त्यादवशी मी मुंबईच्या चौपाटीवर अमळंसा फिरायला गेलो होतो.सूर्य अस्थाला जाण्याची वेळ आली होती.
सूर्यास्त पहायला मला खूपच आवडतं.तिथे ठेवलेल्या एका बाकावर बसायला गेलो.आणि त्याच बाकावर आणखी एक बसलेली व्यक्ती माझ्या बरोबर जणू जूनी ओळख आहे असं दाखवून माझ्याशी हंसली.मी पण हंसलो.मला खरंच त्या गृहस्थाला ओळखता आलं नाही.
"अहो मी,समीर शिरवईकर.गोव्याला आपण शेजारी शेजारी राहयचो.तुम्ही तुमच्या वहिनीच्या माहेरी लहानपणी सूट्टीतराहायला यायचा.कित्येक वर्षानी आपली भेट झाली."
मी त्याना म्हाणालो,
"तुम्ही मला पटकन इतक्या वर्षानी कसं ओळखलत?"
"तुमच्या गालावरची खळी कुठे लपणार.तुम्ही माझ्या जवळ बसताना हंसलात त्याचवेळी मला लक्षात आलं.
की तुम्ही सामंतच असणार."
"मग तुम्ही काय करता?"
असा पुढचा प्रश्न मी त्याना केला.
"मी कॉलेजात कायदा शिकवतो.आता काळोख बराच झालाय.मी चर्चगेट स्टेशन समोरच राहतो.चला आपण माझ्या घरीच जांऊया."
नंतर आम्ही दोघे चालत चालत त्याच्या घरी गेलो.
मला समीर म्हणाला,
"सध्या माझी बायको आणि मुलगी गोव्याला गेली आहेत.आता जेवायची वेळ झाली आहे आपण गिरगावतल्या अनंताश्रमातून डबा मागवूया."
मला कुणाचा आग्रह टाळता येत नाही.मी ओके म्हणालो.
त्याने त्याच्या नोकराला पाठवून सरंग्याची तळलेली काप,तिसर्याचं सुकं,कोलंबीची आमटी,तळलेली कोलंबी,सोलाची कढी,भात आणि चपात्या आणायला सांगितल्या.
डबा येई पर्यंत,काही तरी बोलत रहावं म्हणून मी त्याला म्हणालो,
"तू ह्या वकिलाच्या लाईन मधे गेलास त्याचं मला नवल वाटत नाही.कारण मला आठवतं,तू त्यावेळीसुद्धा तुझे मामा लंडनला राहतात आणि ते बॅरिस्टर आहेत,त्यांच्या सारखं तुला शिकायचं आहे म्हणायचास ते मला आठवतं.तसच केलंस की काय?"
समीर म्हणाला,
"हो मी मामाकडे लंडनला राहात होतो.तिथे बार -ऍट -लॉ झालो.आणखी इकडे आल्यावर थोडे दिवस प्रॅक्टीस करत होतो.मला मुळात शिकवायची आवड असल्याने मी इकडच्या लॉ-कॉलेज मधे शिकवतो आणि प्रॅक्टीस पण करतो."
मी म्हणालो,
"तू क्रिमीनल केसीस घेतोस,मग त्या लाईनची मला माहिती ऐकायला मजा वाटेल"
समीर सांगू लागला,
"मी माझ्या विद्दार्थ्याना नेहमी सांगतो की कुणाचाही बचाव करायला मागे पुढे पाहू नका.मग त्या व्यक्तीने काही केलेलं असो.
"तुम्ही पटाईत गुन्हेगाराचा बचाव कराल काय?तुम्ही एखाद्दा खून्याचा बचाव कराल काय?"
असे मला नेहमीच प्रश्न विचारले जायचे.माझं त्याला एकच उत्तर असायचं,
"होय,मी करीन."
आणि असंच उत्तर हवं.कारण मला वाटतं,कुणी काहिही केलेलं असलं तरी त्या व्याक्तीची कमीत कमी कुणी एकाने तरी बाजू घेतली पाहिजे.
माझं पूरं आयुष्य गुन्हेगाराच्या वकिलाचं काम करण्यात गेलं.मी जनतेचा समर्थक होतो.माझी अशिलं अत्यंत घृणा येईल असे कल्पना करवणार नाही असे गुन्हे केलेले असायचे.मी माझं सर्व कसब वापरून,रचनात्मकता आणून,असेल ती दृढता लक्षात
घेऊन त्यांचा बचाव करायचो.
शेवटाला माझ्या अशिलाना कहिना काही कारणाने गुन्हेगार ठरवलं जायचं. कारण गुन्ह्याची गार्हाणी ऐकणार्या न्यायपालीकेचं ते स्वरूप होतं.कारण कुणावरही गुन्हेगारीचा आरोप झाल्यावर त्या न्यायपालेकेशी मुकाबला करणं कठीण काम होतं.त्या प्रांतात असलेली त्यांची शक्तिशाली ताकद,साधन, पोलीस यंत्रणा,आणि अभियोग त्या व्यक्तीवर फेकलेले असायचे.आणि फक्त त्याचा बचाव करणारा म्हणजे एक वकील.पण असं अजीब असून सुद्धा मी बर्याच लोकांची सुटका करण्यात मदत केली आहे.कधी कधी मी न्यायमूर्तीला कायदेशीर तृटी दाखवून राजी करत असायचो.कधी कधी ज्युरींकडून "निरपराधी" म्हणून निकाल मिळायला यशस्वी व्हायचो.
