येथे..!

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
4 Nov 2008 - 11:50 am

दृष्टीस हिमनगाचा वरचाच बर्फ़ येथे.
करतात मग कशाला भलताच तर्क येथे.

लाखात मोल ज्यांचे कवड्यात भाव झाले.
अर्थाशिवाय नसतो कुठलाच "अर्थ" येथे.

निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले.
छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे.

फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा,
नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे.

अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही
लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे.

-- अभिजीत दाते

गझलविचार

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

4 Nov 2008 - 11:56 am | प्रकाश घाटपांडे

अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही
लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे.

आपल्याला आवाल्डी बॉ. कदाचित समजल्यामुळे असेल
प्रकाश घाटपांडे

राघव's picture

4 Nov 2008 - 12:35 pm | राघव

खूप आवडली गझल!
निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले.
छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे.

फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा,
नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे.
हे अतिशय खास.

मुमुक्षु

अरुण मनोहर's picture

4 Nov 2008 - 2:02 pm | अरुण मनोहर

एक मस्त गझल.
अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही
लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे.

चेतन's picture

4 Nov 2008 - 2:11 pm | चेतन

फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा,
नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे.
खुप आवडलं

अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही
लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे.
सही.....

चेतन

प्राजु's picture

4 Nov 2008 - 8:00 pm | प्राजु

सगळेच शेर खास आहेत.
मुख्य म्हणजे रदिफ खूप वेगळा आहे..
ग्रेट!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

4 Nov 2008 - 8:32 pm | चतुरंग

(बर्‍याच दिवसांनी तुझी कविता दिसली!)
अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गजल!
सर्व शेर एकसे एक! बहोत बढिया!! :)

चतुरंग

मनीषा's picture

5 Nov 2008 - 11:08 am | मनीषा

अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही
लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. ....सुंदर !!!