बातमी :पंढरपुरात आता दोन विठ्ठल, बडवे समाजाने उभारले स्वतंत्र मंदिर
https://www.loksatta.com/maharashtra-news/another-vitthal-temple-built-i...
बातमी वाचून मनात विचार आला.....
जुडवा विठ्ठल !!
जुडवा विठ्ठल बडवा विठ्ठल ।
खरा बा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें त्यांचे मन जालें हांवभरी ।
परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी ।
देतां येईल मिठी सावकाशें ?॥३॥
तु का म्हणे देह भारिला विठ्ठलें ?
दामक्रोधें केलें मन रीतें ॥४॥
प्रतिक्रिया
11 May 2019 - 9:06 pm | माहितगार
कुठे असशी विठ्ठला तू तन्मय
विवेकाचा जागर का होते नसे
दगडाचा कोण बडवा की विठ्ठल
युगानू युगे असे शंख का जन्मती
जन्माने कसे होती बडवे ब्राह्मण
जमविती एकाधिकार परमेश्वरावर
पोप मौलवी पुरूष त्याच माळेत