Skip to main content

सांग ना,सख्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 05/06/2019 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या कुंतलात माळतोस स्वप्नांची सुमने.. सांग ना,सख्या कुठुन आणतोस ती सुमने? * निद्रेत अनावृत देहावर कसा माळतोस तो चंद्र्मा सांग ना? जागेपणी कशी उमटते नखक्षतांची रांगोळी? * अरे धसमुसळ्या..मीठीत घेत चुरगाळतोस देह माझा सांग ना..उरात कसे भरतोस? ते टिपुर चांदणे * मिलनाची अधीर ती रात्र सावळी .कळी कोवळी सांग ना.कशी काचते.मधुघटानी भरलेली चोळी???
लेखनविषय:

वाचने 2550
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

हुश्श्य , आता .. "सांग न सख्या, बांधतो का राख्या " वै अशी, विडंबने आली नाही म्हणजे मिळवली !

एक दोन प्रश्न पडलेत अक्कुकाका " काचते " म्हणजे काय ? आणि दुसरा " हा देह चुरगाळणारा नक्की कोण आहे ?" कविता छान आहे पण त्या दोन प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत आणि तीही तुमच्याकडूनच .. द्याल ना ?