अवघड (शतशब्द सत्यकथा)

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
25 Sep 2018 - 12:17 pm

ती वय २५ अवघडलेली पोट एवढं पुढे आलेलं थकलेली पण चेहऱ्यावर समाधान.
नऊ महिने भरत आलेले, नवऱ्याचा आधार घेऊन चालत आली होती.
बाळाचे वजन सव्वातीन किलो बाकी गर्भजल आणि गर्भाशयाचे वजन मिळून पाच साडेपाच किलोचा भर पोटावर.
तपासणी करून सर्व व्यवस्थित आहे समजून आंनदाने हळूहळू स्वप्नाळू पावले टाकीत गेली
तिच्यामागून आलेली दुसरी, वय ५२, पोट एवढं पुढे आलेलं. दोन्ही मूत्रपिंडे निकामी झालेली.
कष्टाने पावले टाकीत आली.आता ऑफिसला जायला फार त्रास होतो सांगत होती.
तपासणीत पोटात चार पाच लिटर पाणी आढळले. थोडक्यात मूत्रपिंडांचे काम अजूनच कमी झालेले.
अहवाल घेऊन कष्टाने जाड पावली भविष्याची चिंता करत गेली.
दोघी माझ्या जुन्या रुग्ण.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

25 Sep 2018 - 3:57 pm | संजय पाटिल

.

ज्योति अळवणी's picture

25 Sep 2018 - 4:57 pm | ज्योति अळवणी

Ohh

विशुमित's picture

25 Sep 2018 - 6:47 pm | विशुमित

अरेरे!
सुखदुःखातीत भावनिक संतुलन वैद्यकीय क्षेत्रातील लोक कसे काय सांभाळत असतील याचा नेहमीच प्रश्न पडला आहे.

दोघींची शारीरिक अवस्था बाहेरून जवळपास समान, पण वय आणि त्या शारीरिक अवस्थेची कारणे मात्र अगदी उलट. एकीत नवीन जीवाच्या आगमनाची चाहूल, तर दुसरीची जीर्ण, निकामी होत होत नष्ट होण्याकडे वाटचाल.
खूप हृदयविदारक शतशब्द सत्यकथा.

सिरुसेरि's picture

26 Sep 2018 - 9:48 am | सिरुसेरि

अरेरे . सुन्न करणारी कथा