रम्य एका सकाळी

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
1 Nov 2008 - 10:56 pm

एक काल्पनिक कविता....

रम्य एका सकाळी
तु वेचित होतीस बकुळी
अर्ध्या मुर्ध्या श्रुंगारातही
दिसत होतीस सोनकळी

तुला पाहुन मावळणारा
चंद्र जरा थबकला
ढगांच्या गावाक्षातुन
हळु हळु डोकावू लागला

जेव्हा तुझी चाहुल लागली
रवीराजांची तर झोपच उडाली
धुक्याचा पडदा बाजुला सारुन
स्वारी लगेच बघु लागली

तुझ्या गुलाबी गालांना बघुन
भुंगा सुद्धा फसला
गुलाब समजुन गालांना
क्षणभर विसावला

तेव्हा वाटल मला जर
मी असतो भ्रमर................

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

पक्या's picture

2 Nov 2008 - 5:39 am | पक्या

वा , सुरेख कल्पनाविलास .
कविता आवडली.

रम्य एका सकाळी
तु वेचित होतीस बकुळी
अर्ध्या मुर्ध्या श्रुंगारातही
दिसत होतीस सोनकळी

हे तर खासच.

विसोबा खेचर's picture

2 Nov 2008 - 9:01 am | विसोबा खेचर

तुझ्या गुलाबी गालांना बघुन
भुंगा सुद्धा फसला
गुलाब समजुन गालांना
क्षणभर विसावला

वा! नेहमीप्रमाणेच सुरेख, चित्रदर्शी कविता..! जियो गोखले साहेब..

तेव्हा वाटल मला जर
मी असतो भ्रमर................

गोखलेसाहेब, या ओळी अनावश्यक वाटल्या. माझ्या मते त्या तर अध्यारुतच आहेत..! काय म्हणता? :)

आपला,
(भ्रमर) तात्या.

चन्द्रशेखर गोखले's picture

2 Nov 2008 - 9:49 am | चन्द्रशेखर गोखले

कविता संपवावी कशी सुचेना म्हणुन अशी "काशी "करावी लागली

मदनबाण's picture

2 Nov 2008 - 10:01 am | मदनबाण

अर्ध्या मुर्ध्या श्रुंगारातही
दिसत होतीस सोनकळी

व्वा.. मस्तच..

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

बेसनलाडू's picture

2 Nov 2008 - 10:23 am | बेसनलाडू

छान आहे.
(आस्वादक)बेसनलाडू

अरुण मनोहर's picture

2 Nov 2008 - 10:55 am | अरुण मनोहर

कविता खूप आवडली.

तेव्हा वाटल मला जर
मी असतो भ्रमर................
ह्या कवितेचा शेवट ऐवजी, नवीन कवितेची सुरवात असू शकेल!

दत्ता काळे's picture

2 Nov 2008 - 11:00 am | दत्ता काळे

सुंदर कविता.

ह्या कवितेचा शेवट ऐवजी, नवीन कवितेची सुरवात असू शकेल!
हे पटलं.