सुहास एकबोटे यांच्याकडील एक कल्लाड दिवस

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
6 Apr 2019 - 6:23 pm

फेसबुक पानं चाळता चाळता एका पानावर हे पोस्टर पाहिलं आणि थांबलो.

ekb1

कार्यक्रमाचं स्थळ पाहिलं, वार, वेळ पाहिली आणि जायचं नक्की करून टाकलं. स्थळ माझ्या घरापासून जवळच, पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर, अन्वर हुसैन सारखा चित्रकार, आणि रविवार सुट्टीचा दिवस म्हंजे मला मेजवानीच होती. नुकतीच माझ्या पाहण्यात अन्वर हुसैनची पेन्सिल स्केचेस पाहण्यात आली होती, मी त्यावर बेहद्द फ़िदा झालो होतो, लगेच फेबुवर फॉलोअर म्हणून टिकमार्क केली आणि एक-एक सुंदर चित्रं, विविध पुस्तकांची अनोखी देखणी मुखपृष्ठं माझ्या पाहण्यात येवू लागली, तेंव्हा आपोआपच अन्वर हुसैन आणि त्यांच काम पहायची संधी माझ्याकडून कशी चुकविली जाणार ?

अन्वर हुसैन यांच एक अप्रतिम पेन्सिल स्केच:
ANH21

त्यांचीच एक क्लासिक रंगकारी:

ANH22

साडे अकराला जरा गडबडीत कार्यक्रम स्थळी पोहोचलो, स्थळ होतं सुहास एकबोटे यांच्या नुकतीच नुतनीकरण केलेलं चिंचवड येथिल सुहास एकबोटे डिझाइनर फर्निचर शो-रूम. प्रवेशद्वारापाशी रेंगाळावं लागलंच. वाड्याचा लूक असलेलं रंगीबेरंगी प्रवेशद्वार स्वागत करायला तयारच होतं.

ekb2

फुलं आणि रांगोळी यांची सजावट केलेलं ग्रेनाईटचं प्रसन्न तुळशी वृंदावन:

ekb3

मुख्य शो-रूम पर्यंत जायला रेड कार्पेट, व्ही आयपी झाल्यासारखं वाटलं.

ekb4

मुख्य कार्यक्रम पहिल्या मजल्यावर होता. जिन्यानं वर जायला लागलो, तर असं जुन्या लाकडी खुर्च्या रंगवून असं लोभसवाणं इन्टॉलेशन टांगलं होतं, हे फोटोत कसं पकडायचं कळेना, मग हा असाच फोटो काढला.

ekb5

ekb6

पहिल्या मजल्यावर प्रवेश केला तर बरीच गर्दी दिसत होती. उत्साही रसिकांच्या बातचितीमुळं वातावरण भारून गेलं होतं.
थोडं पुढं गेलो तर एकदम व्हीआयपी मंडळींची भेटीगाठीची लगभग दिसली. माझ्या सारखे सामन्य रसिक त्यांच्या भोवती कोंडाळं करून त्यांची बातचित ऐकण्याच्या प्रयत्न करत होते. स्मृतीला थोडा ताण दिल्यावर पांढरे केस, नीळा हाफ़ शर्टवाले सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट असल्याचं लक्षात आलं. मोठा थोर आंतरराष्ट्रिय सेलिब्रेटी कलाकार ! यांची बरीच चित्रं, रंगकारी पाहिली होती. त्यांच्या बद्दल बरेच लेख वाचले होते. (त्यांच स्टुडियो हे पुस्तक गाजलं, नावाजलं आहेच पण ते वाचायचा योग अजून आला नाहीय.) या थोर कलाकाराला मनोमन वंदन केले !

ekb7

वरील फोटोत गुलाबी रंगाचा हाफ़ कुर्त्यात हात बांधून उभे राहिलेले (डावी कडून तिसरे) चष्मेधारी अन्वर हुसैन ! हे मला जरा नंतर समजलं. एकंदरीत मोठ्या कलाकारांच्या भेटी, हास्य विनोद यामुळं वातावरण भारावून गेलं होतं. या सर्वाच व्हिडियो शुटिंग सुद्धा जोमात चालल होतं.

