विचार मंथन

Primary tabs

sunil bhat's picture
sunil bhat in जनातलं, मनातलं
23 Apr 2019 - 10:02 am

विचार मंथन
साधारण मार्च महिन्यातील गोष्ट आहे, माझ्या मुलीला ( अदितीला) प्रोजेक्ट करायचा होता, विषय होता स्वतःच्या हाताने एक रोपटे लावणे,
नेहमीच्या सवयीने मुलीने खूपच लवकर याबद्दल आम्हाला सांगितले, म्हणजे प्रोजेक्ट द्यायचा सोमवारी आणि सांगितले रविवारी दुपारी,
मग काय तसेच दोघेही कॉलनी च्या बाहेर आलो, मला आठवत होते की एक माणूस हातगाडी वर विविध प्रकारची छोटी मोठी फुलझाडे ठेवतो, जरा पुढे गेल्यावर तो मनुष्य हातगाडी सहित दिसला, त्याच्या कडे जाऊन त्याला आमची निकड सांगितली, तसे तो बोलला काही काळजी नाही , या एरियात मीच सगळ्यांना प्रोजेक्ट साठी लागणारी झाडे देतो, मग काय आम्ही खुश, घासागीस करून ५० रुपयाला एक मस्त फुलाचे छोटे रोपटे घेतले कुंडी सकट,, आदिती खूप खुश झाली,
दुसऱ्या दिवशी प्रोजेक्ट वगैरे दाखवून झाला आणि त्याला पाणी घालण्याची जबाबदारी माझ्या उरावर आली, दररोज इमाने इतबारे मी पाणी घालायचो,
काही दिवसांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि आम्ही सुट्टीसाठी बाहेर जायचे ठरवले, सर्व बुकिंग झाले , आणि शेवटी एका सकाळी विमानाने आम्ही निघालो, विमानात बसताच क्षणी त्या कुंडीची आणि रोपट्या ची आठवण झाली आणि मन आतून खाऊ लागले, जसे जसे दिवस गेले तसे तसे मन उदास होऊ लागले पण करणार काय घरी तर १० दिवसांनी पोचणार होतो
आहेवतो एकदाचा घरी जाण्याचा दिवस आला आणि मध्यरात्री आम्ही घरी पोचलो, सर्व प्रथम कुंडी कडे धावत गेलो ,बिचारे ते रोपटे सुखून कोमेजून गेले होते, मन घट्ट करून त्यात थोडे पाणी घातले आणि नाराज होऊन झोपायला गेलो
दुसऱ्या दिवशी ऑफिस होते , त्यामुळे घाईघाईने परत कुंडीत थोडे पाणी टाकले आणि ऑफिस ला पळालो,
रात्री आलो उशिरा , प्रवासाचा शीण अजून गेला नव्हता, थोडेसे काहीतरी खाल्ले आणि झोपलो
सकाळी उठून पहिला रोपट्या कडे गेलो आणि पाहतो तर काय कि रोपट्या ने परत जीव धरला होता, पाने परत पहिल्या सारखी टवटवीत झाली होती, काही फुले सुद्धा लागली होती, एक दोन फांद्या जरा नाजूक अवस्थेत होत्या पण माझ्या मनाने उभारी धरली, आणि एक प्रकारचा आत्मविश्वास मनामध्ये जगृत झाला,
ती एक घटना बरेच काही शिकवून गेली
ते हे कि कधीच हार मानू नये आणि आपल्यावर ती एक शक्ती बसली आहे जी आपल्यावर लक्ष ठेवून आहे, कितीही वाईट प्रसंग आले , अपयश आले तरी त्या रोपट्या प्रमाणे आत्मा जिवंत ठेवायचा आणि संधी मिळताच परत फिनिक्स पक्षा प्रमाणे जोमाने उठावे
खरंच काही प्रसंग असे असतात की जे आपले जीवन आमूलाग्र बदलून टाकतात।

तुमचे काही असे अनुभव असतील तर जरूर शेयर करा,

सुनील भट

मांडणीविचार