मोकळ्या कुंतलात माळतोस स्वप्नांची सुमने..
सांग ना,सख्या कुठुन आणतोस ती सुमने?
*
निद्रेत अनावृत देहावर कसा माळतोस तो चंद्र्मा
सांग ना? जागेपणी कशी उमटते नखक्षतांची रांगोळी?
*
अरे धसमुसळ्या..मीठीत घेत चुरगाळतोस देह माझा
सांग ना..उरात कसे भरतोस? ते टिपुर चांदणे
*
मिलनाची अधीर ती रात्र सावळी .कळी कोवळी
सांग ना.कशी काचते.मधुघटानी भरलेली चोळी???
प्रतिक्रिया
6 Jun 2019 - 12:03 am | टवाळ कार्टा
मस्तय ;)
6 Jun 2019 - 3:37 pm | प्रलयनाथ गेंडास...
हुश्श्य , आता ..
"सांग न सख्या, बांधतो का राख्या "
वै अशी, विडंबने आली नाही म्हणजे मिळवली !
6 Jun 2019 - 3:37 pm | खिलजि
एक दोन प्रश्न पडलेत अक्कुकाका
" काचते " म्हणजे काय ?
आणि दुसरा " हा देह चुरगाळणारा नक्की कोण आहे ?"
कविता छान आहे पण त्या दोन प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत आणि तीही तुमच्याकडूनच .. द्याल ना ?
6 Jun 2019 - 7:13 pm | जॉनविक्क
सक्या.