सुभाष अवचट यांचं एक सुंदर पेंटिग:

ekb8

तिथला उच्चभ्रू वर्ग पाहून मला बुजल्यासारखं झालं, कलटी मारावी की काय असाही विचार मनात येवून गेला. पण संधी दडवायची नाही हा विचार प्रबळ ठरला आणि मी पण त्या गर्दीचा भाग झालो.
सुहास एकबोटे कोण अन कसे दिसतात याची उत्सुकता होतीच. एका दोघांना विचारल्यावर एकाने पोनीटेल वेणी असलेले सुहास एकबोटे दाखवले. सुहास एकबोटे, कलाकार आणि या डिझाइनर फर्निचर शो-रूमचे मालक. येणाऱ्या रसिकांचं, कलाकारांचं मोठ्या जातीनं स्वागत करत होते. चहा, कॉफ़ी घेण्याचा आग्रह करण्यात व्यग्र होते. ते थोडे मोकळे झाल्यावर त्यांना जाऊन भेटलो. आपुलकीनं माझ्याशी दोन शब्द बोलले, छान वाटलं. नंतर त्यांचे फेसबुक पाहिल्यावर त्यांचा फॅन झालो आणि फॉलोअर म्हणून टिक करून टाकली.

स्टुडियोच्या एका दालनात सुहास एकबोटे:

ekb9

सुहास एकबोटे यांच्या "मॉर्निग कँपातून वॉकताना" या फेसबुक अल्बम मधील एका जुन्या कलात्मक इमारतीचा फोटो.
त्यांच्या विविध फेसबुक अल्बममध्ये अश्या कित्येक क्लासिक फोटोंचा खजिना आहे.

ekb10

मी चकित होत तिथलं स्केचेस, पेंटीग्ज, कॅलीग्राफी, जुनी तांबा-पितळी भांडीकुंडी, ऍन्टीक फर्निचर पाह्ण्यात रमलो. समोरून मा. गिरिश प्रभूणे सर या सर्वांचे फोटो काढण्यात एकटेच रमलेले दिसले. त्यांना पाच दहा वेळा भेटलो होतो, ऋषीतुल्य माणूस, लेखक, चित्रकार, शिल्पकार. भटके विमुक्त समाजासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. सामाजिक कार्यासाठी रोज शकडो लोकांच्या भेटीगाठी घेणारे. असंख्य पुरस्काराचे मानकरी. त्यांच्या गुरुकुलम या प्रकल्पाला काही वेळा भेट दिलेली. त्यांचं पारधी हे खुप गाजलेलं पुस्तक माझ्या आवडीचं !

GPS123

गिरिश प्रभूणे सरांना भेटावं, बोलावं जरा रेंगाळलो, पण सर घाईत असल्यामुळं पटकिनी निघून गेले होते. .

ekb12

ekb13

काही वेळानं वातावरणातली कुजबुज वाढली. कॅलीग्राफर अच्युत पालव यांचे आगमन झाले. जोरदार टाळ्यांनी स्वागत केले गेले. खालील फोटो मध्ये सुभाष अवचट अन्वर हुसैन यांना प्रेमानं झप्पीत पकडताना दिसताहेत, तर अच्युत पालव फॅनशी बोलताना व फोटो काढून घेताना.

ekb14

मुख्य उदघाटन तर मी येण्यापुर्वी नुकतंच झालं होतं. पण अच्युत पालव आल्या नंतर त्यांच्या हस्ते अजुन एकदा उदघाटन करायची कल्पना पुढे आली.

लाकडी भोवरा, दोरा आणि मडकं वापरून केलेली कलाकृती:

ekb20

सर्व कलाकार आणि रसिक बाहेर गच्चीत आले. एका टेबलावर लाकडी भोवरा, त्या भोवती रंगानं ओला केलेला दोरा गुंडाळून तो भोवरा पांढऱ्या शीटवर फिरवला अन टाळ्यांचा कडकडाट झाला. अतिशय सुंदर डिझाईन तयार झाले होते.
(अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफीचा डेमो पाहणे हा एक भन्नाट अनुभव असतो. ज्यांनी पहिले असेल त्यांना कल्पना असेल) बाकीच्यांनी पण असाच भोवरा फिरवून त्यांची त्यांची हौस फेडून घेतली.

