अर्थ काय ह्याचा?

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
5 Nov 2008 - 10:45 am

कळीने कधी विचारला
अर्थ उमलण्याचा?
फ़ुलाने कधी दाखवला
स्वार्थ जपणुकीचा?

उषा पुन्हा निघून गेली
पुसून लाली रंगांची
नाही क्षणही थबकली
वाट पहात टाळ्यांची

निर्झरांना कधी मिळाला
आस्वाद मधु जलाचा?
पाखरांना कधी समजला
आवेग तृप्त करण्याचा?

आईने कधी का केला
कंटाळा भरवण्याचा?
अर्थ कधी ना पुसला
बाळाच्या लाथांचा.

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

राघव's picture

5 Nov 2008 - 2:05 pm | राघव

चांगली कल्पना :)
शुभेच्छा!
मुमुक्षु

अरुण मनोहर's picture

5 Nov 2008 - 5:59 pm | अरुण मनोहर

धन्यवाद. कोणाला आवडल्याचे कळले की लिहीण्याची स्फुर्ती येते.

सहज's picture

5 Nov 2008 - 5:06 pm | सहज

बघा वाचुन काव्य गेला
हा वाचक ५० नंबराचा
प्रतिसाद मात्र न देई
अहो अर्थ काय ह्याचा

कविने कधी का केला
कंटाळा लिहण्याचा
जरी न दिला कोणी
प्रतिसाद प्रोत्साहनाचा

कवी प्रतिसादाचा भुकेला
वाचक व्याकुळ आस्वादाचा
सांगेल का कुणी हो
अर्थ काय ह्याचा

;-)

अरुण मनोहर's picture

5 Nov 2008 - 5:58 pm | अरुण मनोहर

लाख मोलाचे किती सहज बोललात! आपले दु:ख एका तरी रसिकाला कळले हे कळून दु:खावर थोडा आराम वाटला.
धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Nov 2008 - 6:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सरळ आणि साधी आहे (असं मला तरी वाटलं) म्हणून आवडली.

अवांतरः सहजराव आता रंगरावांच्या लायनीला लागलेले दिसताहेत.