राजा विक्रमादित्य

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
4 Jun 2019 - 3:07 pm

०

उज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली.
.
ती घोडे सांभाळणार्‍या सेवकाच्या प्रेमात पडली. राजाला पिंगलाचे हे कृत्य माहिती नव्हते, कारण तो तिच्या प्रेमात आंधळा झाला होता. जेव्हा छोटा भाऊ विक्रमादित्यला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी मोठ्या भावाला या संदर्भात सर्व माहिती दिली. त्यानंतरही राजा भर्तृहरी पिंगलाच्या बाजूनेच उभा राहिला आणि विक्रमादित्यवरच वाईट चारित्र्याचा आरोप लावत त्याला राज्यातून बाहेर काढले.
.
अनेक वर्षानंतर पिंगलाचा व्यभिचार उघड झाला, जेव्हा एका तपस्वी ब्राह्मणाने कठोर तपश्चर्या करून देवतांकडून मिळालेले अमरफळ( हे फळ खाणारा व्यक्ती अमर होतो) राजाला भेट स्वरुपात दिले. राजा पिंगलाच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होत की, त्याने हे फळ तिला दिले. कारण हे फळ खाल्ल्यानंतर पिंगला नेहमीसाठी तरुण आणि अमर होईल तसेच आपणही तिच्या सहवासात राहू असा राजाने विचार केला.
.
पिंगलाने ते फळ घोडे सांभाळणार्‍या सेवकाला दिले. त्या सेवकाने ते फळ एका वेश्येला दिले, जिच्यावर त्याचे प्रेम होते. वेश्येने विचार केला की, हे अमरफळ खाऊन आयुष्यभर तिला या पाप कर्मात राहावे लागेल. यामुळे तिने ते फळ राजाला भेट दिले आणि सांगितले की, तुम्ही हे फळ खाल्ले तर प्रजासुद्धा दीर्घकाळापर्यंत सुखी होईल.
.
पिंगलाला दिलेले ते फळ वेश्येकडे पाहून राजा भतृहरीच्या पायाखालची जमीन सरकली. राजाला भावाचे शब्द आठवले आणि पिंगलाचा विश्वासघात लक्षात आला. राजा भतृहरीचे डोळे उघडले आणि पिंगलाबद्दल मनामध्ये घृणा उत्पन्न झाली. त्यानंतर राजाने पिंगला आणि त्या सेवकाला शिक्षा दिली नाही. राजाने सर्व राजवैभवाचा त्याग करून वैराग्य धारण केले. आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये राजा भर्तृहरीने भर्तृहरि शतक ग्रंथामध्ये श्रुंगार शतकच्या माध्यमातून सौंदर्य विशेषतः स्त्री सौंदर्याशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींना कोणताही पुरुष नाकारू शकत नाही.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

4 Jun 2019 - 3:31 pm | जॉनविक्क

गोष्ट भर्तृहरीची, विचार स्त्रियांच्या सुंदरतेबाबत,मत पुरुषांच्या स्त्रियांच्या विचाराबाबत, हे सर्व छान. परंतू टायटल "राजा विक्रमादित्य" काएको रखेला है बॉस ?

प्रसाद_१९८२'s picture

4 Jun 2019 - 3:40 pm | प्रसाद_१९८२

आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये राजा भर्तृहरीने भर्तृहरि शतक ग्रंथामध्ये श्रुंगार शतकच्या माध्यमातून सौंदर्य विशेषतः स्त्री सौंदर्याशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींना कोणताही पुरुष नाकारू शकत नाही.
--
कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत ?

फळ एकाने दुसऱ्याला दिले तर एकाच अमर होईल
तार्किक दृष्ट्या बरोबर नाही

जालिम लोशन's picture

4 Jun 2019 - 3:59 pm | जालिम लोशन

भावना पोहचली नाही.

ज्योति अळवणी's picture

4 Jun 2019 - 7:11 pm | ज्योति अळवणी

एकूण लेखाचे प्रयोजन कळले नाही. मात्र त्यानिमित्ताने भर्तृहरी हा विक्रमादित्यचा भाऊ होता हे कळले आणि त्याअनुषंगाने त्याविषयीची माहिती देखील.

आता स्रीसौंदर्याविषयी भर्तृहरी यांनी काय लिहिले आहे आणि पुरुष ते कसं नाकारू शकत नाहीत हे देखील सांगावेत

ज्योति अळवणी's picture

4 Jun 2019 - 7:11 pm | ज्योति अळवणी

एकूण लेखाचे प्रयोजन कळले नाही. मात्र त्यानिमित्ताने भर्तृहरी हा विक्रमादित्यचा भाऊ होता हे कळले आणि त्याअनुषंगाने त्याविषयीची माहिती देखील.