ekb21

मग मी या डिझायनर फर्निचर शोरूम कम आर्ट गॅलरीत चक्कर मारायला घेतली. काही आधुनिक फर्निचर वगळता क्लासिक आणि अँटिक अश्या प्रकारच्या वस्तूंनी ही हा स्टुडिओ समृद्ध आहे. जुन्या प्रकारच्या खुर्च्या, डायनिंग टेबल्स, भिंतीवरची लाकडी हँगिंग्ज, जुने फोन्स, स्वयंपाक घरातील भांडी, छोट्या वस्तू इ प्रकारच्या य गोष्टी आहेत. आपण पाहताना हटकून जातो. आणि अर्थातच पेंटिंग्ज, स्केचेस, म्युरल्स, शिल्पं इ ! एकदा भेट द्यावीच असं हे ठिकाण !

स्टुडिओतील कलात्मक बैठक:

ekb632

गॅलरीतील निळ्या भिंतीच्या पार्श्वभूमीवरील स्केचेस, पेंटिंग्ज:

ekb487

अर्बन स्केचर्स, पुणेचे प्रसिद्ध चित्रकार संजीव जोशी यांचे स्केच:

ekb795

खालचे दोन फोटो : न्यान्दी वूडन आर्ट्सचा लाकडी कलाकृतीचे दालन:

ekb258

ekb693

या अभिनव स्टुडिओचे धनी सुहास एकबोटे हे अभिनव कलामहाविद्यालयात शिकलेले पदवीधर आहेत त्यामुळे त्यांच्या कलादर्दी नजरे बद्दल बोलायायालच नको. त्यांचं फेसबुकची पानं पाहिली तर पुण्यातल्या जुन्या कलात्मक वास्तू, वस्तूंचे काढलेले असंख्य फोटो दिसतील आणि हीच कलादर्दी त्यांच्या स्टुडिओत दिसून येते !
आता जेवणाची वेळ झाली होती. घरी जाऊन झटपट जेवण करून परतलो.
एका टेबलावर सुहास एकबोटे यांचे स्टुडंट्स स्केचिंग, पेंटिंग इ करण्यात गर्क होते.

ekb843

ekb953

आता प्रसिद्ध शिल्पकार संदीप लोंढे यांचे शिल्पकलेचे प्रात्यक्षिक होते. त्यांना लवकर जायचे असल्यामुळे प्रात्यक्षिक लवकर सुरु केले होते. मी प्रात्यक्षिक संपताना पोहोचलो होतो. समोर बसलेल्या सुभाष अवचट यांचे शिल्प संपताच टाळ्यांच्या कडकडाट झाला. त्यांनी जलदपाणे माती माध्यमात अप्रतिम शिपलं साकारले होते. मी जवळ जाऊन शिल्पाचा फोटो काढण्याचा मोह टाळू शकलो नाही.

संदीप लोंढे यांचा फोटो काढण्यासाठी रसिकांनी गर्दी केली.

मी ही नंतर सुहास एकबोटे आणि शिल्पकार संदीप लोंढे यांचा फोटो काढला.

ekb125

दुसऱ्या कोपऱ्यात अन्वर हुसैन यांचं ऑईल पेंट मध्ये पोर्ट्रेट रंगवणं सुरु होतं. मॉडेल होते अजित गाडगीळ.
पी एन गाडगीळ ऍण्ड सन्सचे अजित गाडगीळ हे अजितकाका म्हणून प्रख्यात आहेत. दर्दी आर्ट क्युरेटर म्हणून प्रसिद्ध आहेत.
सध्या पीएनजीच्या बऱ्याच शो रूम्स मध्ये दर्जेदार चित्रांची प्रदर्शेने भरत असतात याचं श्रेय अजितकाका यांचं आहे. पुणे परिसरातल्या चित्रकारांचे ते खंदे आधार आहेत. काही महिन्यांपूर्वी थोर चित्रकार राजा रविवर्मा यांचं जंगी प्रदर्शन पुण्यात बालगंधर्वला भरलेलं होतं त्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता.

जसजसं रंगमिश्रण, कुंचल्याचे फटकारे यांची जादू चालू होती, तसतसे प्रेक्षक चकित होत पाहत होते.

ekb486

पूर्ण झालेले पोर्ट्रेट:

ekb159

पोर्ट्रेट पूर्ण झाल्यावर अर्थातच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटानं जोरदार सलामी दिली.

