(भारतीय समाजात जातीभेदाचे विष पसरविण्यासाठी मूळ निवासी युरेशिअन इत्यादी थोतांड इतिहासाच्या नावावर पसरविले जातात. हे पसरविणारे स्वत:ला इतिहासकार इत्यादी म्हणवितात. खर म्हणाल तर आजच्या लोकांचे अध्ययन केले तरी खरा इतिहास कळू शकतो).
हिमाचल प्रदेश येथील मंडी जिल्ह्यात लेकीच्या सासरी एक लग्नाला गेलो होतो. त्यावेळी राज्यात निवडणुकीचे दिवस होते. साहजिकच होते गप्पा मारताना राजनीती जातीपातीचा विषय निघणारच. हिमाचल प्रदेशात २७ टक्के अनुसूचित जातीचे लोक आहे, पण वाल्मिकी समुदाय २०११ जनसंख्यानुसार अर्ध्या टक्क्याहून कमी याचे कारण काय, हा प्रश्न आला. तिथे एक शाळेचे शिक्षक बसले होते, ते म्हणाले हिमाचल मध्ये मुगल आले नाही. म्हणून वाल्मिकी समुदाय हि नाही. हिमाचल येथे वाल्मिकी समुदाय गेल्या २०० वर्षांत बहुतेक ब्रिटीश लोकांकडे शौचालाय स्वच्छ करण्यासाठी आला आणि इथलाच बनला. मुगल येण्याआधी 'शौचालय साफ करण्याचे कार्य' करणारी कुठलीही जाती भारतात अस्तित्वात नव्हती.
मुगल येण्याच्या पूर्वी आपल्या देशात सकाळी शौचेसाठी लोक जंगलात अथवा दिशा मैदानात जात होते. घरात शौचालय बांधण्याची पद्धत नव्हती. वेद, रामायण, महाभारत किंवा संकृत भाषेतील नाटक, कादंबरी इतकेच नव्हे मनुस्मृतीत 'साफ सफाई' करणाऱ्या कुठल्याही जातीचा उल्लेख नाही. घरची साफसफाई गृहणी करायची आणि राजमहाल इत्यादी ठिकाणी सेवेसाठी सूतपुत्र (राजाची इतर स्त्रियांपासून झालेल्या संतान) होतेच. सैनिक पासून ते मंत्री, रथचालका पासून ते कथा वाचणारे, राज वंशाचे चरित्र सांगणारे सूतच होते. त्यांना अस्पृश्य वागणूक मिळत हि नव्हती. मग प्रश्न येतो वाल्मिकी समुदाय आला कुठून.
मी दिल्लीत बिंदापूर एक्स. येथे राहतो. पूर्वी गावाच्या बाहेर (अर्थात आज एक कोलोनी आहे). हरिजन बस्ती होती. ३० वर्षांपूर्वी बिंदापूर एक्स. कॉलोनी बनल्यावर, कोलोनीच्या सफाईची ठेका सोनू नावाच्या तरुणाने आपल्या नावावर करून घेतला अर्थात स्थानीय नेत्याला पटवून. सध्या सोनुच्या खाली काही कर्मचारी हि कार्य करतात. हरिजन कोलोनीत पंवार, चौहान, वर्मा, सोलंकी, पाल इत्यादी आडनावांच्या पाट्या दिसतात. हि सर्व नावे राजपूत अर्थात क्षत्रियांत आहे. महिना-दोन महिन्यातून घराच्या मागच्या नालीतून गाळ, कचरा इत्यादी काढावा लागतो. माझ्या घरी हातपाय धुवायला पाणी आणि चहा हि त्याला मिळतो. एकदा बोलताना तो सहज म्हणाला, इतर जातीतले लोक आम्हाला चांगली वागणूक देत नाही. चहा हि वेगळ्या कपात देतात. साहेब तुम्ही या भागातले नाही, म्हणून चांगली वागणूक देतात. पण आमचे पूर्वज हि राजपूत होते. त्या काळात युद्धात पराजित राजपूतान्जवळ तीनच पर्याय रहात होते, एक मृत्यूला स्वीकार करणे, धर्म बदलणे किंवा मुगलांची शौच साफ करणे. आमच्या पूर्वजांनी हा तिसरा मार्ग स्वीकारला, पण धर्म बदलला नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत.
