मला आनंद का झाला?

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
16 Dec 2007 - 11:25 am

लोकहो,

"सुख पाहता जवांपाडे, दु:ख पर्वताएवढे" ही सर्वसाधारण माणसाची परिस्थिती आहे. आपण आनंदच हरवत चाललो आहोत.

अनेक लहानसहान आनंदाच्या गोष्टी सभोवताली घडत असतात. पण तो आनंद आपल्याला समजत नाही. तेवढया जाणीवा आपल्याकडे नसतात.

त्यासाठी तुम्हाला झालेला आनंद केवळ एका वाक्यात इथे लिहीत जा. इथे सह्या, आपला(.....) ही विशेषणे, मोठे परिच्छेद वगैरे लिहू नयेत.

केवळ एका वाक्यात मला आनंद का झाला हे लिहावे. वाक्याचा बाज शक्यतो खालीलप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करावा तर मजा येईल.
---------------------------------------------------------------------

सरपंचांनी मिसळपाववर आणिबाणी जाहिर केली, हे वाचून मला आनंद झाला.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 11:28 am | धोंडोपंत

काल बायको माहेरी गेली म्हणून मला आनंद झाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Dec 2007 - 11:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणिबाणी जाहीर झाली म्हणुन फारच आनंद झाला. च्यायला दररोज नव-नवीन कटकटीला वैतागून गेलो होतो.
आज फार आनंद झाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 11:50 am | धोंडोपंत

आमचे स्नेही प्राध्यापक बिरुटे यांना आनंद झाला, हे पाहून आम्हाला आनंद झाला

विसोबा खेचर's picture

16 Dec 2007 - 11:52 am | विसोबा खेचर

येथे आणिबाणी जाहीर झाली हे वाचून समाजकंटकांना आता दु:ख होईल, याचा मला आनंद झाला! :))

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 11:54 am | धोंडोपंत

काल मिसळपाववरून एका समाजकंटकाची हकालपट्टी झाली याचा मला आनंद झाला

सृष्टीलावण्या's picture

26 Mar 2008 - 9:03 am | सृष्टीलावण्या

प्रशासक आणि बगलेतले बच्चे यांच्याशी वाद होऊन सुद्धा मी (तात्याकृपेने) अजून इथे टिकून
आहे म्हणून (अरेच्या कोणीतरी मला आत्ताच फुटबॉलप्रमाणे उडवले अशी भावना का बरे होतेय?).

>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

अघळ पघळ's picture

27 Mar 2008 - 2:55 am | अघळ पघळ

सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत!
पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका.

(फोकलीचा) अघळ पघळ

सृष्टीलावण्या's picture

27 Mar 2008 - 8:49 am | सृष्टीलावण्या

अवांतर प्रतिसादाबद्दल धोंडोपंत राग मानणार नाहीत ह्याबद्दल खात्री आहे (इतरांना राग आला असेल तरी चालेल, फार तर फार काय पेटीवर वाजवून गातील).

सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत!
पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका.

(फोकलीचा) अघळ पघळ

असो. आपल्या आपुलकीच्या शब्दांनी मन भरून आले, गळा दाटला, शब्द गहिवरले. असे हितचिंतक असतील तर त्यांच्यावर एक का दहा मराठी संस्थळे कुर्बान.

आपली लेखन शैली अतिशय आवडली. पण राहून राहून वाटते की तिचे मिपावरील दुसर्‍या एका लेखकू महाशयाशी साधर्म्य आहे (विशेषत: फारंभ शब्द). हा एक आत्मा आणि दोन शरीरे असा अचाट प्रयोग तर नव्हे.

>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 12:01 pm | धोंडोपंत

श्री. विक्रम पंडित यांची सिटी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्चपदी नेमणूक झाली, याचा मला आनंद झाला.