आता स्रीसौंदर्याविषयी भर्तृहरी यांनी काय लिहिले आहे आणि पुरुष ते कसं नाकारू शकत नाहीत हे देखील सांगावेत

धागा लेखातील कथा पौराणिक साहित्यातून आलेली दिसते, पण अशा प्रकारचे स्त्री-संशय साहित्य बौद्ध जातक कथातून मुबलक प्रमाणात आढळते, काही प्रमाणात त्याचीच री पैराणिक साहित्याने वेगळ्या शैलीतून ओढली असण्याची शक्यता मला तरी व्यक्तिशः बरीच वाटते.

पुराणांमधील स्त्री-संशय साहित्या पेक्षा जातक कथातील स्त्री- संशय साहित्याचा उद्देश्य खूप अधिक स्पष्ट पणे समोर येतो. एखादा भिख्खु किंवा संन्यासी संसारी पुरुषांना एका मागोमाग स्त्रीयांच्या विवाह बाह्य संबंधांची कथा उदाहरणे देतात, स्त्रीयांच्या विवाह बाह्य वर्तनाने मनास दु:ख्ख प्राप्त होते अशा दुखःखातून बाहेर पडण्याचा संन्यास हा मार्ग आहे म्हणून मी संन्यस्त जिवन अंगिकारले आणि गृहस्थ जिवनातले दु:ख्ख तुलाही नको असेल तर तुही माझ्या प्रमाणे गृहस्थ जिवनाचा त्याग करून संन्यास दिक्षा घे. अशा पद्धतीने जातक कथांमध्ये स्त्री-प्रती संशय जागा करण्याचा हेतु अत्यंत स्पष्ट पणे समोर येतो

संन्यसत्व घेण्याचा आग्रह बौद्ध धर्मीय भिख्खु कथात येतो तेवढा पौराणिक कथात स्पष्टपणे येत नाही. पौराणिक कथांची दिशा स्त्री हि आकर्षण आणि मोक्षाच्या मार्गापासून पतित करणारी असू शकते इथपर्यंत येऊन थांबते. त्यामुळेच पौराणिक स्त्रीसंशय कथांचा वापर लगेच संन्यास दिक्षा घेण्याचे आवाहन करताना कमी दिसतो. याचे कारण बौद्ध भिख्खूं धर्म प्रसारार्थ संसारी गृहस्थांना संन्यास घेण्यास प्रोत्साहन देतच पण प्रत्येक घरातून एक मुलगा धर्म प्रसारार्थ दिलाच पाहीजे या बद्दलही हि मंडळी मुलखाची आग्रही राहिली असावित. त्या काळात या बौद्ध धर्मीय पॉलीसीचा सामाजिक परिणामाची माहिती चीन मधील राजसत्ता एका वेळी परेशान झाली याची माहिती चिनी इतिहासात नोंदवली गेली. मृत्यूदर अधिक असलेल्या काळात घरटी एक मुलगा धर्मप्रसारार्थ घेऊन जाणे दिसला संसारी भिख्खूत कन्व्हर्ट करणे यामुळे उत्पादनावर परिणाम होतोय आणि त्या पारिणामी टॅक्स कलेक्शन कमी होते आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्या काळात चिनी राजसत्तेने बौद्धधर्मांतरावर काही बंधने घालण्यास सुरवात केल्याचे दिसून येते.

असाच प्रॉब्लेम भारतातही झाला असणार पण इथे बौद्ध धर्मीयांशी स्पर्धेस पौराणिक मंडळी उतरली ज्यात तीन एक महत्वाची बंधने पुढे केली जाऊ लागली असे दिसते. १) पुत्र नसेल तर मोक्ष मिळत नाही - त्यानंतर ऋषी मंडळींची पुत्र प्राप्ती च्या वेगवेगळ्या कथा समोर येताना दिसतात २) शिक्षण कालावधी नंतर गृहस्थाश्रमाचा आग्रह आणि गृहस्थाश्रमा नंतरच संन्यास असा क्रम प्रचलित करण्याचा प्रयत्न झाला ३) आणखी एक महत्वाचा नॅरेटीव्ह पालकांचे ऋण , त्यांच्या आज्ञा आणि त्यांची सेवा यांना अनन्य महत्व दिले गेले. असा स्पर्धात्मक नॅरेटीव्ह समाजात लोकप्रीय होणे त्या काळात नवल राहीले नसावे. ४) पतीव्रता असलेल्या स्त्रीयांची उदाहरणे देणारी कथासुत्रे सुद्धा पौराणिकांनी प्रचलीत केलेली दिसतात.

