तनुलीचे आजीआजोबा जेव्हा परत जायला निघाले त्यावेळी तनुली आपल्या आईबाबा बरोबर त्यांना पोहचवायला गेली होती.त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की हे आता परत येणार नाहीत,त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून नंतर ती मनांत म्हणाली,
का असे गेलात तुम्ही
ना बोलता ना सांगता
सहवासाच्या संगतीची
हिच का हो वाच्यता?
नंतर घरी आल्यावर आईबाबांचं बोलणं तिने ऐकले.
आईबाबा आले घरी
म्हणती एकमेकामधे
ठेऊया हिला उद्या डेकेअरमधे
तनुली रात्री झोपली नाही.आजीआजोबांची तिला सतत आठवण येत होती.
झोप येई ना मला
वाटे आईला मज भूक लागली
जवळ घेऊनी देई दुदु मला
कसे सांगू मी तिला
येई आठवण त्यांची मला
दुसर्या दिवशी डेकेअरमधे टॉम,जेरी,क्याथरीन आणि सेरा म्हणाली तिला,
"रडूं नकोस अशी, येतील तुझी आईबाबा संध्याकाळी."
मी मनात म्हणाले
"कसं सांगू मी त्याना की,आईबाबांचे पण आईबाबा असतात,ते आता कसे परत येणार?"
समजाविले मला आईने रात्री
रडूं नकोस तूं त्याच्यासाठी
येतील ते पुढच्या वर्षी
आहे मला त्याची खात्री
हे एकून तनुलीला बरं वाटलं.ती आईला म्हणाली,
लाविला मी त्यांना लळा
रडुन सुकला माझा गळा
असतील ते तिथे बेचैन
जातील हे ही दिवस झटकन
होईन मी तोवरी मोठी पटकन
लुडुलुडु चालण्या एव्हडी
गुलुगुलु बोलण्या एव्हडी
घेतील ते मज कमरेवरती
सांगिन मी मग त्यांना सत्वरी
"का असे गेलात तुम्ही
ना बोलता ना सांगता
सहवासाच्या संगतीची
हिच का हो वाच्यता?"
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
3 Nov 2008 - 9:09 am | पक्या
तनुलीचे प्रकटन छान वाटले. आ़जीआजोबांचा सहवास काही औरच !!
3 Nov 2008 - 10:54 pm | लिखाळ
तनुलीची कथा आवडली.
--लिखाळ.
3 Nov 2008 - 11:38 pm | श्रीकृष्ण सामंत
पक्या,लिखाळ,
आपल्याला लेखन आवडलं हे वाचून बरं वाटलं.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
4 Nov 2008 - 12:21 am | प्राजु
कविता एकदम आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Nov 2008 - 2:16 am | श्रीकृष्ण सामंत
प्राजु,
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com