आजानुकर्ण's picture

16 Dec 2007 - 12:19 pm | आजानुकर्ण

प्रकाटाआ

(सखेद) आजानुकर्ण

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 12:05 pm | धोंडोपंत

लोक वर उल्लेख केलेल्या गोष्टी न पाळता कुठेही काहीही लिहितात हे पाहून मला आनंद झाला.

गुंडोपंत's picture

16 Dec 2007 - 12:17 pm | गुंडोपंत

आणीबाणीचे स्वरूप दिसुन आल्याने आनंद झाला.
आपला
गुंडोपंत

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 12:18 pm | धोंडोपंत

गुंडोपंतांना आनंद झाला हे पाहून मला आनंद झाला

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 12:25 pm | धोंडोपंत

चुकीच्या लेखनाचा लोकांना खेद झाल्यावर, ते प्रतिसाद काढून टाकतात याचा मला आनंद झाला.

विसोबा खेचर's picture

16 Dec 2007 - 12:33 pm | विसोबा खेचर

येथे आणिबाणी लागू झालेली पाहून बर्‍याचश्या मंडळींना हायसं वाटलं याचा मला आनंद झाला..:)

तात्या.

प्रमोद देव's picture

16 Dec 2007 - 12:37 pm | प्रमोद देव

धोंडोपंतांसारख्या विद्वान माणसांनी इतक्या क्षुल्लक गोष्टीत आपला वेळ फुकट घालवलेला पाहून मला मुळीच आनंद झालेला नाहीये.

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 12:39 pm | धोंडोपंत

विद्वत्ता बाजूला ठेऊन काही लोकांना काही क्षण आनंद देऊ शकलो याचा मला आनंद झाला

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 12:37 pm | धोंडोपंत

तात्याला हायसं वाटलं हे पाहून मला आनंद झाला.

गुंडोपंत's picture

16 Dec 2007 - 12:57 pm | गुंडोपंत

पंत कार्यकारी संपादक झाल्याचे पाहून आनंद झाला

आपला
गुंडोपंत

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 1:00 pm | धोंडोपंत

लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात हे पाहून मला आनंद झाला.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Dec 2007 - 1:03 pm | प्रकाश घाटपांडे

धोडोपंतांमुळे भा रा तांबे यांच्या कवितेचा आस्वाद घेता आला याचा मला आनंद झाला.
प्रकाश घाटपांडे

देवदत्त's picture

16 Dec 2007 - 2:16 pm | देवदत्त

आणीबाणीचा खरा अर्थ कळल्याने आणि नेमका उपयोग पाहून आनंद झाला.

तसेच चर्चगेट-ठाणे एसी बस सुरू झाल्याने आनंद झाला :)

गुंडोपंत's picture

16 Dec 2007 - 1:07 pm | गुंडोपंत

मिसळपाव नरेशांच्या हाताशी मी नसलो तरी अजून कुणीतरी आहे, याने मला आनंद झाला.
आपला
गुंडोपंत

गुंडोपंत's picture

16 Dec 2007 - 1:10 pm | गुंडोपंत

तात्यांसाठी 'मिसळपाव नरेश' असा शब्द सुचल्याने मला आनंद झाला.

गुंडोपंत's picture

16 Dec 2007 - 1:12 pm | गुंडोपंत

आज ग्लासात सोडा ओततांना ग्लास सांडला व रम नुसतीच बाटलीनेच प्यावी लागली याचा आनंद झाला .

गुंडोपंत's picture

16 Dec 2007 - 1:13 pm | गुंडोपंत

सरपंचही येथे आलेले पाहून आनंद झाला.

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 2:01 pm | धोंडोपंत

आमचे स्नेही प्रकाश घाटपांडे हे भास्कररावांच्या कवितांचे चाहते आहेत हे पाहून मला आनंद झाला.

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 2:17 pm | धोंडोपंत

गुजरातच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना यश मिळेल असे भाकित वाचल्याने मला आनंद झाला.