बर्याच लोकांची मी सुकटा करून घेत असे ते दोषी असायचे.काही सुटून पुन्हा गुन्हा करायचे.एकाला तर खूनाच्या गुन्हातून मुक्त केल्यावर सुटल्यावर त्याने दुसर्या कुणाचा खून केलेला असायचा.आणि मी परत त्याचा बचाव केला असायचा.तरीपण त्याला शिक्षा व्हायची पण त्यावेळी माझ्या कडून त्याचा बचाव करण्याचा जोश कमी नसायचा.
हे काम करून आता तीस वर्ष झाल्यावर मला आता कसं वाटत असेल असं विचारलंत तर मी म्हणेन मला माझ्या कामाचा गर्व आहे.माझ्या विवेकाशी नैतीक संवाद ठेवून मी झुंज दिली म्हणत असाल तर खरंच आहे ते.
कोर्टात मी गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तिशी सामना केला आहे.त्यांच जीवन, शरिर, बहूतेक वेळा त्यांचा आत्मा, कायमचा दुखावलेला असायचा.बरेच वेळां मी त्यांच्या डोळ्यात माझ्या कुटूंबातली व्यक्ति पाहायचो.कधी कधी त्यांच्या डोळ्यात मी मलाच पहायचो.
माझ्याच आतल्या माझ्याशी होणारा संघर्ष भिषण असायचा.आणि तो संघर्ष रात्रीच्या जागरणात,चिंतेत, आणि उदासिन ठेवण्यात माझा वचपा काढायचा. पण अखेर शेवटी,मी जे काय अंगिकारलं होतं त्यावरच्या माझ्या श्रद्धेची माझ्या आशंकावर जीत व्हायची.
मला माहित आहे की बर्याच लोकाना हे कळायला जरा कठिण व्हायचं.खरंतर काही ऐकून भयभयीत व्हायचे.आणि क्षणभर दर्शवायचे पण.
लोकशाहीचा हा एक फायदा आहे की प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तीस्वातंत्र्य संभाळलं जातं.आपण कायद्दाचा आधार घेऊन निषेध करण्यासारखं जरी कुणाचं वर्तन पाहिलं तरी त्याला कायद्दाचं संरक्षण दिलं जातं.ते वर्तन कसंही असलं तरी त्या व्यक्तीची बाजू घेणारी आणखी एक व्यक्ती असूं शकते.
हे संरक्षण काढून घेतलं की आपले लोकशाहीचे सर्व हक्क निरर्थक होतात.वकिलाकडून जर का प्रतिकार झाला नाही तर तो वकिल आणि ज्यांच्यावर अभियोग चालवला जातो ते त्याचे प्रतिनीधी असतात, त्या सर्वांच्या स्वातंत्र्यावर गदा येते. कारण जे शक्तीशाली असतात ते त्यांच्या शक्तीचा गैरवापर ज्यांच्याजवळ नाही त्यांच्यावर करू शकतात.
माझ्या विद्दार्थ्याना मी अशावेळी त्या लोकांसाठी झुंज द्दायला सांगतो.परंतु,ती झुंज फार दृढ निश्चय ठेवून,त्यांच्याकडे असलेल्या प्रतिभा,आणि कौशल्याची वापर करून झाली पाहिजे.
तुम्ही काहिही गुन्हा केलेला असो एक व्यक्ती तुमची बाजू घेणारी असली पाहिजे.त्याचमुळे आपलं व्यक्तीस्वातंत्र्य जोपसलं जाणार.अशी माझी श्रद्धा आहे."
वेळ कसा गेला ते कळलंच नाही.तोपर्यंत अनंताश्रमातून डबा आला.भूकही दाबून लागली होती आणि त्यातल्या त्यात अनंताश्रमातलं मालवणी जेवण.मग काय विचारता!
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
1 Nov 2008 - 11:54 pm | चन्द्रशेखर गोखले
सामंतानु मस्त लिवलास हां
2 Nov 2008 - 1:01 am | श्रीकृष्ण सामंत
गोखल्यानुं,
तुमच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.तुमका माझो लेख आवाडलो ह्या वाचून माका बरां वाटला.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
2 Nov 2008 - 12:27 am | कपिल काळे
माशें लेखनात येवकच होवे. खैसून् तरी माश्याची एक तरी वोळ घतल्याविना त्येंका अगदी चैन नाय पडात.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
2 Nov 2008 - 1:12 am | श्रीकृष्ण सामंत
काळ्यानुं,
तुमच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
तुमच्या ब्लॉगवर मी जातय कधी कधी.माझा पण तुमच्या सारख्यांच आसा.माझो व्यवसाय आणि तुमचो सारखोच.लिवूची आवड मात्र पहिल्या पासून.
खरा सांगितला तर तुमका पटूचा नाय.हय दहा हजार मैलावर रव्हल्यामुळे गांवची आठवण येतीलच नाय काय?
गिरगावातलो खर्ड्याचो अनंताश्रम येवजून तां मालवणी जेवण आठवून जरा खाज भागवून घेतंय.दुसरा काय?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com