पश्चिम दिशेतून येणारे लोक वाळवंटात राहणारे. तिथे दिशा मैदान, तलाव इत्यादी नव्हते. शौच घरातच करायचे. गुलाम लोक ती साफ करायचे. भारतात जाती व्यवस्था होती. प्रत्येक जाती स्वत:चे पारंपारिक कार्य करणारी. इस्लाम कबूल केले तरी ते त्यांचे पारंपारिक कार्यच करणार. मग पराजित क्षत्रियांना या कामावर जुंपले. पुढे मुगलांची घरात शौचालय बांधण्याची पद्धत संपूर्ण भारतात पसरली. राजा महाराजा, जमीनदार, समाजातील प्रतिष्ठीत लोक घरात शौचालय बांधू लागले आणि वाल्मिकी समुदाय विभिन्न नावांनी देशभर पसरला.
महाराष्ट्रात हि पाहाल तर इतर समुदायांची आडनावे महारांत आहेत. ज्या भागांत मुगलांचे जास्त वर्चस्व होते, त्या भागात वाल्मिकी समुदाय हि मोठ्या प्रमाणात आढळेल. देशातील दुर्गम भागात जिथे मुगल पोहचले नाही तिथे वाल्मिकी समुदाय आढळणार नाही.
उत्तर भारतीय ते दक्षिण भारतीय सर्वांचे डीएनए एक असले तरी हि स्वत:ची राजनीतिक पोळी शेकण्यासाठी इतिहासाच्या नावावर थोतांड पसरविण्याचे गेल्या काहीं वर्षांत जोमात सुरु आहे. ते थांबविण्यासाठी वाल्मिकी समाजाला पुन्हा भारतीय समाजात मानाचे स्थान देणे काळाची गरज आहे.
प्रतिक्रिया
19 Nov 2018 - 6:03 pm | विजुभाऊ
हे सगळे उत्तर भारतीय जात पात सोडायला तयार नाहीत.
उत्तरभारतीय स्वतःला फार उच्च आणि कर्मठ समजतात.
स्त्रीयांना हीन वागणूक देण्यात हरयाणवी आणि उप्र हे आघाडीवर आहेत.
अर्थात मुघल आक्रमकांची फौज तेथेच जास्त काल राहिली त्यामुळे त्यांच्ची वृत्तीही तशीच झालेली आहे.
19 Nov 2018 - 8:23 pm | भीमराव
पराजित राजाच्या आप्तेष्टांना हीन दर्जाची कामे करण्याची शिक्षा मिळे, हे पटण्यासारखे आहे,
आम्ही लहान असताना आमची आत्याबाई आम्हाला राजपुत्र, राक्षस, राजा, जादुगार टाइप कथा सांगत असे, पण बहुतेक कथेचा शेवट हा खलपात्राला नगरातील लोकांचे मलमुत्र भक्षण करणे, साफ करणे, किंवा मृत्यु दंड असा असे.
म्हातारी च्या कथा वर्षानुवर्षे चालत आलेल्या लोककथा असतील असं मानलं, तर या आधारावर हे कधी तरी नक्कीच घडलेलं असेल,
आता राहीला मुद्दा मुघलांचा, तर इथं जे वाईट झालं ते त्यांच्या मुळेच, असं म्हणण्यात अर्थ नाही.आपले लोक काही कमी नव्हते.
जातिंची विभागनी
कर्माने पडलेल्या, शिक्षेने मिळालेल्या आणि मुळ वर्ण अशी असावी.
19 Nov 2018 - 10:27 pm | मुक्त विहारि
+ १
हिंदूच हिंदूंचे खरे शत्रू.