खालच्या फोटोत डावीकदडून अन्वर हुसैन, अजित गाडगीळ आणि सुहास एकबोटे

ekb478

स्केचेसने नटलेला आणखी एक कोपरा:

ekb219

स्टुडिओचा टेरेस हिरवाईने ने नटलेले आहेत. इथली सजावट सुखद अनुभव देते. एक छोटेखानी मंच देखील विविध कार्यक्रम, मैफिलीसाठी सज्ज आहे.

ekb789

आज संध्याकाळी गोड करण्यासाठी मिलिंद जोशी यांची गझलेची मैफिल होतीच. त्याच वेळी माझ्या वैयक्तिक कामामुळे इथून निघावं लागल्यामुळं मी मैफिलीचा आनंद लुटू शकलो नाही याचे रुखरुख लागलीच.

ekb951

एकंदरीत आजचा दिवस सुहास एकबोटे यांच्या डिझाइनर फर्निचर शो-रूम कम स्टुडिओत भन्नाट गेला होता.
कलेच्या आस्वादाने हा पूर्ण दिवस कल्लाड झाला !

************************ समाप्त ******************************************

संदर्भसूची:
सुहास एकबोटे यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/ekbote.suhas.5
संदीप लोंढे यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/sandeep.londhe.372
अन्वर हुसैन यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/anwarhusainart
शर्मिला फडके यांचा अन्वर हुसैन आणि अनहद हा वेध घेणारा नितांत सुंदर लेख: http://www.lokmat.com/manthan/non-existent/
सुभाष अवचट यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/subhash.awchat
अच्युत पालव https://www.facebook.com/achyut.palav
संजीव जोशी यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/sanjeev.joshi1
अजित गाडगीळ यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/ajit.gadgil.5
गिरिश प्रभूणे यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/girish.prabhune.3

*संदर्भ व काही फोटो आंजावरून साभार.

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

बबन ताम्बे's picture

6 Apr 2019 - 8:33 pm | बबन ताम्बे

धन्यवाद चौ.को,.
खूपच सुंदर. अप्रतिम कलाकृतींची सुंदर ओळख करून दिलीत.
नक्कीच भेट देण्यासारखे स्थळ .

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2019 - 4:11 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, बबन ताम्बे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2019 - 9:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

कलाकार आणि कलाकारीच्या दुनियेची सुंदर सफर !

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2019 - 5:11 pm | चौथा कोनाडा

धन्यू डॉ.साहेब !
या सुंदर सफरीचा अनुभव मिपावर शेअर करावाच असं वाटलं !
आपल्यासारखे दर्दी लाईक्स देतात तेंव्हा छान वाटतं !

गुल्लू दादा's picture

6 Apr 2019 - 11:33 pm | गुल्लू दादा

छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2019 - 12:52 pm | चौथा कोनाडा

मनापासून धन्यू , गुल्लू दादा.

चित्रगुप्त's picture

7 Apr 2019 - 7:43 am | चित्रगुप्त

कलाविषयक कार्यक्रमाचा वृत्तांत आवडला.
काही वर्षांपूर्वी 'सेलेब्रिटी' म्हणून गणल्या जाणार्‍या लोकांभोवती उत्तुंग कर्तृत्वाचं जे एक वलय असायचं, ते आता पार विरलंय, आणि फालतू उठवळ व्यक्तीच सेलेब्रिटी असल्याचा गाजावाजा केला जाऊ लागल्यानं आता हा शब्द खरंतर हास्यास्पद आणि बेगडी वाटू लागलाय. आपल्याला थोर वाटणार्‍या व्यक्तींना 'थोर' म्हणणंच पुरेसे व्हावं.

काही वर्षांपूर्वी 'सेलेब्रिटी' म्हणून गणल्या जाणार्‍या लोकांभोवती उत्तुंग कर्तृत्वाचं जे एक वलय असायचं, ते आता पार विरलंय, आणि फालतू उठवळ व्यक्तीच सेलेब्रिटी असल्याचा गाजावाजा केला जाऊ लागल्यानं आता हा शब्द खरंतर हास्यास्पद आणि बेगडी वाटू लागलाय.

बाडिस!!

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2019 - 6:02 pm | चौथा कोनाडा

धन्यू चित्रगुप्तजी ! आपल्या सारख्या कलाकाराच्या अभिप्रायानं विशेष आनंद झालाय.
आपल्या उत्तमोत्तम चित्रकला आणि लेख यांनी मस्त आनंद दिलाय ! वेलकम बॅक.

