होण्याची शक्यता बरीच असते.

उदा. निवडणूक किंवा इतर काही धामधुमीचा वेळेस आपले शस्त्र पोलिसांकडे जमा करावे लागते. शस्त्र चोरीला गेले किंवा कुणी गैरवापर केला तर ती आपलीच जबाबदारी असते.

त्यामुळे मुंबई पुण्यासारख्या शहरी भागात किंवा महाराष्ट्रासारख्या कायद्याचे राज्य असलेल्या राज्यात शस्त्र असल्यापेक्षा नसलेले बरे

एकंदर लोकांवर रुबाब मारायला कमरेला पिस्तूल असणे चांगले वाटत असले तरी तो चालवणारा हात आणि त्या मागचा मेंदू हा जास्त कणखर असावा लागतो हे खरे.

वरुण मोहिते's picture

21 Jun 2019 - 1:38 pm | वरुण मोहिते

दर वर्षाला मानसिक रोगी नाही चे सर्टिफिकेट , ( अर्थात ते तपासणी न करता मिळते) आणि निवडणूक आली की शस्त्र जमा. त्यात अर्धा दिवस घालवा. आणि असले तरी ज्यांचे डोके खूप शांत आहे त्यांनीच वापरावे

वरुण मोहिते's picture

21 Jun 2019 - 3:21 pm | वरुण मोहिते

मजा नाही. सराव मैदानात एक गोली एक दुश्मन लिहिले असले की 100 मीटर ला पण कानठळ्या बसायचा आवाज येतो. बफर साऊंड कानात घालावा लागतो

जॉनविक्क's picture

21 Jun 2019 - 7:45 pm | जॉनविक्क

तरीही इनसासच सर्वातजास्त प्रमाणात भारतीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याकडे का दिसते ?

सुबोध खरे's picture

22 Jun 2019 - 7:17 pm | सुबोध खरे

सरकार जी बंदूक आणि गोळ्या देते त्याच वापराव्या लागतात. मग दहशतवाद्यांकडे AK ४७ आणि रॉकेट लॉँचर असला तरी

आता मात्र इन्सासऐवजी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बंदुका जलदगती खरेदी तत्वावर विकत घेतल्या जात आहेत.

https://www.news18.com/news/india/india-to-buy-72400-assault-rifles-from...

सुबोध खरे's picture

22 Jun 2019 - 7:29 pm | सुबोध खरे

साडे सहा लाख AK १०३ रायफली भारतात मेक इन इंडिया खाली उत्पादित केल्या जाणार आहेत.

https://www.livefistdefence.com/2018/11/mega-made-in-india-kalashnikov-a...

जेम्स वांड's picture

17 Jun 2019 - 1:48 pm | जेम्स वांड

फारच प्रचंड अन गहन शास्त्र दिसतंय हे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jun 2019 - 5:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

जगातल्या सर्वात मोठ्या फायद्याच्या (शस्त्रनिर्मिती आणि शस्त्रविक्री) व्यवसायासंबंधीचे शास्त्र गहन आणि गुंतागुंतीचे असणारच ! :)

वरुण मोहिते's picture

17 Jun 2019 - 6:25 pm | वरुण मोहिते

शस्त्र, बीफ आणि ड्रग्स ह्यात सर्वात जास्त मार्केट रोलिंग आहे. आता बीफ मार्केट वर ज्यू लोकांची पकड आहे म्हणा

वरुण मोहिते's picture

17 Jun 2019 - 6:25 pm | वरुण मोहिते

शस्त्र, बीफ आणि ड्रग्स ह्यात सर्वात जास्त मार्केट रोलिंग आहे. आता बीफ मार्केट वर ज्यू लोकांची पकड आहे म्हणा

जेम्स वांड's picture

18 Jun 2019 - 8:52 am | जेम्स वांड

सामान्य आयटी क्षेत्रातले हमाल आम्ही, आमचीच कंपनी इतकी मिलियन डॉलर्सची झाली वगैरे ऐकायला भारी वाटत असे. पण लेकाचं हे तर पार कॉम्प्लेक्स देऊन गेलं!.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2019 - 3:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो कॉम्प्लेक्स जरासा अजून वाढवतो. ;) :)

एकट्या अमेरिकेन कंपन्यांच्या, बदूंका (फायरआर्म्स) व त्यांच्या गोळ्या (अम्म्युनिशन) यांच्या दरवर्षीच्या उलाढालीची रक्कम सहजपणे सुमारे युएस $२८ बिलियन (सुमारे रु२ लाख कोटी) च्या वर जाते. त्यापैकी, सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांना विकल्या जाणार्‍या बंदूका व गोळ्यांची किंमत सुमारे युएस $१३.५ बिलियन (सुमारे रु९४,५०० कोटी) आहे.

