लोकहो,
आज अशी एक घटना घडली की हातून एक ’उपदेशात्मक’ कविता लिहून झाली.
ही कविता आमच्या अत्यंत आवडत्या छंदात ८/६/८/६ मध्ये लिहिलेली आहे. या छंदाची लय आम्हाला फार फार आवडते. पहा तुम्हाला आवडते का?
(लयीत वाचणे सुलभ जाऊन काव्याचा चांगला आस्वाद घेता यावा, म्हणून जिथे पॉझ घ्यायचा तिथे स्वल्पविराम दिला आहे. स्वल्पविरामाला क्षणभर थांबून पुढचे वाचावे.)
भुलण्याचे वय तुझे, सावर सावर.....
अवखळ नको होऊ, स्वत:ला आवर.....
नुकतीच आली तुला,
तारूण्याची जाण
देहामध्ये गवसली,
मोतियाची खाण
भुलण्याचे वय तुझे, सावर सावर..........
भरलेल्या कणसाला,
पाखरांची भिती
हाती आल्या पिकाला गं,
जपायचे किती?
भुलण्याचे वय तुझे, सावर सावर...........
गावातल्या मुलींना का,
हडळीचा शाप?
केवड्याच्या झाडाखाली,
असतोच साप
भुलण्याचे वय तुझे, सावर सावर.......
उष्टावल्या नैवेद्याने,
देवाचाही कोप
भांगेसंगे जगते का,
तुळशीचे रोप?
भुलण्याचे वय तुझे सावर सावर.......
बोललो जे काही त्याचा,
नको मानू राग
थेंब थेंब इंधनाने,
भडकते आग
भुलण्याचे वय तुझे, सावर सावर.......
अवखळ नको होऊ, स्वत:ला आवर.....
आपला,
(काव्यात्मक) धोंडोपंत
प्रतिक्रिया
4 Nov 2008 - 5:03 am | आजानुकर्ण
पंत,
भलतीच जबरदस्त कविता लिहिलीत .
ओहोहो... :)
क्या बात है... मस्त.
आपला
(जबराट) आजानुकर्ण
4 Nov 2008 - 5:11 am | बेसनलाडू
उष्टावल्या नैवेद्याने,
देवाचाही कोप
भांगेसंगे जगते का,
तुळशीचे रोप?
वावा!!!
(तुळशीदास)बेसनलाडू
4 Nov 2008 - 12:38 pm | राघव
उष्टावल्या नैवेद्याने,
देवाचाही कोप
भांगेसंगे जगते का,
तुळशीचे रोप?
एकदम खास!!
मुमुक्षु
4 Nov 2008 - 9:44 am | शनआत्तार
:S सुंदर
4 Nov 2008 - 9:48 am | यशोधरा
मस्त कविता!
4 Nov 2008 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे
सुलोचना बाईंच्या आवाजातील गदिमांच्या तुज्या उसाला लागल कोल्हा ची आठवण आली.
मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली
पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला
(लावणी प्रेमी)
प्रकाश घाटपांडे-पाटील बेल्हेकर
4 Nov 2008 - 10:32 am | धोंडोपंत
नमस्कार प्रकाशराव,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. एक मूलभूत मुद्दा सांगावासा वाटतो.
गदिमांची " तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा" ही लावणी अप्रतिम आहे. आम्ही त्या लावणीचे दिवाने आहोत.
पण गदिमांच्या तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा ची पार्श्वभूमी , वृत्त आणि विचार संपूर्णपणे भिन्न आहेत.
त्यांच्या रचनेत तारूण्याने सळसळलेल्या युवतीचे रसभरीत वर्णन आहे . तिची काळजी करण्यापेक्षा तिच्या सौंदर्याचे वर्णन आणि त्यामुळे तिचे आशिक झालेल्यांची काय अवस्था असेल हे सांगण्याकडे त्यांचा कल आहे.
इथे आम्हाला तिच्या तारूण्यामुळे होण्यार्या भावी गोष्टींची चिंता वाटते. "इंधनाच्या थेंबा थेंबामुळे आग भडकते" हे ज्वलंत धोकादायक वास्तव तिला कळावे, अशी अपेक्षा आहे.
आपला,
(सावध) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
4 Nov 2008 - 10:40 am | प्रकाश घाटपांडे
फड सांभाळ तुऱ्याला ग आला
तुझ्या ऊसाला लागल कोल्हा
"सांभाळ " मध्ये थोडी काळजी घेतल्या सारखे केले आहे ,पण मूळ तुम्ही म्हणता तसे आहे.
प्रकाश घाटपांडे
4 Nov 2008 - 10:36 am | विनायक प्रभू
पंत कविता आवड्ली, भावली.
परिस्थितीचे वास्तववादी चित्रण.