काही वर्षांपूर्वी 'सेलेब्रिटी' म्हणून गणल्या जाणार्‍या लोकांभोवती उत्तुंग कर्तृत्वाचं जे एक वलय असायचं, ते आता पार विरलंय, आणि फालतू उठवळ व्यक्तीच सेलेब्रिटी असल्याचा गाजावाजा केला जाऊ लागल्यानं आता हा शब्द खरंतर हास्यास्पद आणि बेगडी वाटू लागलाय.

खरंय, सर्वच क्षेत्रात हा प्रकार चाललाय. सामान्य रसिकांपर्यन्त जे पोहोचतात, गाजावाजा घडवून आणताच तेच सेलेब्रिटी ठरतात.

एखाद्याच काम सदोदित जवळून पाहणे हे आमच्या सारख्या आजच्या पिढीत दुर्मिळ झालंय.
तुमची पिढी त्या बाबतीत नशीबवान.

या बाबतीत आपण अनुभवलेल्या थोर कलाकार आणि त्यांची कला यावर एकदा आपण वेळ काढून लिहावे !

उपेक्षित's picture

7 Apr 2019 - 6:17 pm | उपेक्षित

अतिशय सुंदर धागा, नशीबवान आहात इतकेच म्हणेन.

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2019 - 1:03 pm | चौथा कोनाडा

@ उपेक्षित,
_/\_ धन्यू !

नजदीकभी हैं और मौकाभी हैं या चाली वर नशीबवान ठरलो.

मागच्या भारतभेटीत पुण्यातल्या राजा केळकर संग्रहालयाला भेट दिली होती. आपल्यामुळे संग्रहालय जणु जिवंत होऊन बोलू लागल्यासारखे वाटले.

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2019 - 5:26 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, दीपा माने. तुमची संग्रहालयाची अनुभूती मस्तच.
आता पुढच्या भारत वारीत या ठिकाणाला भेट देता येतीय का बघा.

नाखु's picture

8 Apr 2019 - 9:46 am | नाखु

आवाज द्यायचा मी पण आलो असतो, चिंचवडच्या गावकुसाबाहेर तर रहायला आहे.
भेट झाली असती.हे ठिकाणी चिंचवड येथे कुठे आहे.

मध्यमवर्गीय नाखु पांढरपेशा

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2019 - 5:01 pm | चौथा कोनाडा

खुप खूप धन्यवाद, नाखुसाहेब !

हो राव, तुमच्या इथून सुद्धा खूप जवळ आहे.
देईन आवाज पुढच्या वेळी.
आपली मागे दोन तीनदा भेट हुकलीच.
भेटूयात एकदा ठरवून रविवारी सकाळी अथवा इतरवेळी: आपल्या दोघांच्याही सोयीने !

कुणाल रिव्हरसाईड, जुन्या जकात नाक्याच्या पुढे, आदित्य बिर्ला हॉस्पिटल रोड, चिंचवड.
लोकेशन:
https://goo.gl/maps/RzWc5RiMCF82

अरे वा! क्या बात है! मी पण जवळच आहे ही राहायला. वाकड पोलीस स्टेशन जवळ, दत्त मंदिर रोड वर.
आवाज द्यायचा अवकाश. हाय काय अन् नाय काय..! :-)

अनिंद्य's picture

8 Apr 2019 - 11:25 am | अनिंद्य

फारच छान वृत्तांत !

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2019 - 5:36 pm | चौथा कोनाडा

@ अनिंद्य,
_/\_ धन्यू !

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2019 - 5:32 pm | चौथा कोनाडा

छोटी दुरुस्ती :
लेखात मधल्या एका परीच्छेदात .......आपण पाहताना 'हटकून' जातो. ........ ऐवजी 'हरखून' जातो असं हवं आहे.

थॅंक्स, अनिंद्य हे अधोरेखित केल्याबद्दल.

अभ्या..'s picture

8 Apr 2019 - 6:13 pm | अभ्या..

जोरात डे सेलेब्रेट झाला तर.
अस्सल रसिक आहात तुम्ही चौकोसाहेब.
तुमचा कोनाडा अशाच अनवट छंदांनी अन आठवणींनी सदैव भरलेला राहु दे.

