टैम्पास

लौंगी मिरची's picture
लौंगी मिरची in जनातलं, मनातलं
16 Sep 2018 - 9:29 pm

भर दुपारी उन्हाच्या झळया खात एकाच लाइनीत जवळ्जवळ आम्हि ६ जनी बसलो होतो . गावाला एकतर बसण्याची सोय नसते . रस्त्याच्या कडेला येणार्या जाणार्यांकडे बघत बसावच लागतं . पर्याय नसतो . माझ्या शेजारी माझी वहिनी तिच्या बाजुला काकु आणि तिच्या शेजारी तिचीच मावस बहिन . तिने तर दर दोन मिनिटाला पूढे सरकुन सरकुन पार रस्ता गाठत आणला , तरी आम्हि त्याच जागी . अवघडुन गेलो होतो पार , पण काकु काहि केल्या जागची हलेना , एकाच जागी बसुन ढिगारेच्या ढिगारे बनवले तिने . समोर शाडुची माती होती ना , मग काय बसल्या बसल्या टाइमपासच कि .
आजुबाजुला आतापर्यंत भयाण गर्दी झालेली . उन्हामुळे पोटात कालवाकालव झाली होती . बरेच लोक ओळखीचे तर बरेच अनोळखी चेहरे . काकुच्या मावस बहिनीने दोघी तिघींच्या ग्रुप नध्ये घुसखोरी करुन गार्हाने चालु केले , “ कसं झालं ग ? हो? नै म्हणजे फारच लवकर नै ? किती वय असेल ? “ आम्हि लांबुनच भुवया तानुन तानुन , कानाचे कोपरे खेचुन तानुन ऐकन्याचा प्रयत्न करत होतो .
कंटाळा आला होता . प्रत्येक जन उठुन पूढे जाउन हात जोडुन नमस्कार घालुन काहितरी बोलुन परत आपल्या जागी येउन बसे . आळीपाळीने सगळे गेले , आणि काकुने फर्मान सोडलं “ जा गं , तु सुद्धा जाउन ये , बघ तरी बोलुन , किती वेळ बसायचं “ . काकुला भुक लागली होती हे लक्षात आलं होतं . कावळ्यांनी थैमान घातलं होतं . झाडावरहि तितकेच आन पोटातहि तितकेच . “ मी ? “ अश्या अविर्भावात काय बरं बोलु मी ? मी तितकसं ओळखतहि नाहि इथे कोणाला आणि माझ्या बोलण्याने परिणाम होणारे ? . पण बोलतेय तर जाऊन यावं म्हणुन मी गेले पूढे .
परत जागेवर येऊन बसले . काकुने आनंदी चेहेर्याने माझ्याकडे पाहिलं . मी कसं तिचं ऐकलं , कदाचित ह्याचा आनंद असावा .
एव्हाना झाडावरचे सगळे काव़ळे पांगले . आता मात्र भुकेने माझा जीव व्याकुळ झाला होता . बरीच लोकं कमी झालेली . बसुन बसुन वैताग आला होता . इथे काहिही वेळेवर होत नाहि . सगळ्या गोष्टींसाठी वाट बघत बसावी लागते .
भर उन्हात अगदि ऊन्हाळे लागायची वेळ आलेली , त्यात साडी . हे गावी येणं जाणं म्हणजे साड्यांच्या घड्या मोडायला चांस मिळणं असतय . नको नको होतं साडीमध्ये . इतक्यात लांबुनच चाहुल लागली , लोकं सैरभैर झाल्यासारखी सैरावैरा पळु लागली . काकु आणि तिची मावस बहिन ढिगार्याचं काम सोडुन उठुन उभ्या राहिल्या ,साड्या सावरत , बॅगा आवरत. मी मात्र आ वासुन पाहात होते . फाइनली आमची एस. टी. आली .

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

16 Sep 2018 - 10:28 pm | जव्हेरगंज

तांब्यासंप्रदायाचा नवा प्रकार आहे का हा.. =))

लौंगी मिरची's picture

19 Sep 2018 - 8:14 pm | लौंगी मिरची

माफ करा , मला माहित नव्हते कि मिसळपाव कोणत्यातरि तांब्या वगैरे सांप्रदायासाठी काम करतं ते . कुणाच्या सांप्रदायिक भावना दुखावल्या असतिल तर माफि असावी . _/\_

मनिम्याऊ's picture

17 Sep 2018 - 2:16 pm | मनिम्याऊ

नक्की काय सांगायचं आहे?

लौंगी मिरची's picture

19 Sep 2018 - 8:15 pm | लौंगी मिरची

तुम्हि लेखाचे टाइटलच वाचलेले नै बहुतेक ;)

खटपट्या's picture

19 Sep 2018 - 11:27 am | खटपट्या

यष्टीची प्रतिक्षा करताना झालेला टैम्पास चांगला टिप्लाय

संजय पाटिल's picture

19 Sep 2018 - 1:36 pm | संजय पाटिल

सुरवातीला तांब्या संप्रदाय वटतो, नंतर कावळा शिवण्याची प्रतिक्षा वाटते शेवटी यष्टीची प्रतिक्षा लक्षात येते. =))

नाखु's picture

19 Sep 2018 - 3:01 pm | नाखु

कावळा यष्टी(ची)त पळाला !!!

जव्हेरगंज प्रतिसादात तरी दिसले याचा आनंद वाटलेला नाखु वाचकांची पत्रेवाला

लौंगी मिरची's picture

19 Sep 2018 - 8:15 pm | लौंगी मिरची

वाचकांचे धन्यवाद .

अथांग आकाश's picture

19 Sep 2018 - 8:33 pm | अथांग आकाश

भारी जमलय!

.

साहेब..'s picture

20 Sep 2018 - 8:08 pm | साहेब..

यष्टीची प्रतिक्षा करताना झालेला टैम्पास चांगला टिप्लाय