तरी एक प्रश्न उरतो भेटल्या गृहस्थास गृहस्थ जिवनाचा त्याग करण्यास भिख्खु मंडळी एवढी आग्रही का होत होती, आता माझ्या या संशयवादाला काही आधार प्राप्त नाही पण दारोदार फिरुन प्राप्त होणार्‍या मर्यादीत भिक्षे पेक्षा राजा अथवा व्यापार्‍याने स्वतःच संन्यास घेऊन आश्रमात दाखल झाल्यास शाश्वत किंवा मोठ्या आर्थिक आश्रयाची अधिक ग्वाही मिळत असण्याची एक शक्यता मला वाटते.

अशाच व्याभिचार कथांच्चे परिणामाचे एक उदाहरण म्हणजे एका काल्पनिक कथेत चंद्र गुरुपत्नी पासून पुत्रप्राप्ती करुन घेतो. आता या कथे नंतर मनुस्मृतीतून गुरुपत्नी गमना बद्दल भयंकर प्रायश्चित्त सांगितले जाताना दिसते. अहल्ये बाबत काय एक कथा येते सीतेच्या अग्नीपरिक्षेचा अपवाद येतो विधवांवरील बंधने येतात पण जातक कथा अथवा पौराणिक कथातून अब्राहमीक कथांप्रमाणे विवाह बाह्य संबंधांसाठी स्त्रीयांना दगड फेकुन मारण्याच्या शिक्षा येत नाहीत कारण स्त्री-संशय कथानकांचा उद्देश्य गृहस्थास संन्यसत्वात कन्व्हर्ट करण्याचा अधिक होता त्यामुळे स्त्रीवरील मालकी उद्देश्याने दगड फेकुन मारण्याची मागणी इथे दिसत नाही. पण युरोप असो, मध्यपूर्व असो , इराण असो भारत असो वा चीन इस्वी सनाच्या पहिल्या शतका नंतर स्त्रीयांना संपत्ती समजणे, लॉयल्टीची अधिक अपेक्षा करणे दृश्य आणि शरीर शुचितांची मागणी आणि बंधने क्रमाने वाढत गेलेली दिसतात. या सर्व प्रदेशातील स्त्री विषयक बंधनांच्या तपशिलामध्ये अल्प स्थानिक फरक असले तरी उद्देश्य समानता बर्‍यापैकी दिसून येते. आणि या सर्व प्रदेशात व्यापार निमित्ताने संवादही होता. तर एकुण संन्यासी मिळवण्यासाठी स्त्री-संशय साहित्य क्रमाने स्त्रीयांवरील बंधने वाढण्यास कारणीभूत ठरले असू शकेल काय?

जॉनविक्क's picture

4 Jun 2019 - 10:12 pm | जॉनविक्क

अल्पआयुष्य दर यामुळे स्त्री सहवास हाच प्रमुख वेळ घालवण्याचा राजमार्ग असल्याने बहुतांश साहित्यात स्त्री पासून दूर राहण्यास प्राधान्य दिले असावे. हे साहित्य आज लिहले असते तर मोबाईल पासून दूर राहण्यास जास्त प्राधान्य दिले गेले असते...

पबजी कसे घातक त्यापासून दूर राहणे कसे उचीत यावर साहित्य तयार झाले असते... ;)

माहितगार's picture

5 Jun 2019 - 2:09 pm | माहितगार

ठिक आहे की स्त्री सहवासाचा मोह टाळायचा असेल तर ज्याची त्याची मर्जी. पण हे साहित्य स्त्रीयांप्रती संशय उत्पन्न करणे याची काय गरज पण तसे ते करते,परिणती पुरुषी अपेक्षांचे परिघ लादणे आणि स्त्री स्वातंत्र्य संकुचित करणे असे वळण समाजाला घेताना दिसू लागते. या स्त्री संशयवादी साहित्याचा मानवी समाजातील स्त्रीस्थानावर झालेल्या परीणामांकडे समाजशास्त्राचे पुरेसे लक्ष गेले आहे का या बद्दल साशंकता वाटते.

जॉनविक्क's picture

5 Jun 2019 - 2:47 pm | जॉनविक्क

स्त्री सहवासाचा मोह टाळायचा असेल तर ज्याची त्याची मर्जी.

नाही, प्रॉब्लेम स्त्री नसून समाजाचे "addiction" हा आहे.

बराच काळ "स्त्री संग" हाच बहुतांश पुरुषांचा बहुतांश वेळ व्यतित होण्याचा प्रमुख विषय होता जो आता कालपरत्वे बदलला आहे म्हणून स्त्रिया सोडून इतर अनेक गोष्टीही "मन शांति" गमावण्याची कारणे आहेत इतपत समज दृढ होणे स्त्रियांबाबत अनावश्यक अध्यात्मिक / सामाजिक आकासाचा सहज निचरा करू शकतो.