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2019 - 5:50 pm | चौथा कोनाडा

तुमचा कोनाडा अशाच अनवट छंदांनी अन आठवणींनी सदैव भरलेला राहु दे.

भारी, एक नंबर !
:-)

धन्यवाद, अभ्या.. साहेब !

रोमना's picture

10 Apr 2019 - 9:50 am | रोमना

फारच छान.

बोलका चित्रलेख.

अगदि कार्यक्रमात हजर असल्याचे वाटले

धन्यावाद...

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2019 - 4:34 pm | चौथा कोनाडा

बोलका चित्रलेख.
अगदि कार्यक्रमात हजर असल्याचे वाटले

धन्यवाद, रोमना.

आवडले! या शोरूम मधे मी २-३ दा गेलोय. पण इथे काही इव्हेंटही होतात हे माहित नव्हते. शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2019 - 4:59 pm | चौथा कोनाडा

हा मोठा इव्हेन्ट होता. फेबुवर जाहिरात टाकून सर्वांना आवताण दिले होते म्हणून मलाही समजले.
इतर वेळीही इथं बऱ्याच कलाकारांची वर्दळ असते. काही छोट्या मैफिली देखील होत असतात.
अर्बन स्केचर्सचे चित्रकार अधून मधून इथं रेखाटनासाठी जमत असतात.

धन्यवाद, राघव.

कंजूस's picture

10 Apr 2019 - 6:58 pm | कंजूस

फोटोंनी मजा आणली.
-----
बाकी जागा किती यावरही कला अवलंबून असते.

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2019 - 5:35 pm | चौथा कोनाडा

फोटोंनी मजा आणली.

धन्यू कंजूससाहेब.

बाकी जागा किती यावरही कला अवलंबून असते.

खरंय. जागा हा महत्वाचा मुद्दा आहे. जागेअभावी कित्येक कलाकारांना निर्मितीच्या हौसेवर पाणी सोडावं लागतं.
यावर काहीजण मात करून कलाविष्कार करतात ते खरंच कौतुकास्पद असतं !
माझ्या माहितीतला एक मुलगा त्याच्या चाळीतल्या खोलीबाहेर येणाऱ्या जाणाऱ्याकडे लक्ष न देता उत्तम चित्रं आणि पेंटिंग करत असे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

11 Apr 2019 - 4:53 pm | हणमंतअण्णा शंकर...

एकंदर नूर आणि नावं पाहता सगळ्या इव्हेंटभर उच्चभ्रू औथळ्य सरसरून गळत असणार। असल्या भंपक दिखावेगिरीचा आपण ना ग्राहक ना निर्माते असल्याची जाणीव होऊन जीव सुखावला.

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2019 - 1:24 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर !
(कसलं खन्नाट नाव घ्येटलय राव )

एकंदर नूर आणि नावं पाहता सगळ्या इव्हेंटभर उच्चभ्रू औथळ्य सरसरून गळत असणार असल्या भंपक दिखावेगिरीचा ......

याच्यावर काय प्रतिसाद द्यावा कळत नाहीय !

ब्रॅण्डिंग / सेलेब्रेटीगिरी / दिखावेगिरी हा आजच्या काळातील अपरिहार्य गोष्ट !
या पासून अलिप्त राहून आपल्यासारख्या काठावरच्या लोकांना सुख मिळतं, पण जे होतकरू आहेत त्यांना असेच आधार चाचपडून स्वतःची प्रगती साधावी लागते. डिजिटलायझेशनमुळे बऱ्याच उलथापालथी झाल्यात.
फाईन आर्ट्स सारख्या क्षेत्राचा राजाश्रय बऱ्याच प्रमाणात काढून घेतला जात आहे (हा मोठा विषय आहे, जाणकारच यावर लिहू शकतील)
फाईन आर्ट्सवाल्यांना त्यांची कला परफॉर्म करण्या शिवाय गत्यंतर राहिले नाही (सर्वसाधारणपणे असे म्हणतोय)

चौथा कोनाडा's picture

13 Apr 2019 - 5:26 pm | चौथा कोनाडा

शिल्पकार संदीप लोंढे यांनी केलेल्या सुभाष अवचट यांच्या शिल्पाचा फोटो नजरचुकीने टाकायाचाचा राहिला होता, तो इथं डकवतोय.

EKB687