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 2:04 pm | धोंडोपंत

मिसळपावच्या हजर सदस्यांच्या यादीत आमचे मित्र केशवसुमारांचे नाव दिसताच मला आनंद झाला.

केशवसुमार's picture

16 Dec 2007 - 2:34 pm | केशवसुमार

धोंडोपंतांनी आरती प्रभू आणि भा.रा. तांबे यांच्या कवितांवर येथे लिहायचे संकल्प सोडल्याचे वाचून आनंद झाला..
(आतूर)(आनंदी) केशवसुमार

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 2:37 pm | धोंडोपंत

भा.रा.तांबे यांच्या निवडक कवितांमध्ये आज माझी अत्यंत आवडती ' कळा ज्या लागल्या जीवा...' ही कविता मिसळपाववर टंकित केल्यामुळे मला आनंद झाला.

केशवसुमार's picture

16 Dec 2007 - 2:44 pm | केशवसुमार

ही माझी अत्यंत आवडती अत्यंत आवडती सकाळी मि.पा. वर वाचायला मिळ्याल्यामुळे प्रचंड आनंद झाला..
धोंडोपंत धन्यवाद..

केशवसुमार's picture

16 Dec 2007 - 2:50 pm | केशवसुमार

खिडकीतून बाहेर पाहिले.. आज बाहेर पाऊस किंवा बर्फ नाही हे बघून आनंद झाला..
(आज सुर्याच दर्शन झाले तर !!) केशवसुमार

दिनेश५७'s picture

16 Dec 2007 - 4:14 pm | दिनेश५७

एकूणच सगळीकडे आनंद नुसता ओसंडून वाहतो आहे हे बघून आनंद `वाटला'!

गारंबीचा बापू's picture

16 Dec 2007 - 6:11 pm | गारंबीचा बापू

मिसळपाव वर आणिबाणी जाहीर झाल्यापासून दोन खत्रुड अभिप्राय सोडले तर बाकी चांगलं लेखन झालं हे पाहून मला आनंद झाला

राजे's picture

16 Dec 2007 - 7:58 pm | राजे (not verified)

तुम्हा सर्वांना झालेला आनंद पाहून मला ही आनंद झाला....

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

मनोज's picture

16 Dec 2007 - 9:01 pm | मनोज

मला मुलगा झाला. त्यचे नाव "आनंद" ठेवले आणि मला आनंद झाला.
आपलाच,
मन्या

ऋषिकेश's picture

16 Dec 2007 - 9:49 pm | ऋषिकेश

मी गाडितून येताना हातातील पुस्तक एका सुंदर मुलीचंही आवडतं आहे हे तीने मला सांगितल्यावर आनंद झाला :)
ऋशिकेश

विसोबा खेचर's picture

16 Dec 2007 - 11:25 pm | विसोबा खेचर

काही वेळाने तू ही त्या सुंदर मुलीला आवडायला लागलास याचा मला आनंद झाला! :)

ध्रुव's picture

17 Dec 2007 - 10:38 am | ध्रुव

इतक्या लोकांना आनंद झाला हे पाहुन मला आनंद झाला!!! :)

--
ध्रुव

सुशील's picture

17 Dec 2007 - 10:41 am | सुशील

कसलीही समजूत न काढता बेसनलाडू पुन्हा आलेला पाहून मला आनंद झाला.

गारंबीचा बापू's picture

17 Dec 2007 - 11:41 am | गारंबीचा बापू

लोकांचा कळवळा पाहून मला आनंद झाला.

चित्तरंजन भट's picture

17 Dec 2007 - 11:40 am | चित्तरंजन भट

एवढे "आनंदी-आनंद गडे, इकडे, तिकडे, चोहिकडे" झालेले बघून मलाही आनंद झाला.

स्वार्थाच्या बाजारांत
किती पामरें रडतात;
त्यांना मोद कसा मिळतो?
सोडुनि स्वार्था तो जातो-
द्वेष संपला,
मत्सर गेला,
आतां उरला
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!