सर्व पालकांनी जरुर वाचावी अशी.
हा विषय कसा बोलावा ह्या बाबतीत कायम गोंधळ असतो.
4 Nov 2008 - 10:43 am | sanjubaba
गदिमांची " तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा" ही लावणी अप्रतिम आहे. आम्ही त्या लावणीचे दिवाने आहोत. पण ही लावणी गदिमा ची आहे या विषयी शंका वाटते मला वाटते ती खेबूडकराची आहे.....जरा शहानिशा केली तर उत्तम..!
बाकी कविता फार च अप्रतिम आहे
4 Nov 2008 - 10:48 am | धोंडोपंत
शहानिशा कसली? १०० टक्के गदिमांचीच आहे. शंकाच नको.
हे असलं लिहिणं गदिमाच जाणे.
एक शब्द इकडचा तिकडे करता येत नाही गदिमांचा. गदिमांची ताकद आम्ही अजून कोणात पाहिलेली नाही.
बाप माणूस. आमचा दंडवत.
आपला,
(गदिमाभक्त) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
4 Nov 2008 - 12:47 pm | राघव
एक शब्द इकडचा तिकडे करता येत नाही गदिमांचा. गदिमांची ताकद आम्ही अजून कोणात पाहिलेली नाही.
बाप माणूस. आमचा दंडवत.
गदीमा म्हणजे आपलेही दैवत!
मुमुक्षु
4 Nov 2008 - 10:55 am | प्रकाश घाटपांडे
येथे पहा.
प्रकाश घाटपांडे
4 Nov 2008 - 11:01 am | धोंडोपंत
क्या बात है प्रकाशराव,
लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा ?
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा
याला कुंपण घालशील किती ?
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भिती
अर्ध्या रात्री घालतील घाला
याला म्हणतात गदिमा.
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
4 Nov 2008 - 10:45 am | विसोबा खेचर
भरलेल्या कणसाला,
पाखरांची भिती
हाती आल्या पिकाला गं,
जपायचे किती?
वा वा पंत..!
केवळ सुंदर काव्य..
काव्यातील आपला अधिकार वादातीत आहे..!
तात्या.
4 Nov 2008 - 10:57 am | जैनाचं कार्ट (not verified)
मस्त !
आवडली काव्य रचना आपली !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
4 Nov 2008 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंत, कविता आवडली !!!
भरलेल्या कणसाला,
पाखरांची भिती
हाती आल्या पिकाला गं,
जपायचे किती?
ओहो, तारुण्याची भानगड लैच मोक्कार असते नाय का ? :)
-दिलीप बिरुटे
(पंतांचा दोस्त )
4 Nov 2008 - 4:04 pm | लिखाळ
बोललो जे काही त्याचा,
नको मानू राग
थेंब थेंब इंधनाने,
भडकते आग
वा ! कविता आवडली.
--लिखाळ.
4 Nov 2008 - 8:07 pm | प्राजु
धोंडोपंत ..
अतिशय सुरेख कविता.
गावातल्या मुलींना का,
हडळीचा शाप?
केवड्याच्या झाडाखाली,
असतोच साप
खास! - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Nov 2008 - 8:23 pm | ऋषिकेश
अप्रतिम! एकेक कडवे/शेर अस्सल आणि कसदार आहे .. खूप खूप आवडली :)
-(प्रभावित) ऋषिकेश
4 Nov 2008 - 8:27 pm | चतुरंग
उष्टावल्या नैवेद्याने,
देवाचाही कोप
भांगेसंगे जगते का,
तुळशीचे रोप?
भुलण्याचे वय तुझे सावर सावर.......
बोललो जे काही त्याचा,
नको मानू राग
थेंब थेंब इंधनाने,
भडकते आग
सुरेखच रचना! वृत्तबद्ध आणि गेय! :)
चतुरंग
4 Nov 2008 - 8:51 pm | सर्वसाक्षी
धोंडोपंत,
आज बर्याच दिवसानी आपली रचना वाचायला मिळाली. सुरेख!
6 Nov 2008 - 3:59 pm | मनीषा
कविता छानच आहे ..
गावातल्या मुलींना का,
हडळीचा शाप?
केवड्याच्या झाडाखाली,
असतोच साप ... ... या ओळी विशेष आवडल्या .
6 Nov 2008 - 8:18 pm | दिनेश५७
अप्रतिम!
उष्टावल्या नैवेद्याने,
देवाचाही कोप
भांगेसंगे जगते का,
तुळशीचे रोप?
क्या बात है!
7 Nov 2008 - 9:44 am | मदनबाण
मस्तच..
भरलेल्या कणसाला,
पाखरांची भिती
हाती आल्या पिकाला गं,
जपायचे किती?
व्वा..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर