लाल निळा शेपूटवाला
पतंग उडवू चला चला
खाऊचे पैसे देऊन
रीळ आणले वाण्याकडून
केला मांजा काचा कुटून
हात काचले घोटून घोटून
...........
दादाने मग ताव कापला
कमच्या बांधुन पतंग केला
झिरमिळी शेपट्या बांधल्या
मैदानावर जाउ चला
लाल निळा शेपूटवाला
पतंग उडवू चला चला
...........
ताणुन दोरी उंच फ़ेकला
सरसर भरभर हवेत चढला
गिरक्या घेता नाच नाचला
पक्षासंगे मजेत फ़िरला
.............
आणा खाली ढील सोडुनी
घ्या बाजुला हिसका देऊनी
चढवा दुसऱ्या मांजाखालुनी
वळसे घाला गोल फ़िरवुनी
लाल निळा शेपूटवाला
पतंग उडवू चला चला
.........
दोन पतंग असे गुंतले
डावी उजवी करू लागले
एकमेका खूप खेचले
दमली ओरडुन मुले
............
बघा बघा तो खाली आला
हा तर आहे पतंग अपुला
कसा तरंगत दूर चालला
पळा पकडुया चला चला
लाल निळा शेपूटवाला
पतंग उडवू चला चला
प्रतिक्रिया
2 Nov 2008 - 9:05 am | विसोबा खेचर
मस्तच कविता...! :)
तात्या.
2 Nov 2008 - 10:05 am | मदनबाण
पतंग उडवण्याची इच्छा आता प्रबळ झाली !!! :)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
2 Nov 2008 - 10:24 am | बेसनलाडू
(बालक)बेसनलाडू
2 Nov 2008 - 10:53 am | सहज
असेच म्हणतो.
2 Nov 2008 - 10:57 am | दत्ता काळे
छान कविता.
9 Dec 2008 - 1:58 am | वेलदोडा
सुंदर बालगीत , अरूण काका.
आवडले.
9 Dec 2008 - 12:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता...!!!