कुबट वास दाराआडुन पडतो आहे बाहेर
किती बाहेर?
यत्र तत्र सर्वत्र , नाकाच्या आर पार
नाकातले केस जळून जात आहेत , जळत आहेत
किती वेळ ?
पोटातले ढवळतंय, येतेय बाहेर, कोण आहे तिथे आत
कुणी तरी एक बसला आहे स्तब्ध....
करत असेल का तो ही त्या भयानक वासाचा विचार?
जळत असतील का त्याचेही नाकातले केस
दरवाज्याबाहेर , दरवाज्याच्या पलीकडे?
कुणी उभाही राहू शकत नाही , त्या वासाशिवाय ...
मग मी माझे नाक घट्ट दाबून , आलेली कळही दाबून ,
डोळे आणि डोळ्यात जीव आणि पाणी घेऊन
शांतपणे उभा राहतो....
वासाला चैत्र पालवी फुटलेली असते
नाक नसलेल्या दाराआडून बहरत राहते...
बहरतच राहते....
प्रतिक्रिया
4 Apr 2019 - 5:08 pm | चामुंडराय
हा हा... भारी...
इडंबनाचं पेव फुटलंय राव मिपा वर
चांगलंय .. चांगलंय ..
4 Apr 2019 - 5:18 pm | ज्ञानोबाचे पैजार
नाक नसलेल्या दारा आडून बघत आहेत डोळे
दारा आडच्या मुलीने फोडले आग्या मोहळाचे पोळे
पैजारबुवा,
5 Apr 2019 - 5:04 pm | खिलजि
धन्यवाद चामुंडराय साहेब आणि पै बु काका ==================
=============================================
घ्यावा म्हणतो मी
थोडा तरी, कधी तरी, वास घ्यावा
शांत बैसोनि एका कोपऱ्यात
हळूच मागून हात फिरवावा
खाजवुनिया दोन *पारीत
त्याच बोटांचा वास घ्यावा
कैसे वाटते आता ?
कुणासही इचारू नये
फाट्यावर मारावे यथेच्छ
त्यालाही थोडासा त्रास द्यावा
घ्यावा म्हणतो मी
थोडा तरी, कधी तरी, वास घ्यावा
कोण म्हणते होत नाही आमचा टाईमपास
चला होऊया सहभागी या वासांदोलनात
दहापैकी कुठलेही एक आवडते घालावे आत
मस्तपैकी घ्यावा नाकाने वास
घ्यावा म्हणतो मी
थोडा तरी ,कधी तरी, वास घ्यावा
सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर
एक अलिप्त कोपरा शोधावा