"कंबक्त, कभी बेसूरा गा नही सक्ती."
लता मंगेशकर यांना उद्देशून (त्या वयाने लहान असताना) एका विख्यात संगीतकाराने वैतागून (आदरपूर्वक) टिप्पणी ऊद्गारली होती
असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं.
“तुझं वंय कोवळं आहे,त्यामुळे तुझ्या गळ्याची क्षमता उत्तम आहे,सुरात आणि तारसूरात गायला तुला सहज जमत असणार शिवाय ह्या वयात तुला तल्लख स्मरण शक्ती आहे. हे सर्व निसर्गाच्या नियमास धरून आहे.तेव्हा असंच चालू ठेव.भरपूर रियाझ कर.”
असं त्या गाणार्या मुलाला/मुलीला सांगून झाल्यानंतर,
“वरच्याचं (उपरवाल्याचं) तुझ्यावर लक्ष आहे,तुला वरदान आहे वगैरे,वगैरे”
काल्पनिक गोष्टींचा उल्लेख करून काय साधलं जातं?.आणि असं त्या मुला/मुलीला सांगणं किती वास्तवाला सोडून आहे हे २१ व्या शतकातल्या जज्ज म्हणून काम करणार्यांना समजू नये ह्याचं नवल वाटतं.
तसं पाहिलं तर ही संगीत शास्त्रातली बहुतांश मंडळी दैवीक कल्पनेने भारावलेले असतात हे जाहिरच आहे.उदा.असेच एक गृहस्थ संगीत शास्त्रात परमोच्य सीमेला पोहोचल्याच्या कल्पनेत राहून गातात आणि त्या गुंगीत त्यांना ईश्वराचा साक्षातकार होत असतो असा त्यांच्या मुलांचा दावा आहे.त्यांना भारत सरकार सर्वोच्य सन्मानाची पदवी(भारतरत्न किंवा पद्मविभूषण )का देत नाही याची ते खंत करतात.मला वाटतं त्यांना पद्मभूषण ह्या पूर्वी मिळालं आहे.
मी कुणाचाही उपहास करण्याच्या उद्देशाने हे लिहीत नाही.
खरं पाहिलंत तर पुरोगामी समजल्या जाणार्या माझ्या महाराष्ट्रात दुर्दैवाने जास्तीतजास्त अंधश्रद्धा आहे असं मुक्ता दाभोलकर यांच्याकडून म्हटलं जातं ते चुकीचं नसावं.
“सूर नवा ध्यास नवा “ हा लहान मुलांचा गाण्याचा कार्यक्रम पहात असताना हे निदर्शनाला आलं.ही Catch me if you can हे खेळणारी एव्हडी लहान मुलं इतकी गोड गातात की विचारू नका.
गाण्याचा अर्थ न कळण्याच्या वयाची ही मुलं,गुरूने शिकवलेलं गाणं यथायोग्य म्हणतात हे वाखाणण्यालायकच आहे.आणि माझ्या मते ह्याचं सर्व श्रेय त्या मुलांना, संगीतात गोडी ठेवून कष्ट घेत राहिल्यामुळे जातं,मुलांच्या संगीत शिक्षकाला जातं आणि बरोबरीने त्या मुलांच्या आईबाबांना जातं.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
प्रतिक्रिया
14 Jan 2019 - 12:41 pm | नेत्रेश
दु:र्दैवाने स्वतःला ईश्वरी अनुभव येत नाही म्हणुन ईतरांची श्रद्धा नाकारण हा सर्वात मोठा पुरोगामी पणा समजला जातो.
16 Jan 2019 - 10:12 am | प्रकाश घाटपांडे
हो पण इतरांची श्रद्धा एखाद्याने नाकारली तरी इतरांना काय फरक पडतो?
14 Jan 2019 - 1:09 pm | खिलजि
मी टिश्श्यूने डोळे पुसत आहे सध्या हे वाचून ..
छान ओझे पाटणकरीया
14 Jan 2019 - 9:42 pm | रमेश आठवले
माझ्या वाचना प्रमाणे हे उदगार शेहनाई वादक बिस्मिल्लाह खान यांचे लताबाईंच्या बाबत आहेत आणि त्यांनी ते कौतुकाने काढले आहेत. त्यांनी कम्बख्त या शब्दाचा वापर केला नाही असे मला वाटते.