विचार मंथन
मानवी कार्यशक्तीला मशीन्स हे पुरून उरतात म्हणजेच , मशीन्स हे माणसापेक्षा अधिक जलद आणि अचूक काम करतात . त्याचप्रमाणे बुद्धिभेदात हि मशीन्स मानवाला मात देत आहेत, तसे बघितले तर विकसित देशात जिथे लोकसंख्या कमी आहे व काम करायला माणसे नाहीत तिथे मशीन्स उपयोगी आहेत, नपेक्षा तिथेच त्यांची जास्त गरज आहे, पण विकसनशील देशा मध्ये जसे की भारत चीन ब्राझील इत्यादि देशांमध्ये तिचा वाढत असणारा उपयोग हा जरा धोकादायक आहे, एक वेळ अशी येणार आहे जेंव्हा या विकसनशील देशांना , विशेषतः भारताला याचा पुनर्विचार करावा लागणार आहे, कारण आपल्या कडे असलेल्या मुबलक मनुष्यबळाला सामावून घेणारे रोजगार भारताला निर्माण करायचे आहेत, अशातच मशीन्स कारवी आलेली रोजगरातली हिस्सेदारी त्यांना अजून संकटात नेईल. त्यामुळे मशीन्स चा वापर कसा करायचा आणि न्याय कसा करायचा हे विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी ठरवावे.
सुनील भट
प्रतिक्रिया
24 Apr 2019 - 9:26 pm | चौथा कोनाडा
१०० % सहमत ! अधुनिक तंत्रज्ञाना चं सरसकट स्विकारणं गेले काही दशक सुरु आहे ते अयोग्य आहे.
पण जुन्या तंत्रज्ञान पर त फिरणे अतिशय अवघड आहे. अभिजन लोकांकडून याला कडाडून विरोध होईल . त्यांच्या विरुद्ध जर बहुजन समर्थपणे उभे ठाकले तरच हे शक्य होईल. आणि एकंदरीत जागतिकीकरण आणि आपल्या देशाचे त्यावरील अवलंबित्व पहिले तर जवळ जवळ अशक्यच आहे.
जाणकार मिपाकरांच्या प्रतीक्षेत.
25 Apr 2019 - 12:01 am | sunil bhat
नमस्कार , मला माहिती आहे की हे थोडेसे अवघड आहे, पण किती दिवस पाश्चिमात्य प्रभावाखाली जगायचे, आज चीन आपले स्वतःचे तंत्रज्ञान वापरू आणि बनवू शकतो तर आपण का नाही?
25 Apr 2019 - 5:10 pm | चौथा कोनाडा
भटगुर्जी,
तुमचा मुद्दा गंडलाय का ?
तुम्हाला मशिन्स, तंत्रज्ञान, ऑटोमेशन यांच्या विरोधात मत व्यक्त करायचं ?
(मशिन्स आणि लोकसंख्या, रोजगारी या संदर्भाने)
आपणास भारताचे आपले स्वतःचे तंत्रज्ञान विकसित यात काय अपेक्षित आहे ?
गांधीजींची ग्रामीण जीवनाची तत्वे ?
पुढं तर एका प्रतिसादात असं ही म्हणालात की "कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर लोकसंख्येला अनुसरुन असावा"
याचा नक्की अर्थ कसा काढायचा ? एखादे उदाहरण तुम्हीच द्या ना ! भटगुर्जी,
तुमचा मुद्दा गंडलाय का ?
तुम्हाला मशिन्स, तंत्रज्ञान, ऑटोमेशन यांच्या विरोधात मत व्यक्त करायचं ?
(मशिन्स आणि लोकसंख्या, रोजगारी या संदर्भाने)
आपणास भारताचे आपले स्वतःचे तंत्रज्ञान विकसित यात काय अपेक्षित आहे ?
गांधीजींची ग्रामीण जीवनाची तत्वे ?
पुढं तर एका प्रतिसादात असं ही म्हणालात की "कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर लोकसंख्येला अनुसरुन असावा"
याचा नक्की अर्थ कसा काढायचा ? एखादे उदाहरण तुम्हीच द्या ना !
24 Apr 2019 - 9:34 pm | अभ्या..
ज्यादिवशी हे विचारवंतांचे आणि अभ्यासकाचे कामपण मशीन्स करायला सुरुवात करतील तोपर्यंत काटा उलटा फिरणार नाही.
त्यानंतर आपण काय करायचे ही ठरवायची वेळच आपल्यावर येणार नाही. सो....टिल द डे वेंजॉय...
24 Apr 2019 - 11:58 pm | sunil bhat
नमस्कार , मला असे अभिप्रेत आहे की भारताने स्वतःचे असे तंत्रज्ञान विकसित करावे, आणि जे आपल्याकडील हुशार लोकांना सहज शक्य आहे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर लोकसंख्येला अनुसरुन असावा
25 Apr 2019 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपल्या बुद्धीमत्तेचा वापर करायचा तर त्यासाठी कोता (पक्षी : तंत्रज्ञानात जगाच्या मागे राहण्याचा, पक्षी, अविकसित राहण्याचा) विचार कशाला करायचा? दुसर्या महायुद्धात बेचिराख झालेल्या जपान व जर्मनीने असा विचार केला असता तर आजही ते देश अविकसितच राहिले असते, नाही का?
१. भारतात बुद्धिमत्ता व कल्पकतेची अजिबात कमी नाही... कमी आहे ती पात्रतेवर बेतलेल्या समान संधीची (मेरिट-बेस्ड इक्वल ऑपॉर्चुनिटी). अनेक भारतियांनी पाश्चिमात्य देशांत जाऊन, तिथल्या अधिक व समान संधी असलेल्या वातावरणात वाढलेल्या स्थानिक लोकांबरोबरच्या प्रतिस्पर्धेतही यशस्वी होऊन; तेथे शास्त्रिय, तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रांतिल उच्च पदे मिळवून, हेच सिद्ध केले आहेच... नाही का?