धोंडोपंत's picture

17 Dec 2007 - 11:35 am | धोंडोपंत

शेअरबाजार खाली आला याचा मला आनंद झाला

गारंबीचा बापू's picture

17 Dec 2007 - 11:45 am | गारंबीचा बापू

स्वत: काही विधायक न लिहीता आणि इतरांच्या चांगल्या लेखनाला अभिप्रायही न देता काही लोक दिवसभर मिसळपाववर पडलेले असतात हे पाहून मला आनंद झाला.

चित्तरंजन भट's picture

17 Dec 2007 - 11:56 am | चित्तरंजन भट

डॉ. माधवी गाडगीळ, विसोबा खेचर, यशोदेचा घनश्याम तसेच धोंडोपंत, गारंबीचा बापू हे ऑनलाइन झाले की मला नेहमीच आनंद होतो.

विसोबा खेचर's picture

17 Dec 2007 - 11:58 am | विसोबा खेचर

दारू पिताना मला आनंद होतो.. :)

चित्तरंजन भट's picture

17 Dec 2007 - 12:16 pm | चित्तरंजन भट

सोबत कोलीवाडा पापलेट आणि कोलीवाडा सुरमई खाताना मला आनंद झाला.

ह्याशिवाय,

धोंडोपंतांसोबत कोंबडी वडे खाताना मला आनंद झाला.

आणि
धोंडोपंतांसोबत चाट खातानाही मला आनंद झाला.

चिपलूनचा बाल्या's picture

17 Dec 2007 - 2:00 pm | चिपलूनचा बाल्या

धोंडोपंत कोंबडि खातात हे कलुन मला बि आनंद जाला.

छोटा डॉन's picture

17 Dec 2007 - 8:00 pm | छोटा डॉन

आज २ दिवसांनंतर पुन्हा एकदा "मिसळपाव" बघायला मिळाल्याने मला हर्ष ..... चुकलं चुकलं ... आनंद झाला.

आनंदमार्गी [ छोटा डॉन ]

सुशील's picture

20 Dec 2007 - 12:12 pm | सुशील

आमचा शिवराळ तात्या परत आलेला पाहून आम्हाला आनंद झाला

संजीव नाईक's picture

26 Mar 2008 - 10:15 am | संजीव नाईक

पंतऽ जरा ह्याची कुडंली मांडा व बघा ह्या च्या पाठी मागे ...........दशा केव्हालागणार आहे.
जेव्हा लागेल तेव्हा माला व इतर पिडीताना आनंद होईल.

१३वा ग्रह संजिव

अनिकेत's picture

27 Mar 2008 - 1:08 am | अनिकेत

कर्जातून मुक्त व्हायचा मार्ग सापडल्याने मला आनंद झाला.
:) ह. घ्या.

आर्य's picture

26 Mar 2008 - 1:23 pm | आर्य

काल इकडे (बेंगलोरला)झकास पाऊस झाला...... भजी खायला मिळाली आणि आज डब्यात भरल्या बांग्याची भाजी..........या पेक्षा जास्त काय कारण हवे खूश व्हायला...............

विवेकवि's picture

27 Mar 2008 - 9:46 am | विवेकवि

आज सकाळी मिपा ऊघडल्या वर चागले साहीत्य वाचुन आन॑द झाला..

आपलाच

(मि पा का र ) विवेक वि.

ठणठणपाळ's picture

28 Mar 2008 - 9:56 pm | ठणठणपाळ

एवढी बकवास उत्तरं वाचून माझ्या आनंदावर पार विरजण पडलं.

यन्ना _रास्कला's picture

18 Jun 2009 - 6:55 am | यन्ना _रास्कला

सक्काली सक्काली मिपावर कोलंबी भाताचा फोटु पाहुन आन्नन्द झाला.
पाथस्थाचा इजय आसो.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!