पण यापेक्षा जास्त महत्वाची आणि विचित्र परिस्थिती अशी आहे की, सहजपणे मिळणार्‍या त्या शस्त्रांपासून सुरक्षित राहण्यासाठी, अमेरिकन नागरिक व संस्था (बँका, शाळा, व्यापारी संस्था, इ) सुमारे युएस $२५ ते ३० बिलियन (सुमारे रु.१,७५,००० ते २,१०,०० कोटी) खर्च करतात ! :O) (कपाळावर हात मारणारी स्मायली)

संदर्भ :
१. https://www.forbes.com/sites/elizabethmacbride/2018/11/25/americas-gun-b...
२. IBIS World इथे अजून बरीच रोचक आकडेवारी मिळेल.

अमेरिकेत अध्यक्ष्यपदाच्या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराला, National Rifle Association of America (NRA) चा पाठींबा असावा लागतो व त्याला "प्रत्येक सज्ञान अमेरिकन नागरिकाच्या बंदूक बाळगण्याच्या वैधानिक हक्काला उघड पाठींबा द्यावा लागतो". तसे न करणे पराभवाला आमंत्रण दिल्यासारखे असते. प्रत्येक अमेरिकन राज्याचे बंदूकांबाबतचे कायदे वेगवेगळे आहेत आणि काही राज्यांत ते फारच तकलादू आहेत... तेथे 'ओटिसी नसलेल्या औषधांपेक्षा' जास्त सहजपणे बंदूक खरेदी करता येते !

चामुंडराय's picture

21 Jun 2019 - 2:49 am | चामुंडराय

म्हात्रे सर, हे ८.१ cm च्या ऐवजी mm पाहिजे का?
८. १ cm म्हणजे तोफ गोळा होईल बहुधा

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2019 - 3:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

बरोबर आहे तुमचे, धन्यवाद. ते ८.१ मिमी किंवा ०.८१ सेमी असे आहे.

नाखु's picture

16 Jun 2019 - 10:19 pm | नाखु

उत्तम कथा, आवडली आहे
एखाद्या सिनेमा, मालिकेत सहज खपेल असे अनुभव विश्व आहे

सरधोपट पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

की वाचकांची खरचं घेताय की समजायचं ?

वरुण मोहिते's picture

16 Jun 2019 - 11:16 pm | वरुण मोहिते
वरुण मोहिते's picture

16 Jun 2019 - 11:16 pm | वरुण मोहिते
लई भारी's picture

17 Jun 2019 - 9:50 am | लई भारी

अशक्य माणूस आहे तुम्ही!
सगळा डेंजर प्रकार आहे. एकतर पूर्णपणे वेगळा मुलुख आणि त्यात कोणावर विश्वास ठेवायचा.

वेळात वेळ काढून लिहिल्याबद्दल धन्यवाद. पुढचा भाग टाका लवकर.

नावातकायआहे's picture

17 Jun 2019 - 12:29 pm | नावातकायआहे

टंचनिका पाठवु का?

की जेणेकरून पुढील भाग येईपर्यंत अजून एकदा/दोनदा जरी वाचन झाले तरी कंटाळा न वाटता भागाचे अपेक्षित रसग्रहण व्यवस्थित होईल.

Nitin Palkar's picture

17 Jun 2019 - 10:54 am | Nitin Palkar

एस्. एम. काशीकर आणि गुरुनाथ नाईक दोघांचीही आठवण आली.

खिलजि's picture

17 Jun 2019 - 12:15 pm | खिलजि

आईची आन

मस्त रंगवलंय लिखाण

पुढच्या गोष्टींना त्यामुळे

आलया प्रचंड उधाण

येऊ देत अजून

तुमच्या लावलाईफची स्टोरी

माझीपण काहीशी अशीच होती

भयानक दुनियादारी

एक सांगतो तुम्हाला

मी पण खाल्ला होता

कधीकाळी चाळीसपन्नास जणांकडून

यथेच्छ मार

नंतरमात्र पेपरात झळकलो डोंबिवलीच्या

तिथला डीएनसी हायस्कुलचा एरिया बंद करून पार

मोडून टाकली रसद

तिथल्या मवाली पोरांची

आजही आठवण काढतात तिथले धंदेवाले

अद्दल घडवली साल्याना कायमची

अन्विताचा दोस्त म्हणून नुसतंच धोपटून सोडलं. गेम नाय केला असंच ना?

बाकी श्टोरी लवकर लवकर अजिबात टाकू नकोस.

खिलजि's picture

17 Jun 2019 - 12:37 pm | खिलजि

ओ कंकाका असं म्हणताय ? ष्टोरी तर लवकरात लवकर पाहिजे .. फार उत्कंठा दाटून आलीय ..

देशपांडेमामा's picture

17 Jun 2019 - 12:39 pm | देशपांडेमामा

पुढला भाग लवकर टाका

देश

वरुण मोहिते's picture

17 Jun 2019 - 3:42 pm | वरुण मोहिते

कॉर्पोरेट राजकारणावर पण एक सिरीज आहे. ती पण टाकायची आहे

चंद्र.शेखर's picture

17 Jun 2019 - 6:01 pm | चंद्र.शेखर

उत्सुकता वाढली आहे. लवकर येवू द्या पुढचा भाग.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Jun 2019 - 12:22 am | अमरेंद्र बाहुबली

दोन्ही लेख जबरा. येउद्या अजून.