स्मृति बालपणाची

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
31 Oct 2008 - 10:26 pm

फिरून आली मला स्मृति
निघून गेलेल्या त्या जमान्याची
त्या माझ्या बालपणाची
अरेरे,एकटेच सोडून जाणार्‍या
अन पुन्हा कधीच
न येणार्‍या त्या बालपणाची

ते लुटुपुटुचे खेळणे
ते लुटुपुटुचे संवगडी
ते धावत पळून जाणे
शीव मला असे ओरडणे
विसरपडेना अजुनही
त्या सुखदेयी स्वप्नाची
त्या आनंददायी बालपणाची
फिरून आली मला स्मृति
निघून गेलेल्या त्या जमान्याची

रडावे पुन्हा पुन्हा आठवून
ते गतदिवस बालपणाचे
स्मरावे पुन्हा पुन्हा आठवून
ते संवगडी बालपणाचे
फिरून आली मला स्मृति
निघून गेलेल्या त्या जमान्याची
अन पुन्हा कधीच
न येणार्‍या त्या बालपणाची

श्रीकृष्ण सामंत

कविताविरंगुळा