रेवती त्यांच्या भावंडात सर्वात लहान.तिला त्यामानाने आईचं सूख मिळालं नाही.आणि ह्याबद्दल तिला नेहमीच वाईट वाटत असतं.ती नेहमी म्हणते माझी आई असती तर मी तिला एका मागून एक प्रश्न विचारले असते.
असं मला ती म्हणाल्या नंतर मी तिला विचारलं,
" असे कोणकोणते प्रश्न तू तिला विचारले असतेस?"
त्यावर ती म्हणाली,
"आईला हसायला केव्हा यायचं?ती लहान होती तेव्हा कुणा देवाची प्रार्थना करायची?एखाद्या वाईट दिवशी ती कशी वागायची.?तिला लहानपणी गाणं गायला आवडायचं काय?रस्त्यावरून चालताना ती डाव्या बाजूने चालायची की उजव्या.? वगैरे वगैरे."
हे ऐकून मी रेवतीला म्हणालो,
"तुझे हे प्रश्न पाहून तू तुझ्या आईला किती मिस करतेस हे मला चांगलंच लक्षात येतं."
रेवती मला म्हणाली,
"मी पाच वर्षाची असतानाच माझी आई निर्वतली.तिला फिट्स यायच्या.गेली त्यावेळी ती ४२ वर्षाची होती.मला माझ्या आईबद्दल काही माहित नाही.माझे वडील खूपच चांगले आहेत.आणि मला आणखी तीन भावंडं आहेत. मी सर्वात लहान असल्याने माझ्या भावंडाना माझी आई चांगलीच माहित होती.ती सर्व माझ्यापेक्षा नशिबवान आहेत.आमच्या आईचं निर्वतणं हे आम्हा सर्वांना दुःखदायक होतं.माझी काही माझ्या आई बाबत अनुमानं आहेत.खूप दिवसाच्या काळजीपुर्वक ऐकण्यातून ती अनुमानं मी काढली आहेत.माझी आई तशी दोषदर्शी होती तशी ती हजरजबाबी होती.तिच्या चेहर्यावर पटकन हसूं दिसायचं. लहान मुलांकडे तिची जिव्हाळ्याची नजर असायची.लिहायला आणि वाचायला तिला खूप आवडायचं.सगळा परिसर तिच्यावर प्रेम करायचा.तिची गैरहजेरी आम्हाला खूपच जाचते.
अलिकडेच मी माझ्या गीताला जन्म दिला.मी तिला म्हणते,
"गीता,मी तुझी आई आहे.तू माझ्यात अडकली आहेस.माझ्या बद्दल तुला काही माहित हवं असेल तर ते माहित होई पर्यंत मी तुला वाटतं तितकी तुझ्या अपेक्षे प्रमाणे नसेनही.पण माझ्या बद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी तुला माहित असणं आवश्यक आहे.
जोपर्यंत मी ह्या जगात आहे तोपर्यंत मला तू काहीही विचारून घ्यावस.मला नेहमी वाटतं मुलीला आपली आई माहित हवी."
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
31 Oct 2008 - 11:54 am | घाशीराम कोतवाल १.२
आई हुन मोठे दैवत या जगतात नाही
सामंत काका आपल्याला आवडला हा लेख
खरच आई बद्दल जे लेख तुम्ही लिहीलेत ना सुंदर आहेत ते
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
31 Oct 2008 - 11:54 am | घाशीराम कोतवाल १.२
आई हुन मोठे दैवत या जगतात नाही
सामंत काका आपल्याला आवडला हा लेख
खरच आई बद्दल जे लेख तुम्ही लिहीलेत ना सुंदर आहेत ते
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
31 Oct 2008 - 11:40 pm | श्रीकृष्ण सामंत
घाशीराम कोतवाल ,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
31 Oct 2008 - 5:53 pm | चित्रा
छान आहे लिहीलेले. या साहित्यप्रकाराला नक्की काय म्हणायचे?
असे काही माझ्या बाबतीत माझ्या आजीच्या बाबतीत झाले आहे, त्यामुळे असेल, पण तुमचा लेख महत्त्वाचा वाटला. माझ्या आईची आई माझ्या जन्माआधीच गेली. त्यामुळे एका आजीबद्दल खूपच कुतुहल तसेच राहिले. त्यातच जर लोक बोलणारे असले, तर इतके स्वतःच्या कुटुंबाबद्दल सांगतात की एखादे माणूस पाहिले नसले तरी त्याचे पूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. माझ्या आजोळचे असे कोणी खूप बोलणारे नव्हते. जे काही थोडे कळले ते आईकडून, पण तेही पूर्ण नाही. त्यामुळे ती आजी म्हटली की फक्त डोळ्यासमोर फोटोतली नाकेली, गोरी स्त्री डोळ्यासमोर उभी राहते पण ती नक्की कशी होती, तिचा आवाज कसा होता, गडबड केली तर ती ओरडायची का नाही, तिने अमूक प्रसंगात काय केले असते असे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहिले.
31 Oct 2008 - 11:44 pm | श्रीकृष्ण सामंत
चित्रा,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
खरंच आई, आजी ह्याच्या आठवणी येऊन मन खूप बेचैन होत असतं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com