20 Nov 2018 - 7:50 am | सुधीर कांदळकर
जातीय तेढ वा द्वेष जरी नसला तरी जातिभेद अजूनही आहेत. ब्राह्मण मुलांच्या मित्रमंडळात ब्राह्मण मुले, वैश्यवाणी मुलांच्या मित्रमंडळात वैश्यवाणी मुले, मराठा मुलांच्या मित्रमंडळात मराठा मुले, ओबीसींच्या (तेली, कुंभार, भंडारी इ.) ओबीसी असेच चित्र दिसते. संक्रांतीपासून हळदीकुंकवाला स्त्रिया जमावाने एकमेकींच्या घरी जातात. बहुधा आमंत्रणाविनाच. परंतु मराठा स्त्रियांचा जमाव मराठा स्त्रियांकडे इ.इ. असेच चित्र दिसते. जेवणाच्या पंक्तीला मात्र जातीयता कटाक्षाने पाळली जाते. पूजादी विधींच्या वेळी ब्राह्मण आपले जेवण ब्राह्मणाकरवीच बनवून जेवतात. ब्राह्मणंच्या पंक्तीला इतर कोणी दिसत नाही. गुरव त्यांचेबरोबर परंतु काटकोनात बसतात. दलितांना मात्र कोणीही पंक्तीला घेत नाहीत. गावात माझे एक सुशिक्षित आणि भरपूर वाचन करणारे विद्वान दलित मित्र आहेत. माझ्या घराच्या वास्तुशांतीच्या वेळी त्यांना आग्रहाचे निमंत्रण देऊनही ते आले नाहीत. चुलतभावाने मला सांगितले की त्यांना तू पंक्तीला घेतले असतेस तर काही जातीयवाद्यांना तो आपला अपमान वाटला असता आणि कुरबुरी उभ्या राहिल्या असत्या. म्हणून ते आले नाहीत.
नंतर कळले की पाचशे हजार वर्षांपूर्वी ते इथले मूळ रहिवासी होते. नंतर राजवटी बदलत गेल्या, कधी पोर्तुगीज, कधी मराठे कधी आणखी कोणी तसे त्यांच्या पदरी दलितांचे जिणे आले. त्या आक्रमण संक्रमणाच्या काळी पराभूतांच्या माथी दलितपणाच येत असावा. असुनि खास मालक घरचा ... हे किती खरे आहे!
वेगळ्या जातींचे वैशिष्ट्य, खाद्यसंस्कृती, परंपरा वेगळ्या आहेत. वैविध्यात सौंदर्य आहे हे खरेच. राजकीय नेते मात्र आपली पोळी भाजण्यासाठी या जातिभेदांचा व्यवस्थित उपयोग करून घेतात. आणि कालांतराने पुसट होणारे समाजाचे उभे विभाजन दर निवडणुकीत ठळक होते.
असो. एका अल्पचर्चित विषयावरील लेखाबद्दल धन्यवाद.
20 Nov 2018 - 5:30 pm | डँबिस००७
विवेक पटाईतजी,
लेखा बद्दल धन्यवाद !
नविन उपलब्ध माहीती नुसार कास्ट सिस्टीम ही ब्रिटीशांनी भारतात आणली, त्या पुर्वी भारतात समाजाची विभागणी वर्ण व जात ह्यावर होत असे. क्रिमिनल कास्टस , ठग्स वैगेरे देणगी ब्रिटीशांचीच. फासे पारधी, जंगली आदिवासी वैगेरे गुन्हेगार जाती ठरवल्या गेल्या ह्या ब्रिटीशांमुळे त्याच कारण हे आदिवासी ब्रिटीशांना जंगल लुटायला मना करत होते.
20 Nov 2018 - 6:44 pm | तिता
महाबळेश्वर मध्ये संडास साफ करणारे मुसलमान होते. मी लहान असताना गावात पाटीचे संडास होते. शौच गोळा करण्याचे काम हे लोक करीत. त्यांना भंगी म्हणत. हे लोक अर्धवट उर्दू बोलत. कव्वालीचे कार्यक्रम करत. हे मुसलमान भंगी का झाले असावेत?