२. याशिवाय, जे तंत्रज्ञान भारतात आणायला पाश्चिमात्य देशांनी बंदी घातली होती, ते आपण आपल्या बळावर विकसित करून त्यात जागतिक स्तरावर दबदबा निर्माण केला आहे. उदा : क्रायोजेनिक इंजिन्स (जी वापरून मिसाईल्स व अवकाशयाने बनवली जातात), सुपरकॉम्प्युटर्स (यात आपण जगात पहिले नसलो तरी, ते निर्यात करू लागलो आहे), (थोरियम बेस्ड आणि इतर) न्युक्लियर टेक्नॉलॉजी, इत्यादी.
३. भारतात मोठ्या प्रमाणत उपलब्ध असलेले, तरूण मानवी संसाधन उर्फ डेमोग्राफिक डिव्हिडंड, ही भारताची फार मोठी ताकद आहे. या गोष्टीची पाश्चिमात्य देशांत फार काळापासून चणचण आहे आणि म्हणूनच, पूर्वीपासूनच, त्या देशांमध्ये स्थलांतर करवून घेण्यासाठी अधिकृत सरकारी योजना राबविल्या जात आहेत. तीच चणचण आताशा चीनमध्येही जाणवू लागली आहे आणि म्हणूनच तेथे "एक जोडपे, एक मूल" हा कसोशीने पाळला जाणारा निर्बंध हळू हळू शिथिल करणे चालू आहे.
४. देशाचा विकास व्हावा आणि जगात त्याला मान असावा असे वाटत असलेल्या कोणत्याही देशाला तांत्रिकदृष्ट्या मागे राहणे परवडणारे नाही. किंबहुना, तसे राहिल्यास त्या देशाला अनेक प्रकारच्या (आर्थिक, राककिय, सामरिक, इ) दबावांना बळी पडून, एकप्रकारे, अवलंबित/गुलामी जिणे सहन करावे लागते... हे सत्य विसरून चालणार नाही.
तेव्हा... आपण आपली लोकसंख्या व बुद्धीमत्ता वापरून आणि त्यांचा उपयोग करणार्या अधिकाधिक संधी निर्माण करून, सर्वच बाबतीत, इतर जगापेक्षा जास्त चांगले शास्त्रिय ज्ञान व तंत्रज्ञान विकसित करावे आणि ते ज्ञान व त्यावर बेतलेली संसाधने अभिमानाने दुसर्या देशांना विकून/लायसेन्स करून, भारतात संपत्ती खेचून घ्यावी... आणि जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करावा... हे जास्त योग्य उद्दीष्ट होईल.
25 Apr 2019 - 10:41 pm | sunil bhat
नमस्कार
हे विचार मंथन अश्या नावाखाली लिहिलेले आहे तेव्हा तुम्ही त्याच नावाने किंवा सुनिल या नावाला संबोधून प्रतिक्रिया द्यावी
हे मी भारताची लोकसंख्या आणि त्याप्रमाणात असलेले रोजगार अश्या स्वरूपात मांडणी केली आहे
तुम्ही हे मान्य कराल कि भारताची प्रगती हि विषम प्रमाणात झाली आहे , तसेच लोकसंख्या विषम पणे गरीब श्रीमंत आणि मध्यमवर्ग अशी आहे
त्यामुळे मशीन्स मुळे येणाऱ्या बेरोजगारीचा फटका का माध्यम वर्ग आणि गरिबांना पडणार आहे,
जगतिकी करण हे कोणीही रोखू शकत नाही पण सोप्या सहज सर्व समावेशक तंत्रज्ञानाचा वापर तळागाळात पोचवून सगळ्यांना एका पातळीत आणावे असे माझे मत आहे
उदाहरण द्येयचे झाले तर बाईकच्या रिक्षा, लोकल मेक बाईक्स, लोकल शेती ला वापरण्यात येणारी उपकरणे, सोप्या सोप्या सहज उपलब्ध तंत्रज्ञानातून मोठे बदल होऊ शकतात
चीनमध्ये एकी कडे टेक्नॉलॉजि आहे तसेच ग्रामीण पारंपरिक उद्योगधंदे सुद्धा आहेत , म्हणजे त्यांचा अचूक वापर होत आहे तसेच रेशम आणि इतर उद्योग हि सुरु आहेत
हे सर्व मी माझ्या पुस्तकात Iron Embrace मध्ये मांडल्या आहेत
आपण सर्व आपले विचार मांडू , ट्रॉलिंग राजकीय मुद्यांवर करूया
14 May 2019 - 5:35 pm | चौथा कोनाडा
तुमचे सर्व धागे "विचार मंथन" याच नावानं का आहेत ?
त्या साठी इथं मिपावर "चर्चा, काथ्याकूट इ" असली वर्गीकरणं आहेतच की.
अश्या टिपिकल मर्यादित नावाला अतिशय कमी प्रतिसाद मिळतात हे लक्ष्यात घ्या.
अन "विचार मंथन" या मथळ्यात आणखी तपशील टाकलेत तर उत्तम होईल.
इथं मिपाकर साहेब, गुरुजी, सर, भौ, गुर्जी, दादा, मास्तर इ नावं प्रेमानं संबोधून मान देतात.
खुप वेळा आद्याक्षरे देखील वापरात. उदा : मी, चौको. तुम्ही: सुभ
यात फार काही गैर नाही.
असो. आपला आग्रहानुसार सुनिल म्हणून संबोधण्यात येईल.
धन्यवाद !