मी अनुभवलेलं गणपती मंदिर

मधुरा कुलकर्णी's picture
मधुरा कुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 Apr 2019 - 8:12 pm

माझा हा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे ...
आशा आहे तुम्हाला आवडेल... चुका असल्यास नक्की सांगा ...

मी अनुभवलेले गणपती मंदिर

          विश्वास होता तिला... गणपतीबाप्पा मला कधीच रिकाम्या मनानं अन् हातानं पाठवणार नाही परत त्याच्या घरातून...  कोणीतरी बरेच दिवसांपासून संपर्कात नसणार, कधी काळी किंवा सध्या सुद्धा जिवाभावाचा माणूस नक्की भेटणार या देवलायात...

          जिथं सर्वत्र कोलाहल असून पण शांतता आहे, असंख्य आवाज असूनही स्वतःच्या मनाचा आवाज बुलंद आहे, ज्या समाधानासाठी लोकं झगडतायत, ते आत्मिक समाधान, सुखाचा अन् समाधिस्त अवस्थेचा परमोच्च आनंदाचा बिंदू जिथं हात जोडून स्वागताला आहे, चराचरात गणेश स्तुति चालू आहे असं हे देवालय... जिथं जसं काही सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात, आणि उत्तरे नाही मिळाली; समस्येचं निराकरण जरी नाही झालं तरी त्याला सामोरं जाऊन जिंकण्याची उमेद निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या पवित्र वातावरणात समावलय...

          तिची भिरभिरणारी नजर शोध घेतिय, एखाद्या प्रियजनाचा, मनात असणारा विश्वास व्यर्थ जाणार नाही याची खात्री असणारी तिची ती नजर शेवटी पडतेच एखद्या अप्तावर... ख्याली-खुशाली होते; निरोपही होतो अन् पुन्हा मनात समाधान व्यापून राहत... विश्वासाची पोच पावती मिळाल्याचं...

          बंद डब्यात ज्याप्रमाणे मधमाश्या घोंघावतायत, दिशाहीन पणे, भिरभिरणारं उद्देशहिन घोंघवण त्यांचं....
जसं मनातले विचार, चांगलं - वाईट, योग्य - अयोग्य, निश्चितता-अनिश्चितता; त्यांच्यात असणार द्वंद...जे या मधमाशा प्रमाणे घोंगावत आहेत मनात... उद्देश हीन, दिशाहीनपणे... अन ज्यात अनिश्चितता भरून राहिली आहे...

          अगदी सहज सर्वांची उत्तरं मिळतात. अनिश्चितता ठाम निश्चयात परिवर्तित होते, नैतिकतेला अनुसरून असणारी उत्तर ठामपणे मिळतात; जरी उत्तर मिळाली नाही तरी मन शांत करणार समाधान, एक उत्कट शांतता मिळते.
हे तर माझं मंदिर आहे आहे जिथं कोलाहल असूनही शांतता आहे, गर्दी असूनही स्थैर्य आहे, शीतलता आहे...
सकारात्मकतेचा लहरी आसपास दौडत आहेत, प्रत्येक मनावर प्रभाव टाकत आपल्या सकारात्मकतेचा...

....सहज मनात आलं म्हणून

Madhura Kulkarni

कथाविचार

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2019 - 5:59 pm | चौथा कोनाडा

सुंदर प्रकटन ! उत्तम लेखन !


जिथं सर्वत्र कोलाहल असून पण शांतता आहे, असंख्य आवाज ....
..... सामोरं जाऊन जिंकण्याची उमेद निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या पवित्र वातावरणात समावलय...


हा परिच्छेद आवडला.

मिपावर हार्दिक स्वागत !

मिपावर लिहित्या रहा,
मिपाचा आनंद लुटत रहा !

मधुरा कुलकर्णी's picture

12 Apr 2019 - 7:13 pm | मधुरा कुलकर्णी

प्रतिक्रियेबद्दल आभार...
मला बरं वाटलं जाणून की मिपाकरांना माझं लिखाण आवडत आहे ...
खर तर पोस्ट केल्यानंतर बरेच दिवसांनी मी लॉग इन केलं म्हणून आता रिप्लाय देतीय

शेखरमोघे's picture

11 Apr 2019 - 7:48 pm | शेखरमोघे

छान लिहिताय.
ज्या कुठल्या मन्दिरात, "...... अगदी सहज सर्वांची उत्तरं मिळतात. अनिश्चितता ठाम निश्चयात परिवर्तित होते, .......जरी उत्तर मिळाली नाही तरी मन शांत करणार समाधान, एक उत्कट शांतता मिळते", तिथेच आपल्याला देव भेटू शकेल, कुणी त्याला गणपती म्हणेल तर कुणी आणखी काही.

मधुरा कुलकर्णी's picture

12 Apr 2019 - 7:18 pm | मधुरा कुलकर्णी

हा बरोबर आहे .. पण मला देवाबद्दल सांगायचं नसून त्या मंदिराबद्दल सांगायचं...
प्रतेकांसाठी कोणती ना कोणती तरी आपली अशी जागा असते जिथं तो/ती मनापासून रमून जातात...
प्रतिक्रियेबद्दल आभार

सुबोध खरे's picture

11 Apr 2019 - 8:03 pm | सुबोध खरे

मी पुण्याला असताना संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी (म्हणजे पंचमीला) थेऊर येथील गणपती मंदिरात जात असे. अक्षरश: कुत्रं सुद्धा नसे मंदिराच्या आवारात.

कितीही वेळ पवित्र वातावरणात बसून शांतता अनुभवत असे.

असेच सुरुवातीला सारसबागेत उद्यान गणेश मंदिरात करत असे (१९८३-८४)

परंतु जसे पुणे वाढले तशी गर्दी आणि बकाली वाढली (२००४-२००६). तेंव्हा तेथे अशी शांतता मिळणे दुरापास्त झाले आहे.

मधुरा कुलकर्णी's picture

12 Apr 2019 - 7:25 pm | मधुरा कुलकर्णी

शांतता मिळणं न मिळणं माझ्या दृष्टीनं व्यक्तीसापेक्ष गोष्ट आहे ...
तसं बघायला गेलं तर सांगलीच्या या गणपती मंदिरात पण तशी बरीच गर्दी असते ... पण मंदिराचा आवार तसा बराच मोठा आहे अन् कायम "ओम् गंग गणपत्ये नमो नमः" हा मंत्र सतत चालू असतो अन् पूर्ण दगडी बांधकाम असल्यामुळं एकप्रकारचा थंडावा आहे त्या मंदिरात ...
कदाचित म्हणूनच मला ते मंदिर आवडतं असेल ..
कारण काहीही असो तरी ते मंदिर खर तर अभ्यास करायला खूप मस्त आहे म्हणून पण मला आवडतं..

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद